23 August, 2024
अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी स्वयंरोजगारासाठी ऑनलाईन कर्ज प्रस्ताव 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 23 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक शाखा कार्यालय किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येत आहेत. या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरुपात अल्प व्याजदराने एन.एस.एफ.टी.डी.सी. नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात. या यो जनेसाठी वरील तिन्ही जिल्ह्यासाठी सन 2024-25 साठी 30 चा लक्षांक प्राप्त झाला असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
किनवट प्रकल्प कार्यालयासाठी महिला सबलीकरण योजना (दोन लाख रुपये) -5, कृषि आणि संलग्न व्यवसाय (पाच लाख रुपये)- 01, हॉटेल ढावा व्यवसाय (5 लाख रुपये)-02, स्पेअर पार्ट, गॅरेज, ॲटो वर्क शॉप (5 लाख रुपये)- 01, वाहन व्यवसाय (10 लाख रुपये) -01, वाहन व्यवसाय (10 लाख रुपयापेक्षा जास्त व 15 लाखापर्यंत) 01, लघु उद्योग व्यवसाय (तीन लाख रुपये) - 02, ॲटो रिक्षा, मालवाहू रिक्षा (तीन लाख रुपये)- 01 व स्वयं सहाय्यता बचत गट (5 लाख रुपये)-02 असे एकूण 16 चा लक्षांक प्राप्त झाला आहे.
कळमनुरी प्रकल्प कार्यालयासाठी महिला सबलीकरण योजना (दोन लाख रुपये) -4, कृषि आणि संलग्न व्यवसाय (पाच लाख रुपये)- 01, हॉटेल ढावा व्यवसाय (5 लाख रुपये)-01, स्पेअर पार्ट, गॅरेज, ॲटो वर्क शॉप (5 लाख रुपये)- 02, वाहन व्यवसाय (10 लाख रुपये) -01, वाहन व्यवसाय (10 लाख रुपयापेक्षा जास्त व 15 लाखापर्यंत)- 02, लघु उद्योग व्यवसाय (तीन लाख रुपये) - 01, ॲटो रिक्षा, मालवाहू रिक्षा (तीन लाख रुपये)- 01 व स्वयं सहाय्यता बचत गट (5 लाख रुपये)-01 असे एकूण 14 चा लक्षांक प्राप्त झाला आहे.
वरील लक्षांक वेळेत पूर्ण करण्यासाठी www.mahashabari.in या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव दि. 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन शाखा व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक शाखा कार्यालय, किनवट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment