15 August, 2024
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
• जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
हिंगोली, दि.१५(जिमाका): भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी देशसेवेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा अभियानाची आणि तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू विरोधी शपथ जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिंनींना दिली.
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये स्वराज संदीप तिवडे या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ग्रामीण भागातून 14 वा आल्याबद्दल तर बालाजी नरहरी काळे या सहशिक्षकाने ‘हिट अँड रन’ अपघात आई व बाळाचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून बालरोग विभाग हिंगोलीला राज्यातील पहिला ‘मुस्कान’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, आणि डॉ. गोपाल कदम यांच्यासह चमूचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे यांच्या समुहाने ई-संजिवनी अंतर्गंत 1 लाख 26 हजार रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्याशिवाय मृदा आरोग्य पत्रिका वाटप केल्याबद्दल कृषी विभागाचे गजानन लोडे आणि त्यांचा चमू, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये औंढा तालुक्यातील चौंडी शहापूर, वसमत तालुक्यातील चिखली आणि विरेगाव या गावाचा धनादेश व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प अंतर्गत भूजल जनजागृतीसाठी चित्ररथाला जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवली.
देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांनाही गौरविण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment