28 June, 2018

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.68 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.68 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली, दि. 28 : जिल्ह्यात गुरूवार दिनांक 28 जून, 2018 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील  24  तासात एकुण 18.40 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्ह्यात दिवसभरात सरासरी  3.68  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 239.75 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर एकुण 26.86 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात  गुरूवार दि. 28 जून, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 6.57  (241.11), वसमत - 0.00 (268.84), कळमनुरी - 0.50 (237.50), औंढा नागनाथ - 0.00  (248.00) , सेनगांव - 11.33 (203.31) आज अखेर पावसाची सरासरी 239.75 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

27 June, 2018

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम – 2013 अंतर्गत जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम – 2013
अंतर्गत जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी यांची
तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती

हिंगोली, दि. 27 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य अन्न आयोगाची स्थापना झाली असून शासनाने दि. 07 एप्रिल, 2017 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्याकरिता अप्पर जिल्हाधिकारी यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी यांचे स्तरावर त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांचा समावेश करून एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून अधिनियमामध्ये अभिप्रेत असलेली तक्रार निवारण यंत्रणा उभी करून तक्रार निवारणाचे कामकाज हाताळण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी  व त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचारी यांचे मिळून तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येत असून आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व अन्य यंत्रणा यांची चौकशी कामी मदत घेण्याचे याव्दारे आदेशीत करण्यात येत आहे. सदर कक्ष अप्पर जिल्हाधिकारी यांचे कक्षात कार्यरत राहील. सदर कक्षाकरिता 02456-221466 हा दुरध्वनी क्रमांक व addcoll.hingoli@gmail.com हा ई-मेल पत्ता वापरात घेण्यात यावा, असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.
*****

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 21.19 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 21.19 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली, दि. 27 : जिल्ह्यात बुधवार दिनांक 27 जून, 2018 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील  24  तासात एकुण 105.93 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्ह्यात दिवसभरात सरासरी  21.19  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 236.07 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर एकुण 26.44 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात  बुधवार दि. 27 जून, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 17.29  (234.54), वसमत - 27.14 (268.84), कळमनुरी - 22.00 (237.00), औंढा नागनाथ - 26.50  (248.00) , सेनगांव - 13.00 (191.98) आज अखेर पावसाची सरासरी 236.07 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

26 June, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन


जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
        हिंगोली,दि.26: जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

विद्यार्थ्यांनी व्दिलक्षी अभ्यासक्रमास मान्यता असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा


विद्यार्थ्यांनी व्दिलक्षी अभ्यासक्रमास मान्यता असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा

हिंगोली, दि. 26 : जिल्ह्यातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी इयत्ता - 11 वी व्दिलक्षी अभ्यासक्रमास ( क्रॉप सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र, इत्यादी ) प्रवेश घेत असतांना सदरील अभ्यासक्रमास शासनाची मान्यता असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यात यावा. शासनाची मान्यता नसलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास होणाऱ्या परिणामास संबंधित विद्यार्थी स्वत: जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
शासनामान्य प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी स्टेडियम जवळ परभणी या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी (02452-221228) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परभणीचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सौ. एम. डी. देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा


परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा दौरा

हिंगोली, दि. 26 : राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.  
बुधवार, दि. 27 जून, 2018 रोजी सायंकाळी 06.00 वाजता परभणी येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 07.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन राखीव व मुक्काम.
गुरूवार, दि. 28 जून, 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता हिंगोली जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. सकाळी 11.30 वाजता हिंगोली येथून शासकीय मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
*****




राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण
                                                 -- शिवराणीताई नरवाडे

                                                      ·  सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

हिंगोली, दि.26 : देशाच्या व्यवस्थेला बदलविण्यात आणि सामाजिक क्रांतीला महाराष्ट्रातील शाहू- फुले-आंबेडकरांनी त्यावेळीच सुरुवात केली. मागास व वंचित घटकातील लोक शिकून पुढे गेले पाहिजेत ही शाहू महाराजांची भूमिका होती. त्याकाळात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र सुधारणा घडवून आणण्यात राजर्षी शाहू महाराजांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे यांनी केले.
26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण विभाग कार्यालय, हिंगोली यांच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार राजीव सातव, आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बी. एस. केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती नरवाडे म्हणाल्या की, आर्थिक विकासासह सामाजिक आणि शैक्षणिक विकास होण्याची आज आवश्यकता आहे. अन्याय करणे जसा गुन्हा आहे, तसाच अन्याय सहन करणे देखील गुन्हाच आहे. याकरीता समाजाने देखील जागृत होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आसपासच्या नागरिकांना जाती-पाती विरहीत समानतेची वागणुक दिली पाहिजे. समाज सुधारणांच्या कामासाठी या थोर समाज सुधारकांनी पुढाकार घेतला. त्यांचा समतेचा संदेश सर्वसामान्यपर्यंत गेला पाहिजे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती बंद झाल्या पाहिजेत. शाहू महाराजांनी मानव मुक्तीच्या दृष्टीने काम केले असल्याचेही श्रीमती नरवाडे यावेळी म्हणाल्या.
खासदार राजीव सातव म्हणाले की, शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले. मानवता आणि समाजवादी राजा म्हणून राजर्षी शाहू महारजांची वेगळी ओळख आहे.
आमदार श्री. वडकुते यावेळी म्हणाले की, शाहू-फुले-आंबेडकरांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणुन त्यांना न्याय देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात त्यांच्या करवीर संस्थानातून केली. शाहू महाराजांचा जन्मदिवस म्हणजे अत्यंत मौल्यवान दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केल्यामुळे मागास आणि वंचित घटकातील लोकांना उच्च शिक्षण घेता आले, महत्वाच्या पदावर काम करता आले. आरक्षणामुळे सामाजिक प्रगती होत असल्याचे ही यावेळी श्री. वडकुते यांनी सांगितले.
सामाजिक उत्थानाची प्रक्रिया ही शाहू-फुले-आंबेडकर या थोर समाज सुधारकामुळेच सुरु झाल्याचे सांगत जिल्हाधिकरी अनिल भंडारी पुढे म्हणाले की, या समाजसुधारकांनी विशिष्ट जातीच्या विकासासाठी काम केले नसून त्यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी काम केले आहे. शाहू महाराजांनी वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम आरक्षणाची सुरुवात केली.  सामाजिक न्याय विभाग समाजातील विविध घटकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. ज्या मुलांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांना निवासाच्या दृष्टीने वसतीगृहाची व्यवस्था यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.

            समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत-जास्त व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्ह्यातील आश्रम शाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.

            कार्यक्रमाला जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या आश्रमशाळा, वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनी, पत्रकार, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****


25 June, 2018

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी

 जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम

 

        हिंगोली,दि.25: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात एम. बी. बी. एस., बी. डी. एस. इ. वैद्यकिय अभ्यासक्रमास तसेच अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणी संदर्भात विशेष मोहिम राबविण्यासाठी आखण्यात आलेली आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्याचे असून त्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
            त्याअनुषंगाने या विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी / चुक किंवा अपुर्णता राहु नये, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या दावा पडताळणी प्रकरणी काही शंका असल्यास सदर शंकाचे निरसण व योग्य मार्गदर्शन करणेसाठी या समिती कार्यालयात विशेष सहाय्य कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तसेच या कार्यालयातील श्री. व्ही. एम. कटके पदनाम वरिष्ठ संशोधन अधिकारी यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. या कार्यालयाचा विशेष सहाय्य कक्ष व हेल्पलाईन नंबर / भ्रमणध्वनी क्रमांक – आस्थापना कक्ष दुरध्वनी क्र. 0240-2362901 असा आहे. करिता विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसण व योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
*****


सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी समता दिंडीचे आयोजन

 

        हिंगोली,दि.25: राज्य शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडीचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते होणार आहे. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी ही माहिती दिली.
            तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे जिल्हास्तरीय सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे सकाळी 11 वाजताआयोजन करण्यात आले आहे. सदर जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, आमदार सर्वश्री रामराव वडकुते, विक्रम काळे, सतिश चव्हाण, विप्लप बाजोरीया, डॉ. जयप्रकाश मुंदडा, तान्हाजी मुटकुळे, डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बी. एस. केंद्रे यांच्या  प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
            सदर कार्यक्रमातंर्गत मागासवर्गीयांच्या विविध योजना अंतर्गत पात्र लाभर्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभान्वीत करण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी या सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे असे आवाहन सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, डॉ. छाया कुलाल आणि गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
*****

23 June, 2018

जिल्ह्यात 24 तासात सरासरी 47.89 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात 24 तासात सरासरी 47.89 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली, दि. 23 : जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 जून, 2018 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील  24  तासात एकुण 239.47 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्ह्यात दिवसभरात सरासरी  47.89  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 205.89 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर एकुण 23.06 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात  शनिवार दि. 23 जून, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली - 57.43  (210.82), वसमत - 41.29 (241.56), कळमनुरी - 25.00 (201.67), औंढा नागनाथ - 88.25  (205.75) , सेनगांव - 27.50 (169.65) आज अखेर पावसाची सरासरी 205.89 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

22 June, 2018

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा


महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा
हिंगोली, दि. 22 : राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.  
रविवार, दि. 24 जून, 2018 रोजी दुपारी 01.30 वाजता वझुर ता. पुर्णा येथून वाहनाने औंढा नागनाथ जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता नागनाथ मंदिर येथे आगमन व राखीव. दुपारी 04.00 वाजता औंढा नागनाथ जि. हिंगोली येथून वाहनाने परभणीकडे प्रयाण करतील.
*****

भारत सरकार शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज सादर करण्याचे आवाहन


भारत सरकार शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने इत्यादी योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून राज्य शासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महाडिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्यामुळे सन 2017-18 या आर्थिक वर्षातील प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्विकारून अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्रथम प्रवेश विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, बि-स्टेटमेंटसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्याचे व नुतनीकरणाचे अर्ज स्कॉलरशिप पोर्टलवर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तथापि जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी प्रथम प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज, बि-स्टेटमेंटसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय हिंगोली येथे अद्यापही सादर केले नाही. तसेच काही महाविद्यालयाने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अर्जाचे नुतनीकरण केले नाही. या संदर्भात महाविद्यालयास वेळोवेळी पत्राव्दारे व दूरध्वनीव्दारे सुचना देऊनही काही महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर आहे.
तरी याव्दारे पुनश्च एकदा हिंगोली जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आपल्या स्तरावर असलेले सन 2017-18 चे प्रथम प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज, बि-स्टेटमेंट आणि नुतनीकरणाचे प्रस्ताव दि. 30 जून, 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयास सादर करण्यात यावे, अन्यथा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिल्यास तसेच भविष्यात सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास यास सर्वस्वी महाविद्यालय जबाबदार राहील, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****