28 February, 2018

2 मार्च रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद



2 मार्च रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद
हिंगोली, दि. 28 :-  जिल्ह्यात  दिनांक 2 मार्च रोजी धुलीवंदन हा सण  साजरा केला  जात आहे .  त्याअनुषंगाने  या काळात  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था  राखण्यासाठी  मुंबई दारुबंदी  कायदा 1949 चे कलम 142 अन्वये  जिल्हाधिकारी  यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा  वापर करुन असे आदेशित  करण्यात  येते की ,  हिंगोली  जिल्ह्यातील  सर्व किरकोळ  व ठोक  मद्य विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार पूर्णत: बंद ठेवण्यात यावेत. 
वरील आदेशाचा भंग करणाऱ्या  अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई  दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक  कारवाई  करण्यात येईल  यांची सर्व अनुज्ञप्तीधारकांनी  नोंद घ्यावी .
0000000

27 February, 2018

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्जाची मागणी



अनुसूचित  जमातीच्या लाभार्थ्यांकडून वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी  अर्जाची मागणी
हिंगोली, दि. 27:-  केंद्रवर्ती  अर्थसंकल्प   योजना  सन 2017-18 अंतर्गत  खाली दर्शविल्याप्रमाणे  अनुसूचित  जमातीच्या (आदिवासी)  शेतकरी /सुशिक्षित  बेरोजगार युवक /युवतींना  वैयक्तीक लाभाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी  लाभार्थ्यांकडून  आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत . विहित नमुन्यातील  अर्ज या  कार्यालयात  उपलब्ध  असून इच्छुक  लाभार्थ्यांनी  प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प , कळमनुरी  जि. हिंगोली  यांचे नावे  योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण  कागदपत्रांसह आवेदन अर्ज  दिनांक 15 /03/2018 पर्यंत  कार्यालयीन वेळेत सादर करावा.
यामध्ये आदिवासी  शेतकऱ्यांना  85 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरवठा करणे ,  शिवन काम  प्रशिक्षित आदिवासी  महिला / पुरुषांना  85 टक्के  अनुदानावर  शिलाई व पिकोफॉल  मशिन पुरवठा करणे ,  आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के  अनुदानावर काटेरी तार पुरवठा करणे , गट ब प्रशिक्षणाच्या योजना – आदिवासी युवक /युवतींना  मराठी/ इंग्रजी संगणक  टायपींगचे प्रशिक्षण देणे (अनिवासी) ,  आदिवासी  युवक /युवतींना  संगणक (MSCIT) प्रशिक्षण  देणे (अनिवासी) ,  आदिवासी युवक /युवतींना  PMT/PET/NEET  चे प्रशिक्षण देणे ,  आदिवासी युवकांना नळ फिटींगचे (प्लंबींग) प्रशिक्षण  देणे (निवासी) ,  गट क  मानव साधन संपत्ती  विकासाच्या व  कल्याणात्मक योजना – आदिवासी  विद्यार्थ्यांना  शाळेत जा ये करण्याकरीता  सायकल पुरवठा  करणे (8 ते 12 वी वर्ग) या योजनेचा समावेश आहे.  विहित  मुदतीनंतर  आलेले व परिपूर्ण  नसलेले आवेदन  अर्ज  स्विकारले जाणार नाहीत . उपरोक्त  योजनांमध्ये  पूर्णत: / अंशत: बदल करण्याचा तसेच  त्यापैकी  कोणतीही योजना राबविण्याचा  अथवा न राबविण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी  यांनी राखून ठेवलेला आहे . प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प , कळमनुरी  , जि. हिंगोली.
0000000

अनधिकृत जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती



अनधिकृत  जाहिरातींवर नियंत्रण  ठेवण्यासाठी  नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली, दि. 27 :-मा. उच्च न्यायालय  मुंबई यांचे  आदेशामधील  नमूद  परिच्छेद  क्र. 59 मधील (b)(e) व (i)  मध्ये नमूद केल्यानुसार  अनधिकृत  जाहिराती , घोषणा फलक , होर्डींग , पोस्टर्स ई संदर्भाच्या अनुषंगाने  नियंत्रण  ठेवण्याकरीता  जिल्हास्तरावर  व तालुका स्तरावर  ग्रामीण भागासाठी  नोडल  अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी , असे  निर्देश  दिले आहेत.  मा. उच्च न्यायालय  मुंबई यांच्या ओदशात  नमूद  केल्याप्रमाणे  जिल्हास्तरावर  व तालुकास्तर  ग्रामीण भाग  वरील अनधिकृत  जाहिराती , घोषणा  फलक, होर्डींग, पोस्टर्स ई संदर्भाच्या अनुषंगाने  नियंत्रण  ठेवण्याकरिता  नोडल अधिकारी यांची खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे . श्री. लतीफ पठाण , निवासी उपजिल्हाधिकारी , मो. 9422069786,  श्री. माधव बोथीकर , नायब तहसिलदार , हिंगोली मो.9850271785, श्री. पी.एन. ऋषी , नायब तहसिलदार , कळमनुरी मो.9881569005, श्री. सचिन जैस्वाल  , नायब तहसिलदार , वसमत मो. 9421324610,  श्री. विरकुंबर, नायब तहसिलदार , मो.9623747459,  श्री. पाठक , नायब तहसिलदार , सेनगाव मो.9881592002 यांची नोडल  अधिकारी म्हणून  नियुक्ती करण्यात आली असून  अनधिकृत  जाहिराती , घोषणा  फलक , होर्डींग , पोस्टर्स  ई बाबत  मा. मुंबई उच्च न्यायालयाने  दिनांक 31 जानेवारी 2017 रोजीच्या आदेशात  नमूद केलेल्या बाबीनुसार  आपल्यास्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. स्वा/- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , हिंगोली.
0000000

23 February, 2018

जिल्ह्यासाठी 984.45 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर



 जिल्ह्यासाठी 984.45 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर
हिंगोली, दि. 23 :-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने मार्च, एप्रिल व मे 2018 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍ह्यासाठी  984.45  क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली- 261.45, औंढा ना.-129, सेनगाव-207, कळमनुरी-207, वसमत-180 , याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ,हिंगोली यांनी  केले आहे.
0000000     

22 February, 2018

सन 1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत याआंदोलनामध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींची माहिती सादर करण्याचे आवाहन



सन 1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत याआंदोलनामध्ये
भाग घेतलेल्या व्यक्तींची माहिती सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 22 :  सन 1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत याआंदोलनामध्ये भाग घेतलेल्या व त्याअनुषंगाने कारावास भोगलेल्या  व्यक्तींची माहिती त्यांचे नाव , पत्ता, दूरध्वनी क्र. /मो.क्र. आणीबाणी काळातील आंदोलनातील  त्यांचा सहभाग/ केलेल्या कार्याची माहिती शासनस्तरावर तात्काळ  सादर  करावयाची आहे. त्याअनुषंगाने  हिंगोली जिल्ह्यातील सदर  आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या  व्यक्तींची माहिती त्यांचे नाव , पत्ता, दूरध्वनी  क्र./मो.क्र या‍विषयीची माहिती मागविण्यात येत आहे.
 हिंगोली जिल्ह्यातील सन 1975 ते 77 या आणीबाणी कालावधीत या आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींनी संबंधित तहसिल कार्यालयाकडे दिनांक 8 मार्च 2018 पर्यंत अर्ज सादर करावे , विहित कालावधी संपल्यानंतर अर्ज स्विकारला जाणार नाही , असे अपर जिल्हादंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
000000