25 June, 2018

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी

 जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम

 

        हिंगोली,दि.25: सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात एम. बी. बी. एस., बी. डी. एस. इ. वैद्यकिय अभ्यासक्रमास तसेच अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणी संदर्भात विशेष मोहिम राबविण्यासाठी आखण्यात आलेली आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्याचे असून त्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
            त्याअनुषंगाने या विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी / चुक किंवा अपुर्णता राहु नये, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या दावा पडताळणी प्रकरणी काही शंका असल्यास सदर शंकाचे निरसण व योग्य मार्गदर्शन करणेसाठी या समिती कार्यालयात विशेष सहाय्य कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तसेच या कार्यालयातील श्री. व्ही. एम. कटके पदनाम वरिष्ठ संशोधन अधिकारी यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. या कार्यालयाचा विशेष सहाय्य कक्ष व हेल्पलाईन नंबर / भ्रमणध्वनी क्रमांक – आस्थापना कक्ष दुरध्वनी क्र. 0240-2362901 असा आहे. करिता विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसण व योग्य मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
*****

No comments: