27 September, 2017

खाजगी ऑटोरिक्षाची परिवहन संवर्गात नोंदणी करण्यास मुदतवाढ

हिंगोली, दि. 27 : खाजगी संवर्गात नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा परिवहन संवर्गात नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2018 पर्यंतच असणार आहे. ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांनी याची नोंद घेऊन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे अर्ज करून परवाने घेण्यात यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले आहे.
 ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाद्वारे तसेच राज्यातील इतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी तीन चाकी, तीन आसनी काळया पिवळया, ऑटोरिक्षा टॅक्सी परवान्यांच्या संख्येवर अथवा नव्याने परवाने जारी करण्यावर घातलेले निर्बंध शासन निर्णय दि. 22 सप्टेंबर 2017 अन्वये उठविले आहेत.  
खाजगी संवर्गात नोंदणी असणाऱ्या ऑटोरिक्षा नवीन परवान्यावर परिवहन संवर्गात नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. याकरिता अर्जदारास विहित नमन्यातील अर्ज, परवाना शुल्क, शासनाने विहित केलेले अतिरिक्त परवाना शुल्क अदा करावे लागणार आहे. जे अर्जदार दि. 18 जुलै, 2017 रोजीच्या शासन निर्णयातील अटी शर्ती पूर्ण करतील अशा ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत परवाने जारी करण्यात येणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


*****

25 September, 2017

अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागचा छापा

हिंगोली, दि.25: हिंगोली तालूक्यातील मौ. पेडगाव येथील शेकुराव तुकाराम पोले, वय वर्ष 35 या इसमास देशी दारुची अवैध विक्री करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज छापा मारुन सदर इसमास अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या या छाप्यात देशी दारु भिंगरी संतराच्या 16 सिलबंद बाटल्या ज्याची सुमारे रु. 842 रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ङ अन्वये संबंधीत इसमावर गुन्हा रजिस्टर क्रमांक 46/2017 नोंदविण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागने दिली आहे.
गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आरोपींनी मौ. सिरसम येथील डी.बी. जैस्वाल यांच्या देशी दारु किरकोळ विक्री दुकानातून विनापरवाना आणलेला असल्याचे व मागील अनेक महिन्यापासून विनापरवाना देशी दारुवरील दूकानदारांकडून आणून त्याची विक्री करीत असल्याचा जबाब आरोपीने दिला आहे. यामुळे संबंधित देशी दारु दुकानदार डी.बी. जैस्वाल यांनाही कारणे दाखवा नोटीस देवून अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द का करण्यात येवू नये ? अशी विचारणा करण्यात आली आहे. अनुज्ञप्तीधारकाचे समाधानकारक उत्तर प्राप्त न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधीताची अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती ही राज्य उत्पादन शुल्क विभागने दिली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायती निवडणूक आदर्श आचारसंहिता कालावधीत सर्व अनुज्ञप्तीधारकाने आचार संहितेचे अनुज्ञप्तीच्या नियम व अटीचे पालन करावे, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
***** 

22 September, 2017

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध
 
            हिंगोली , दि. 22 : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्री व जुने लोकराज्य मासिकांची विक्री करण्यात येणार आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, अशा नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी त्यांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक मा. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस-6, हिंगोली या पत्यावर दि. 5 ऑक्टोबर, 2017 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील . 
            रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील .

***** 
खरीप हंगामात 24 तासात सरासरी 8.49 मि.मी. पाऊस

           हिंगोली, दि. 22 :  जिल्ह्यात शुक्रवार, दिनांक 22 सप्टेंबर, 2017 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 42.44 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी 8.49 मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 576.48 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 64.75 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  शुक्रवार दि. 22 सप्टेंबर, 2017 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 6.71 (594.70), वसमत - 11.57 (569.29), कळमनुरी - 7.83 (399.51), औंढा नागनाथ - 9.00  (728.75) , सेनगांव - 7.33 (590.16). आज  अखेर  पावसाची सरासरी 576.48 नोंद झाली.

*****  
नेहरु युवा केंद्राच्या वतीने स्वच्छता जागरुकता अभियान

हिंगोली, दि. 22 :  नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता जागरुकता अभियानास मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर विकास दिवसापासून ते 02 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत सदरील अभियान असून या अभियानाचे उद्घाटन प्रा. शाळा सिद्धार्थ नगर हिंगोली येथे कै. वैजनाथअप्पा नागनाथअप्पा सराफ आणि मुख्याध्यापक शामराव इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्तीक इंगोले यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तीक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता यावर चंदा रावळकर जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र, हिंगेली यांनी मार्गदर्शन केले तसेच घरोघरी शौचालय बांधून त्याचा उपयोग घेऊन आपला आरोग्य सुदृढ ठेवण्याबाबत 300 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून श्री. इंगोले यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गासहित आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेकडून सुंदरतेकडे वाटचाल करावी यासाठी मार्गदर्शन केले.
तसेच आज दि. 22 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली येथे नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक व नेहरु युवा मंडळांच्या 101 कार्यकर्त्यांसह कृषी उत्पन्न बाजार समिती  परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छतेच्या उपक्रमात डॉ. जब्बार पटेल सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली, चंदा रावळकर जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र, हिंगोली यांनीही परिसराची स्वच्छता करून या कार्यक्रमात सहभागी झाले.


*****
स्वच्छता ही सेवा अभियान जनजागृती करीता स्वच्छता चित्ररथ

हिंगोली, दि. 22 :  स्वच्छ भारत मिशन ग्रा.अंतर्गत पंचायत समिती वसमत येथील सभागृहात स्वच्छता ही सेवा अभियान बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी श्री. माने यांनी मार्गदर्शन पर बैठकीत स्वच्छता हि सेवा अभियान मधील विविध उपक्रमाचा व ग्रामपंचायत स्तरावरील गृहभेटी संवाद व प्रभाग अधिकारी यांनी दिलेल्या नियोजन व परीपत्रकाप्रमाणे योग्य वेळेत गृहभेटी व शौचालय बाधकाम, फोटो अपलोडिंग, ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता ही सेवा या अभियान राबविनेसाठी बाबत आढाव घेण्यात आली आहे. तसेच गावामध्ये स्वच्छता फेरी, शालेय विद्यार्थ्याकरीता उपक्रम राबवावेत व व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी केले.
            ग्रामपंचायत स्तरावर कुंटुबांना गृहभेटी देण्यासाठी तालुकास्तरावर चित्ररथाव्दारे गृहभेटी व गावामध्ये चित्ररथाव्दारे जनजागृती व मार्गदर्शन गावातील वैयक्तीक शौचालय पाहणी व शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना भेटी देवुन शौचालय बांधकामाबाबत मार्गदर्शन व शौचालयाचा वापर व महिला या बाबत जाणीव जागृती स्वच्छतेचे महत्व गावातील महत्व पटवुन देण्यासाठी स्वच्छता ही सेवा अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे महत्वाचे आहे. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी श्री. देशमुख व विस्तार अधिकारी प.सं अ.श्री. आठवले व जिल्हा कक्षातील तज्ज्ञ प्रथमेश घोंगडे, समाधान साठे , श्री. खंदारे, श्री. खिराडे उपस्थित होते.

*****


19 September, 2017

सन 2017-18 हंगामासाठी सुधारित किमान आाधारभूत किंमती जाहिर
           हिंगोली,दि.19 : केंद्र  शासनाने  यावर्षीच्या  खरीप  हंगामासाठी  विविध  कृषि उत्पादनाच्या  सुधारीत किमान आधारभुत किंमती (Minimum Support Price (MSP) जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. सन 2017- 18 या हंगामासाठी सुधारीत किमान आधारभूत किंमती (एफ.ए.क्यू. दर्जाच्या) प्रती  क्विंटल पुढील प्रमाणे जाहिर केल्या आहेत.  
अ.क्र.
पिकाचे नांव
प्रकार
2017-18 MSP (रक्कम रु.)
1

धान
सर्वसाधारण
रु. 1550
अ-ग्रेड
रु. 1590
2
ज्वारी
हायब्रिड
रु. 1700
मालदांडी
रु. 1725
3
बाजरी
सर्वसाधारण
रु. 1425
4
मका
सर्वसाधारण
रु. 1425
5
रागी
सर्वसाधारण
 रु. 1900
6
तूर
सर्वसाधारण
रु. 5450
7
उडीद
सर्वसाधारण
रु. 5400
8
कापूस
मध्यम धागा
रु. 4020
लांब धागा
रु. 4320
9
मूग
सर्वसाधारण
रु. 5575
10
भुईमूग
सर्वसाधारण
रु. 4450
11
सुर्यफूल
सर्वसाधारण
रु. 4100
12
सोयाबीन
पिवळा
रु. 3050
13
तीळ
सर्वसाधारण
रु. 5300
14
कारळ
सर्वसाधारण
रु. 4050

*****