02 August, 2024
विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतिगृहात प्रवेश व स्वाधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि. 02 : शैक्षणिक सत्र सन 2024-25 या वर्षापासून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी दि. 30 ऑगस्ट, 2024 पर्यंत https://hmas.mahait.org या पोर्टलव्दारे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्याना स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी वसतिगृहास प्रवेशास निवड झालेले विद्यार्थी वगळून उर्वरीत पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
हिंगोली जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुलांचे, मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती,आर्थिक मागास व इतर मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ विद्यार्थ्यांनी अर्ज करुन त्यांची प्रिंट काढून आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहाच्या गृहपालाकडे सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment