23 March, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन




  जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन  

            हिंगोली, दि. 23:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 23 मार्च हा शहिद दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.    
            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. मनियार, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. विनोद कुलकर्णी , प्रकल्प अधिकारी श्री. विशाल राठोड ,  निवासी  उपजिल्हाधिकारी श्री. लतीफ पठाण , उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. तडवी  आणि जिल्हा माहिती अधिकारी श्री. अरुण सुर्यवंशी आदि विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.  
00000



कोषागार आणि उपकोषागार कार्यालय 31 मार्च रोजी


कोषागार आणि उपकोषागार कार्यालय 31 मार्च रोजी
रात्री 11.00 वाजेपर्यंत सुरु राहणार

            हिंगोली,दि.23: महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील  नियम क्रमांक 409 अन्वये  प्राप्त  प्राधिकारानुसार दिनांक 31 मार्च 2018 रोजी शासकीय रोखीचे व्यवहार  पूर्ण करण्याच्या  दृष्टीने  सदर दिवशी  स्टेट बँक ऑफ इंडिया  यांच्या शाखा हिंगोली , वसमत , कळमनुरी , सेनगाव व स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औंढा ना. आणि जिल्हा कोषागार कार्यालय , हिंगोली  तसेच बँकींग  उपकोषागारे  वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा ना. दिनांक 31 मार्च 2018 रोजी उशिरापर्यंत रात्री 23.00 वाजेपर्यंत शासनाचे रोखीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू ठेवावीत, असे जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी कळविले आहे .
00000

पालकमंत्री मा.ना.श्री.दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री मा.ना.श्री.दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
            हिंगोली,दि.23: सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय्य , मदत व पुनर्वसन , भूकंप पुनर्वसन , अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .
            दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता लिंबाळा तांडा ता. सेनगांव येथे आगमन व इजिमा  22 ते लिंबाळा  आमदरी  रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन , दुपारी 12.15 वाजता  वाहनाने कापडसिंगी मार्गे बर्डा ता. सेनगावकडे प्रयाण, दुपारी 01.00 वाजता  महादेव मंदिर बर्डा येथे आगमन  व कापडसिंगी  ते बन रोडच्या  कामाचे भूमिपूजन तसेच राज्य रस्ता 227 ते पिंप्री  बर्डा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन , दुपारी 01.30 वाजता वाहनाने कापडसिंगी ता. सेनगांवकडे प्रयाण , दुपारी 01.45 वाजता कापडसिंगी ता. सेनगाव येथे आगमन व राखीव,  दुपारी 02.15 वाजता वाहनाने भानखेडा – कवठा मार्गे जयपूर ता. सेनगावकडे प्रयाण , दुपारी 2.45 वाजता  जयपूर ता. सेनगाव येथे आगमन व जयपूर ते वेलतुरा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन , दुपारी 03.15 वाजता वाहनाने वेलतुरा  ता. सेनगाव कडे प्रयाण , दुपारी 3.30 वाजता  वेलतुरा ता. सेनगाव येथे आगमन  व रस्त्याचे भूमिपूजन , दुपारी 03.45 वाजता वाहनाने कोळसा  ता. सेनगाव कडे प्रयाण ,  दुपारी 04.00 वाजता  कोळसा ता. सेनगाव  येथे आगमन  व कोळसा  132 केव्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा , सायं. 05.00 वाजता  वाहनाने सेनगाव कडे प्रयाण , सायं.05.15 वाजता  सेनगाव येथे आगमन  , सायं.06.00 वाजता सेनगाव येथून वाहनाने मकोडी कडे प्रयाण , सायं. 06.30 वाजता  मकोडी ता. सेनगाव  येथे आगमन  व रस्त्याचे  भूमिपूजन , रात्री 08.00 वाजता वाहनाने येलदरी-जिंतूर –जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण .
00000



21 March, 2018

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा सादर करणेकरीता मुदतवाढ


           जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणी

पुरवठा करण्यासाठी निविदा सादर करणेकरीता मुदतवाढ


            हिंगोली,दि.21: जिल्ह्यातील ग्रामीण/नागरी भागातील टंचाईग्रस्त गाव/वाड्या/तांड्यांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेकरीता यापुर्वी ई-निविदा सादर करणेबाबत प्रसिध्दी करण्यात आली होती. परंतू त्यानुसार अद्यापपर्यंत एकही निविदा प्राप्त झाली नसल्याने सदर कामाकरीता दि. 27 मार्च 2018 रोजी दूपारी 12 वाजेपर्यंत ई-निविदा सादर करण्याकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर निविदा या http://mahatenders.gov.inwww.hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छूकांनी सदर कामाकरीता दि. 27 मार्च 2018 रोजी दूपारी 12 वाजेपर्यंत आपल्या ई-निविदा सादर कराव्यात असे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.  

20 March, 2018

हिंगोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन


हिंगोली येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
            हिंगोली, दि.20: जिल्हा कौशल्य  विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने दि. 21 व 22 मार्च 2018 रोजी  11:00 वाजता  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय ईमारत एस- 3 तिसरा माळा, जिल्हाधिकरी कार्यालय परीसर, हिंगोली  येथे Sales Representative, Operator, Trainee, Trainee Appreciate या पदांसाठी  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आला असून खालील उद्योजक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.                   
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
अ.क्र.
उद्योजकांची नाव
पदांचे नाव
पदसंख्या
शैक्षणिक पात्रता
वेतन
1
नवभारत फर्टीलायजर लीमीटेड
Sales Representative
40
12 वी पास
10,000 ते 12,000
2
रेमण्ड कॉटन्स लिमीटेड, अमरावती
Operator
50
ITI दोन वर्षाचा
5,700 व उपस्थिती भत्ता
3
धूत ट्रान्समिशन प्रा.लि. औरंगाबाद.
Trainee
100
12 वी पास

7,500 ते 9,000
Trainee Appreciate
50
ITI
            
            रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी mahaswayam.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावे/पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अप्लाय सदर कार्यालयात दि. 21 मार्च रोजी वेळ 11.00 ते 2.00 यादरम्यान करुन देण्यात येईल.अधिक माहितीसाठी या mahaswayam.in वेबपोर्टलला भेट द्या किंवा कार्यालयाच्या दुरध्वनी 02456 -224574 वर संपर्क साधावा. वरील शैक्षणिक पात्रताधारक शिक्षित विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, सेवायोजन कार्ड घेवून दिलेल्या पत्यावर स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, हिंगोली, यांनी केले आहे.
000000