04 September, 2017

नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा
सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर

        हिंगोली, दि. 4 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या दोन महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकरिता मतदान दिनांक 07 ऑक्टोबर, 2017 रोजी तर दि. 09 ऑक्टोबर, 2017 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी हिंगोली यांनी दिली आहे.
            ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे 1) तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याची गुरूवार, दिनांक 07 सप्टेंबर, 2017, 2) नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दि. 15 सप्टेंबर, 2017 (शुक्रवार) ते दि. 22 सप्टेंबर, 2017 (शुक्रवार)  सकाळी 11.00 वा. पासून ते दुपारी 4.30 पर्यंत (दि. 17 सप्टेंबर, 2017 व ज्या जिल्ह्यात दि. 21 सप्टेंबर, 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी असेल तो दिवस वगळून), 3) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार, दि. 25 सप्टेंबर, 2017 सकाळी 11.00 वाजेपासून छाननी संपेपर्यंत, 4) नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2017 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, 5) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची दिनांक व वेळ बुधवार, दि. 27 सप्टेंबर, 2017 दुपारी 3.00 वा. नंतर, 6) आवश्यक असल्यास मतदानाचा शनिवार, दिनांक 07 ऑक्टोबर, 2017 सकाळी 7.30 वा. पासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत, 7) मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.) सोमवार, दि. 09 ऑक्टोबर, 2017, 8) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूकांचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक बुधवार, दि. 11 ऑक्टोबर, 2017.

***** 

No comments: