07 September, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
हिंगोली, दि. 7 :  राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हानिवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

                                                            *****

No comments: