14 June, 2018

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता  पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
            हिंगोली,दि.14:- समाज कल्याण  विभागामार्फत  शाळेमधून किंवा कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता 10 वी किंवा 12 वी च्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांकाने  उत्तीर्ण होणारा  विद्यार्थी / विद्यार्थीनी जर अनुसुचित  जाती , विमुक्त जाती भटक्या  जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील  असल्यास त्या विद्यार्थी / विद्यार्थीनीला राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता  पुरस्कार या योजनेअंतर्गत  रुपये पाच हजार प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जातो. सदर पुरस्कारासाठी  पात्र  विद्यार्थ्यांच्या प्रस्तावासोबत आवश्यक असणारी  कागदपत्रे  पुढीलप्रमाणे आहेत- मुख्याध्यापक / प्राचार्य यांचे पत्र, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत,  विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्‍याची छायांकित प्रत , शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत , विद्यार्थ्यांचे  नावाचे बँक खाते  क्रमांकाची  बँक पासबुकची छायांकित प्रत , पात्र विद्यार्थ्यांचे  नाव रेखांकित  करुन इयत्ता 10 वी किंवा 12 वी च्या बोर्डाचा विद्यालय  किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संपूर्ण निकालाची छायांकित प्रत .
            तरी जिल्ह्यातील  सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य  यांनी उपरोक्त  योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव  आवश्यक  कागदपत्रांसह  सहायक आयुक्त , समाज कल्याण  , हिंगोली या कार्यालयात  दिनांक 20 जून 2018 रविवार रोजी दुपारी 4 .00 वाजेपर्यंत सादर करावेत  अन्यथा पात्र विद्यार्थी  लाभापासून  वंचित राहिल्यास  संबंधित  मुख्याध्यापक / प्राचार्य  हे जबाबदार राहतील , याची गांभिर्याने  नोंद घ्यावी , असे आवाहन सहायक आयुक्त , समाज कल्याण , हिंगोली यांनी केले आहे .
00000


No comments: