05 August, 2024

ठक्करबाप्पा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 05 : ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सुचनेनुसार सन 2022-23 या वर्षापासून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सन 2024-25 साठीचे ठक्कर बाप्पा योजनेचे जिल्हास्तर व राज्यस्तर प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 31 जुलै, 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. प्राप्त प्रस्तावांची संख्या पाहता या योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अधिनस्त येत असलेल्या ग्रामपंचायतनिहाय दि. 3 फेब्रुवारी, 2023 च्या शासन निर्णयातील विवरणपत्र एक मध्ये नमूद विविध कामांपैकी आर्थिक मर्यादेच्या अनुषंगाने कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विविध कामांचे प्रस्ताव तयार करुन कामाच्या अंदाजपत्रकासह प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे दि. 30 ऑगस्ट, 2024 पूर्वी सादर करण्यात यावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. *******

No comments: