04 September, 2017

ऊर्जा स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे ‘संवादपर्व’ उपक्रम संपन्न
               हिंगोली, दि. 4 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयामार्फत दि. 1 सप्टेंबर, 2017 रोजी संवादपर्व उपक्रमाचे आयोजन ऊर्जा स्किल डेव्हलपमेंट सेंटर, हिंगोली येथे करण्यात आले होते.
            सदरच्या संवादपर्व उपक्रमास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन प्र. सो. खंदारे हे उपस्थित होते.
            सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी या कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाची माहिती दिली.
            यावेळी केंद्र प्रमुख श्रीमती फड व श्री. फड तसेच अनेक महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.

*****

No comments: