19 February, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांना अभिवादन

        हिंगोली,दि.19: छत्रपती शिवाजी महाराज व  संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपजिल्हाधिकारी (रोहयो)  खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी ही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व  संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*****

18 February, 2019

गंगाखेड आणि हिंगोली येथे कापूस खरेदी केंद्र सुरु


गंगाखेड आणि हिंगोली येथे कापूस खरेदी केंद्र सुरु

        हिंगोली, दि.18: हंगाम 2018-19 मध्ये कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सब एजंट म्हणून राज्याचे मर्यादेत हमी दराने कापूस खरेदी करीता झालेली आहे. विभागामध्ये हमी दराने कापूस खरेदी करणे करीता परभणी विभागात गंगाखेड, जि.परभणी आणि हिंगोली, जि. हिंगोली ही केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत.
          कापूस पणन महासंघाद्वारे संगणकीय कार्यप्रणाली विकसित केलेली असून सदर कार्यप्रणालीद्वारे शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाची रक्कम थेट त्यांच्या आधार कार्डशी  संलग्न असलेल्या बँक खात्यांत जमा होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी कापूस विक्री करतेवेळी  7/12 उतारा, आधारकार्ड आणि बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सोबत आणावे, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक, परभणी यांनी केले आहे.
00000


16 February, 2019

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी



माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी

हिंगोली, दि.16 : जनसंवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी टाटा ट्रस्टस्‌च्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप) उपक्रमाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात १० उमेदवार ११महिन्यासाठी मानधन तत्वावर काम करतील.या उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन होईल. इच्छुक उमेदवार maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात (अर्जाचे शुल्क लागू).या उपक्रमात निवडण्यात आलेल्या उमेदवारांना प्रती महिना रू २५ हजार (आयकर आणि अंशदायी भविष्य निर्वाह निधी वजा जाता अंदाज सुमारे २२ हजार रू.)  मानधन देण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल.या कार्यक्रमांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत खलील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
संहिता लेखक (एकूण पदे - ५ ) मराठी (३), हिंदी (१) आणि इंग्रजी (१) (सर्व पदे मुंबई कार्यालयासाठी) (पात्रता-जनसंवादातील पदवी, अनुभवास प्राधान्य.)
सोशल मीडियासाठी संहिता लेखक - (एकूण पदे -१ )( पात्रता- कोणतीही पदवी, सोशल मीडियाशी संबंधित लघु अभ्यासक्रम केला असल्यास अथवा सोशल मीडिया क्षेत्रातील अनुभव असल्यास अथवा जनसंवादातील पदवी असलेल्या आणि सोशल मीडिया क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.)
ग्राफिक डिझाईनर - (एकूण पदे - २)( पात्रता- फाईन / ॲप्लाईड आर्टमधील पदवी, अनुभवास प्राधान्य.)
व्हिडिओ ॲनिमेटर -(एकूण पदे - २) ( पात्रता- ॲनिमेशन विषयातील पदवी, अनुभवास प्राधान्य.)
अर्जदाराने पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे -अर्जदाराने आवश्यक पदवी किमान ५० टक्के गुणांसह अथवा बी ग्रेडसह प्राप्त केलेली असावी,एमएस ऑफिस तसेच ज्या विषयात काम करण्यासाठी अर्ज केला आहे त्या विषयातील संगणकप्रणालीची माहिती असणे आवश्यक,३१ डिसेंबर २०१८ रोजी अर्जदाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे,संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या तसेच शासन किंवा शासनाशी संबंधित प्रकल्प किंवा योजनेतील अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल,उमेदवाराकडे स्वतःचा अत्याधुनिक स्वरुपाचा लॅपटॉप असणे आवश्यक आहे,हा कार्यक्रम म्हणजे शासकीय सेवा नसेल. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ उमेदवारांना देण्यात येणार नाही
०००००


महिला लोकशाही दिनाचे 18 फेब्रुवारी रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 18 फेब्रुवारी रोजी आयोजन

        हिंगोली, दि.16: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे. ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि.जी. शिंदे यांनी केले आहे.
00000




15 February, 2019

जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे आवाहन



जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना
यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.15:  महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर 2018 अन्वये हिंगोली जिल्ह्यातील 149 पात्र अर्जदारांपैकी या पूर्वी पात्र व अपात्र ठरलेल्या 16 अर्जदार व एकाच नावाचे दोन अर्ज प्राप्त झालेले व लाभार्थी  गटा व्यतीरिक्त इतर गटाची प्राप्त अर्ज एकूण 9 असे एकूण 25 अर्जदार कमी होऊन एकूण 124 अर्जदारांची सोडत दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी काढण्यात आली. सदरील सोडतीमध्ये उर्वरीत लक्षांकाबाबत 43 भाग्यवान अर्जदार निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 7 अर्जदारांनी दिनांक 13 फेब्रुवारी 2019 पर्यंत मशीन खरेदी केल्याचे पुरावे या कार्यालयास सादर केले आहे.
            दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी उर्वरीत 81 अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली होती. करिता 81 प्रतिक्षाधीन यादीपैकी 50 लक्षांकाची पूर्तता करण्यासाठी उर्वरित 36 अर्जदारांची यादी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. आज रोजी पर्यंत एकूण 50 लक्षांका पैकी 14 लाभार्थ्यांनी मशिन खरेदी केले आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयात दिलेल्या अटीनुसार भाग्यवान 36 अर्जदारांना दिनांक 14 फेब्रुवारी 2019 पासून महिन्याच्या आत म्हणजेच दिनांक 13 मार्च 2019 पर्यंत मशिन खरेदी  केल्याबाबतचे दस्ताऐवजाच्या प्रति जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली या कार्यालयास सादर करण्यात यावे. सदरील 36 अर्जदारांपैकी एक महिन्याच्या आत मशिन खरेदी न केल्यास अर्जदारांची मान्यता रद्द  समजण्यात येऊन व उर्वरीत प्रतिक्षाधीन यादीतील लाभार्थ्यांना अनुक्रमानुसार संधी देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले  आहे.
000000



अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर


अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

        हिंगोली,दि.15:  राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा) हे दि. 19 फेब्रुवारी, 2019 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            मंगळवार, दिनांक 19 फेब्रुवारी, 2019 रोजी दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन, दुपारी 2.30 ते 3.30 वाजता अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तींच्या भेटी, दुपारी 3.30 ते 4.30 वाजता अल्पसंख्यांक समाजाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांचे सोबत बैठक, सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या आढावा बैठकीस उपस्थिती, तसेच सायंकाळी 5.30 वाजता हिंगोली येथून परभणीकडे प्रयाण करतील.
****




ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीयेकरिता अर्जातील त्रूटींची पूर्तता करण्याचे आवाहन - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण


ऑनलाईन शिष्यवृत्ती अदायगीची प्रक्रीयेकरिता
अर्जातील त्रूटींची पूर्तता करण्याचे आवाहन
                                                        - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

हिंगोली,दि.15: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकाराच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल 1 ऑक्टोबर, 2018 पासुन नव्याने कार्यान्वीत झालेली आहे. https://mahadbt.mahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती/फ्रिशिप योजनेकरीता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केलेले आहे. सदर अर्ज संबंधीत महाविद्यालयाकडुन तपासुन व पडताळणी करुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली  यांचेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहेत. महाविद्यालयाकडुन प्राप्त झालेल्या अर्जावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांच्याकडुन ऑनलाईन मान्यता देण्यात येत आहे.
सद्य:स्थितीत महाविद्यालय स्तरावर अद्यापही सुमारे 15 टक्के अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधीत महाविद्यालयानी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्ज संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे फॉरवर्ड करुन तात्काळ निकाली काढावेत.
तसेच नोंदणीकृत अर्जांपैकी सुमारे 20 टक्के अर्ज विद्यार्थ्यांनी अथवा महाविद्यालयाने अर्ज मंजूर होण्यापूर्वी  त्यांच्या स्तरावरुन अर्ज रद्द केलेले आहेत. सदर रद्द केलेल्या अर्जांपैकी पात्र असलेल्या अर्जांची  त्वरीत त्रुटी पूर्तता करुन असे अर्ज विद्यार्थ्यांनी पुन:श्च ऑनालाईन सादर करावेत. तसेच महाविद्यालयांनी सदर अर्ज संबंधित लॉग इन वरुन मान्य करुन पुढील कार्यवाहीस्तव सहायक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावेत.
सदर पोर्टलवर मान्य झालेल्या अर्जाची अदायगीची प्रक्रिया यशस्वी होण्याकरीता विद्यार्थ्यांच्या लॉग इन मधुन रिडम्शन प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. सदर ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण न केल्यास मान्य झालेली विद्यार्थी  व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी,  रिडम्शन व्हाऊचर जनरेट झाले असून देखील रिडम्शन प्रक्रीया न केलेल्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी. विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक प्रणालीमध्ये अचूक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत केलेले बँक खाते क्रमांक आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अदायगीच्या प्रक्रीयेमध्ये प्रत्येक स्तरावर एस.एम.एस. येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच नोंदणीकृत बँक खात्याशी संलग्न असून तो अद्ययावत असणे आवश्यक आहे.  या सर्व सूचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बँक खात्यावर न जमा झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, तसेच महाविद्यालयातील/विद्यार्थी प्रतिनिधी (UR,GS,SR) यांना उपरोक्त सूचना विविध माध्यमातुन विद्यार्थ्यांना तात्काळ कळवाव्यात, असे आवाहन भाऊराव चव्हाण, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी  केले आहे.
****