29 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 09 रुग्ण ; तर 06 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  101 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

        हिंगोली,दि. 29 : जिल्ह्यात 09 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती, सेनगांव परिसरात 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे सेनगांव परिसर 01 व्यक्ती, हिंगोली परिसर 03 व्यक्ती असे एकूण 09 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 06 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 14  रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 02 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 16 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 70 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 920 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 101 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 49 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

पंडीत दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन

 

 

 

हिंगोली, दि. 29 : महाराष्ट्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत दिनांक 01 नोव्हेंबर, 2020 ते दिनांक 07 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय आटो पार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्ट्रीज लि. औरंगाबाद, चौगुले इंडस्टीज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय, औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडिया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली. विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स, उस्मानाबाद, धूत टान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद, ॲसेंसीव्ह एज्युकेशन लि. पुणे व श्री साई रिसर्च लॅब इत्यादी नामांकित उद्योजकांनी एक हजार 902 रिक्त पदे ऑनलाईन भरण्यासाठी मागणी नोंदविली आहे .

या रिक्त पदासाठी एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए. इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी लाभ घ्यावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे.

याबाबत काही अडचण आल्यास 9860015383, 9623020934, 7385924589 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. तसेच रिक्त पदांची माहिती  दररोज अद्यायावत करण्यात येते. उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, औरंगाबादचे उपायुक्त अ.भि.पवार, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोलीचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे.

 

****

28 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 06 रुग्ण ; तर 12 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 98 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 28 : जिल्ह्यात 06 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे कळमनुरी परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती असे एकूण 06 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 12 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 10 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 01 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 61 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 914 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 98 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 49 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

हिंगोली जिल्ह्यासाठी प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व मान्यता समिती स्थापन

         हिंगोली,दि. 28 : एक पालकत्व अनाथ, आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या मूलांना कुटुंबाचा आधार मिळावा. वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचे संगोपन कुटुंबात व्हावे. यासाठी प्रतिपालक योजना तयार करण्यात आली आहे.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मान्यतेने हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. विक्रम काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे, (धान फाऊंडेशन) स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधी अक्षय पतंगे, (साथ फाऊंडेशन) स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधी श्रीमती मिराबाई गणगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याद्वारे नाम निर्देशित प्रतिनिधी  यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर या समितीच्या सदस्य सचिवपदी संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जबीरखान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या मुलांसोबत गरजू मुलांना सांभाळ करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा पर्याय यामुळे उपलब्ध झाला आहे. मुलांना दत्तक घेण्यासाठी योजना आहे. मात्र दत्तक घेणारे शक्यतो लहान मुलांनाच दत्तक घेणे पसंत करतात. वयाची सहा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना नाईलाजास्तव बालगृहातच वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहावे लागते.

            राष्ट्रीय बाल धोरणानुसार बालकांचे संगोपन कुटुंबातच व्हावा याला प्राधान्य देण्यात आले आहे. कुटूंब हा बालकांचा हक्क असल्याचे मान्य करण्यात आले आहे. बाल न्याय अधिनियमातील मार्गदर्शक सूचनांमध्येही बालकांना संस्थेत दाखल करणे, हा अंतिम पर्याय असल्याचे म्हटले आहे. प्रतिपालक योजनेमुळे आता या मुलांनाही मायेचा आधार मिळणार आहे.

            अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, एस-7, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली-431513 यांच्याशी dwandcdoh@gmail.com, dwandcdoh@yahoo.co.in, hingolidcpu1@gmail.com  या ई-मेल पत्यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.  

****

27 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 05 रुग्ण ; तर 06 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 104 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 27 : जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती, कळमनुरी  परिसरात 02 तर आरटीपीसीआरद्वारे वसमत परिसर 01 व्यक्ती असे एकूण 05 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 06 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 07 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 02 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 09 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 55 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 902 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 104 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 49 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

23 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 16 रुग्ण ; तर 25 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

·  194 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 23 : जिल्ह्यात 16 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 05 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती व कळमनुरी परिसर 03 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 05 व्यक्ती व कळमनुरी परिसर 02 व्यक्ती असे एकूण 16 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 25 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 10 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 02 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 29 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 788 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 194 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 47 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

21 October, 2020

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे प्रस्ताव बँकांनी तातडीने निकाली काढावीत --- नरेंद्र पाटील

 



 

        हिंगोली,दि. 21 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव बँकांनी तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.

            येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठकीत श्री. पाटील हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त  प्र.सो. खंदारे, मराठा समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

            यावेळी बोलतांना श्री. पाटील म्हणाले,  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजना ही मराठा समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील लाभार्थ्यांच्या उन्नतीसाठी सुरु करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या तरुणाला मुख्य प्रवाहामध्ये आणून मराठा समाजात उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 208 प्रकरणे मंजूर झाली असून 10 कोटी 66 लाख रुपयांचे लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत बँकांकडे प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणाचा निपटारा तातडीने करावा. तसेच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात कसूर करणाऱ्या बँक व्यवस्थापकांवर कारवाई करावी. तसेच या बैठकीस गैरहजर असलेल्या बँकेच्या जिल्हा समन्वयकांना नोटीस देवून त्यांच्याकडून खुलासा घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. या योजनेचे काम पूर्णपणे ऑनलाईन असून सर्व कागदपत्रे ऑनलाईन जमा करुन तसे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेकडे प्रस्ताव द्यावा लागतो. ही प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे पूर्णपणे पारदर्शक असून यासाठी बँकानी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ ग्रामीण भागातील मराठा समाजातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठी सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांनी आपल्या अखत्यारितील बँकांना पत्र पाठवून या योजनेची माहिती द्यावी. आरसीटी व कौशल्य विकास कार्यालयाच्या माध्यमातून महामंडळाचे लाभ घेवू इच्छिणाऱ्यांना त्या विषयाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देण्यासाठी तशी तरतूद करण्यात येणार असून तालुकास्तरावर तेथील बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन महामंडळाच्या योजनेविषयी माहिती देण्याचा उपक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 हजार लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट  असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यामागची भूमिका विशद करुन सर्व बँकांना व लाभार्थ्यांना या योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी लाभार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाना समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान केले. 

            जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची ही योजना मराठा समाजातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यशस्वी योजना असल्याचे सांगतांना या महामंडळाचे प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रत्येक बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या बैठकीस उपस्थित असलेल्या बँक समन्वयकांना नोटीस देवून विचारणा करण्यात येईल, असे सागितले.

            याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक रविप्रकाश कदम यांचा महामंडळाला सहकार्य जास्तीत प्रकरणे मंजूर केल्यामुळे त्यांचा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच लाभार्थ्यांना वितरीत केलेल्या जेसीबी मशीनचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशीकांत सावंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बालाजी शिंदे, सर्व बँकाचे जिल्हा समन्वयक तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 13 रुग्ण ; तर 15 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

·  212 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

        हिंगोली,दि. 21 : जिल्ह्यात 13 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 02 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 02, औंढा परिसरात 04 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती व वसमत परिसर 03 व्यक्ती असे एकूण 13 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 13 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 04 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 17 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 3 हजार 4 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 745 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 212 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 47 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 

19 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण ; तर 02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 219 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 19 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 10 व्यक्ती, वसमत परिसरात 01, कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 05 व्यक्ती व कळमनुरी परिसर 05 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 02 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 18 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 04 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 22 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 979 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 713 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 219 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 47 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

16 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 13 रुग्ण ; तर 15 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 196 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 16 : जिल्ह्यात 13 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 03 व्यक्ती, वसमत परिसरात 01, कळमनुरी परिसरात 03 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 06 व्यक्ती असे एकूण 13 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 15 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 26 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 07 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 33 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 922 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 681 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 196 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 45 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

तृतीय पंथीयांना 24 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 हिंगोली, दि.16 : राज्यातील  तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी, ट्रांसजेंडर हा समाज दुर्लक्षित घटक आहे.

या समाज घटकाचा सर्वांगीण विकास एवम उन्नती व्हावी, त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे चिरागशहा बाबा दर्गाह रोड, रिसालाबाजार, हिंगोली यांच्या कार्यालयात दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन गिता गुठ्ठे, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

*****

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते बाल संरक्षण माहिती पुस्तिकेचे विमोचन


हिंगोली,
 दि. 16 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ‘‘बाल संरक्षण माहिती पुस्तिका’’ तयार करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे विमोचन आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, विधी सल्लागार विद्या नागशेट्टीवार, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी, परिविक्षा अधिकारी सुनिता पुजलवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखॉन पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड . अनुराधा पंडित आदी उपस्थित होते.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेत जिल्ह्यातील बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणा, बालकांसाठीच्या योजना व कायदे, अधिकार याबाबतची माहिती  देण्यात आली आहे.

*****

15 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 19 रुग्ण ; तर 13 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 198 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 15 : जिल्ह्यात 19 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 04 व्यक्ती, कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती, सेनगाव परिसर 08 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती असे एकूण 19 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 13 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

       सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 26 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 05 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 31 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 909 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 666 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 198 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 45 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****