31 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 03 रुग्ण ;  तर 02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

18 रुग्णांवर उपचार सुरु

हिंगोली, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यात 03 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे  सेनगाव  परिसरात 02 व्यक्ती असे एकूण 03 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 02 रुग्ण बरे झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 04 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 998 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 592 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 388 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

30 July, 2021

 

आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावणे व दर्जेदार खेळाडू, क्रीडा संधी निर्माण करण्यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र स्थापन करण्यात आले आहे. या क्रीडा विद्यापिठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाचे क्षेत्र विचारात घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात दर्जेदार मार्गदर्शन व खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळणार आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह (लोगो) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात  आली आहे. या स्पर्धेचे नियम, अटी व पुरस्काराची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या स्पर्धेत भारतातील कोणीही नागरिक भाग घेऊ शकतात. तसेच या स्पर्धेसाठी आपले बोधचिन्ह (लोगो) तयार करुन सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, 2021 असा राहील. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये व 20 हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. तसेच महाविद्यालयीन युवक युवतींनीही सहभागी होऊन तयार केलेला लोगो isumaharashtra@gmail.com या ई-मेल पत्यावर पाठवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे .

*****

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 03 रुग्ण ;  तर 05 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

17 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात 03 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे  वसमत  परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 03 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 05 रुग्ण बरे झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 03 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 01 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 04 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 995 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 590 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 388 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

29 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण ;  तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

19 रुग्णांवर उपचार सुरु, एका रुग्णाचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे  हिंगोली  परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज एक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 05 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 02 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 07 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 992 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 585 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 388 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

12 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील, अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्याकडून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून उपलब्ध निधीच्या अधीन राहून जेष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास  निधीच्या उलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करुन वितरण करण्यात येणार आहे.

यासाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थीनीनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश  घेतल्याची पावती, बोनाफाईड सर्टीफिकेट व जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रांसह दि. 12 ऑगस्ट, 2021 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) हिंगोली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली फोन नं.02456-223831 येथे संपर्क साधावा. तसेच उशीरा आलेल्या अर्जाचा मुख्यालयामार्फत विचार करण्यात येणार नाही, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******


 

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे गृहभेटी देऊन समुपदेशन करावे

                                --- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

·         जिल्ह्यातील 111 बालकांना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ

·         प्रती लाभार्थ्यास मिळणार 1100 रुपये मासिक अनुदान

हिंगोली (जिमाका), दि.29:  कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या घरी गृहभेटी देऊन त्यांचे समुपदेशन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत दिल्या.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 जुलै, 2021 रोजी जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कोविड साथीच्या काळात पालक गमावलेल्या बालकांचे योग्य संगोपन आणि देखभाल करण्यासाठी जिल्हा कृती दलाची (District Task Force) स्थापना करण्यात आली आहे. कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 18 वर्षा खालील बालकांची एकूण संख्या 111 झाली आहे. या सर्व बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या बालकांची शैक्षणिक फिस देखील शासन स्तरावर भरली जाणार आहे. तसेच कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या आर्थिक मालमत्ता बालकांच्या नावे करण्यासाठी शासन स्तरावर मदत केली जात आहे. जिल्ह्यात 111 बालकांपैकी 108 बालकांनी एक पालक गमावले आहेत. तर 03 बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. या सर्व 111 बालकांना प्रती लाभार्थी 1100 रुपये मासिक अनुदान त्यांच्या बँक खात्यावर मिळणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कृती दल सदस्य सचिव विठ्ठल शिंदे यांनी कळविले आहे.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, बाल कल्याण समिती सदस्या ॲड.वैशाली देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक सरस्वती कोरडे, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******


 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कामकाजाचा आढावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 29 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक दि. 27 जुलै, 2021 रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  या बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा बाल सरंक्षण कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीमध्ये सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य व सदस्य सचिवांना दिलेले प्रशिक्षण तसेच कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी तसेच जिल्ह्यातील बालगृह आणि त्यातील बालकांची कोविड काळात घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, विशेष बाल पोलीस पथक अधिकारी, जिल्हा न्यायिक सेवेचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कामगार अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. हिंगोली, जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती सदस्या, बाल न्याय मंडळ सदस्य, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक संदीप कोल्हे आदी उपस्थित होते.

******

28 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही ;  

01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज, तर 20 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर 01 रुग्ण बरा झाल्यांने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला जिल्ह्यात एकूण 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 05 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 02 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 07 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 991 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 584 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 387 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****  

 



खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओवरील

आक्षेपार्ह प्रसारणावर राहणार नियंत्रण

·         जिल्हास्तरीय केबल टेलिव्हिजन नेटवर्क सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

 

हिंगोली,(जिमाका)दि. 28 : खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 नुसार जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज दि. 28 जुलै, 2021 रोजी मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

या बैठकीत खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सर्व खाजगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 चे पालन करणे बंधनकारक असून, सदर कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खाजगी वाहिन्यांनी फ्रि टू एअर वाहिन्या आणि  दूरदर्शन वाहिन्याचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला असणार आहेत. अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्ये मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. ज्या नोंदणीकृत खाजगी वाहिन्या किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह प्रक्षेपण करत असतील अशा वाहिन्यांची किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास सदर कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच अनिवार्य वाहिन्यांच्या प्रक्षेपणात व्यत्यय येणे, सिग्नल न मिळणे अशा त्रूटी आढळल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्राधिकृत आधिकाऱ्यांनी संबंधित केबल ऑपरेटरला समज द्यावी. जिल्ह्यातील कार्यरत खासगी एफ.एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सद्वारे हवाई प्रसारण संहितेचे पालन होते का नाही यावर लक्ष व नियंत्रण ठेवावे. तक्रारींची शहानिशा करुन केबल चालक किंवा खासगी एफ.एम. रेडिओ विरुध्द तात्काळ योग्य ती कारवाई करावी. जर एखाद्या कार्यक्रमाचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असेल किंवा कोणत्याही समाजात असंतोष निर्माण होत असेल तर तात्काळ मा. जिल्हाधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या त्वरित नजरेस आणून द्यावे. तसेच जिल्ह्याकरिता तक्रार निवारण केंद्राची स्थापना करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने स्थानिक वृत्त वाहिन्यांना केबल ऑपरेटर म्हणून नोंदणी देण्याऐवजी फक्त केबल ऑपरेटर किंवा केबल परिचालक म्हणूनच परवानगी द्यावी. टपाल विभागानेही याबाबतची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ.एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी  दिल्या.

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव अरुण सुर्यंवशी यांनी या खाजगी दूरचित्रवाणी सनियंत्रण समितीची रचना व तीची कार्ये तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरात याविषयी दर्शकांकडून येत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच केबल वाहिन्या आणि केबल चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभर कायदा लागू केला आहे. तसेच स्थानिक खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ.एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्राचे सनियंत्रण करण्याचे काम ही समिती करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

या बैठकीस समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी प्र. भु. शेळके, सरजूदेवी भिकूलाल आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मंगला गायकवाड, महिलासाठी काम करणाऱ्या उज्वल प्रसारक मंडळ या स्वयंसेवी संस्थेचे उज्वल पाईकराव, समर्थ पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधी तथा दूरदर्शन स्ट्रींजर अरुणा होकर्णे यांची उपस्थिती होती.

****  

27 July, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 03 रुग्ण ;  तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

21 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात 03 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे  सेनगाव परिसरात 03 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 04 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. 02 कोविड-19 रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 06 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 991 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 583 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 387 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****