07 August, 2024
बांग्लादेशात अपत्य, नातेवाईक असलेल्यांसाठी संपर्क क्रमांक जाहीर
बांग्लादेशात अपत्य, नातेवाईक असलेल्यांसाठी संपर्क क्रमांक जाहीर
हिंगोली, दि.०७ (जिमाका): बांग्लादेशातील उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील नागरिक अडचणीत असतील, त्यांच्या परिवाराने व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यलयाशी 9405408939 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
बांग्लादेशात स्थानिक कारणांमुळे हिंसाचार उफाळला आहे. महाराष्ट्रातून बांग्लादेशमध्ये व्यापार, शिक्षण इत्यादी कारणाने जे नागरीक गेले आहेत त्यांना देखील हिंसाचाराचा फटका बसला असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी हे आवाहन केले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment