30 March, 2017

कोल्हापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

हिंगोली, दि. 30 : जिल्ह्यातील सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी दि. 3 ते 9 एप्रिल, 2017 या कालावधीत सोल्जर (जनरल ड्युटी), ट्रेलर व ब्लकस्मित या पदासाठी 109 इन्फ्रटी बटालियन (टी.ए.) मराठा, कोल्हापूर येथे भरती घेण्यात येणार आहे.
सदरील भरती प्रक्रियेस जास्तीत-जास्त उमेदवारांनी भरतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा.

*****

29 March, 2017

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
            हिंगोली, दि. 29 : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
            शुक्रवार, दि. 31 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह कारंजा, जि. वाशिम येथून मोटारीने मालेगांव, जि. हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह मालेगांव येथे आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता जाहिर सभा – संघर्ष यात्रा मालेगांव जि. हिंगोली.  दुपारी 1.30 ते 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह मालेगाव. दुपारी 2.30 वाजता मालेगांव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता हिंगोली येथे जाहिर सभा-संघर्ष यात्रा. सायंकाळी 5.30 वाजता हिंगोली येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण.

*****
थकीत कर्ज रक्कम तात्काळ भरण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 29 : सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्जाच्या वसूलीचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सर्व महामंडळामध्ये वसूलीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी लाभार्थ्यांनी महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम तात्काळ भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले आहे.
 जिल्ह्याची थकीत वसूली 100 टक्के झाल्यानंतरच आपण इतर गरजू लाभार्थीना अर्थसहाय्य करून त्यांना स्वावलंबी आणि त्यांची आर्थिक उन्नती करू शकतो. त्यामुळे सर्व मागासवर्गीय कर्जधारकांनी त्यांचे नावे असणारी थकीत कर्ज रक्कम अनुक्रमे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.), साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ (मर्या.), वसंतराव नाईक भटक्या जाती व विमुक्त जमाती विकास महामंडळ (मर्या.), संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (मर्या.) या हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय महामंडळाकडे त्वरित भरणा करावी, असे आवाहन जिल्हाधिकरी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

*****
मुद्रा बँक योजनेचा लाभ घेवुन स्वंयरोजगार सुरु करा
   --      पी. आर. शिंदे
        हिंगोली, दि.29: प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत-जास्त प्रचार-प्रसार करत स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी देखील नौकरीच्या मागे न धावता मुद्रा बँक योजनेचा लाभ घेवून स्वंयरोजगार सुरु करावा असे प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. आर. शिंदे यांनी केले.
             जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी विनातारण सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रसार, प्रचारासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना मेळाव्यात श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे एच. एस. साखरे, ग्रामीण स्वंयरोगजार प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्रीकांत दिक्षीत, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी लक्ष्मीकांत भालेराव यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, स्वयंरोजगार सुरु करु इच्छिणाऱ्या होतकरु युवक-युवतींसाठी केंद्र शासानाने सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना अतिशय लाभदायी आहे. स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करणाऱ्यासाठी या योजनेतंर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. जिल्ह्यातील 1268 लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेतंर्गत सुमारे 20 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आल्याचे ही श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
            जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी म्हणाले की, मुद्रा बँक योजनेमुळे उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींचे स्वप्न साकार होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरुण या गटाकरीता ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. या योजनेतंर्गत कर्ज घेण्यास अडचण निर्माण झाल्यास किंवा तक्रार नोंदणी करावयाची असल्यास जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे समन्वयक जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा अग्रण बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडे करावी.
            प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत 126 प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्याचे उद्ष्टि होते. त्यापैकी 92 लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती  जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. साखरे यांनी यावेळी दिली.
            मुद्रा बँक योजनेतंर्गत किशोर गटातील 17 आणि तरुण गटातील 13 अशा एकुण 30 लाभार्थ्यांना 30 लाख रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी लक्ष्मीकांत भालेराव यांनी यावेळी दिली.
            मुद्रा बँक योजनेतंर्गत यावेळी श्रीमती फरीदा बेगम अकबर, सय्यद कलीम सय्यद फईम आणि साजीद बाबु शेख या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मेळाव्यास नागरिक आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****

ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराभिमुख मोफत प्रशिक्षण

हिंगोली, दि. 29 :- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यांच्या वार्षिक बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात, जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रशिक्षीत व्यवसायीक लोकांची कमतरता असल्यामुळे जिल्ह्यात बेरोजगार तरुणाची व्यवसायिक प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायाला चालणा देण्याची गरज आहे. यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र यांच्या सन 2017-18 या नवीन वर्षामध्ये स्थानिक सल्लागार समितीच्या बैठकीत युवक-युवतींना व्यवसायीक प्रशिक्षण देण्याचे ठरले आहे. त्यात महिला करिता, ड्रेस डिझायनिंग, बॅग मेकिंग, पेपर कव्हर, पीएमईजीपी व पुरुषांसाठी ईलेक्ट्रीक मोटर रिवायडींग आणि दुरूस्तीची कामे, टु व्हिलर मेकॅनिक आणि बचत गटासाठी दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, म्हैस पालन, पापड बनविणे, कुक्कुट पालन घेण्याचे ठरले आहे.
प्रशिक्षण केंद्रामार्फत ग्रामीण भागातील युवक-युवतींना संपुर्ण प्रशिक्षण/निवासाची/नास्टा, चहा, भोजन, विनामुल्य, त्याचबरोबर उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण बँक व्यवहार संबंधाचे मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास चालणा इत्यादी. प्रशिक्षाणार्थीने आपला प्रशिक्षण कार्यक्रम निवडतांना स्वत:ची आवड, शारिरीक क्षमता, आर्थिक कुवत, आजुबाजुला उपलब्ध साधणसामुग्री, उत्पादनासाठी बाजारपेठ व मागणी सातत्य याचा साकल्याने विचार करावा.
प्रशिक्षणार्थीची निवड ही मुलाखतीव्दारे घेण्यात येईल त्यात प्रशिक्षणार्थीने आपले अर्ज विहित नमुन्यात प्रशिक्षण केंद्राकडे पाठवु शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीची तारिख व प्रशिक्षणाची तारिख तुकडी क्षमतेनुसार कळविण्यात येईल निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी ना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन दिल्या जाणार नाही केवळ विनामुल्य प्रशिक्षण दिले जाईल.
अर्जासाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमा करावे. अर्ज निशुल्क उपलब्ध आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची प्रशिक्षणार्थीने नोंद घ्यावी, असे आवाहन स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
अनुसूचित जमातीच्या बचत गटानी पोल्ट्री फॉर्म स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 29 :- विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत खालील दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असुन इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दर्शविल्याप्रमाणे परिपुर्ण कागदपत्रांसह आवेदन अर्ज दि. 17 एप्रिल, 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झालेल्या आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटांना व्यवसायाकरिता पोल्ट्री फार्म स्थापन करून देणे व प्रशिक्षण देणे. सामुहिक स्वरूपाची योजना असल्याने पुढील आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. 1) आदिवासी स्वयंसहायता बचतगट हे जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत स्थापन करण्यात आलेल्या नव्याने स्थापित झाल्याबाबतचे नोंदणीकृत प्रमाणपत्र जोडावे, 2) बचत गटातील सर्व सभासद हे आदिवासी असावेत त्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे, 3) बचत गटातील कमीत कमी एका लाभार्थ्याकडे एक एकर जमीन, बारामाही पाणी, वीज इत्यादी सुविधा असल्याचे कागदपत्र. (सातबारा, विहिर नोंद, मोटार (वीजपंप) प्रमाणपत्र, चालु वर्षातील वीजबिल, होल्डींग), 4) पोल्ट्रीफॉर्मसाठी घ्यावयाचे क्षेत्र / जमीन बचत गटाला किमान 5 वर्ष वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालकाचे व बचत गटातील सर्व सदस्य यांनी शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर रजिस्टर हमीपत्र जोडावे, 5) बचतगटाचे चालु व्यवहार असलेले पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी, 6) रहिवासी प्रमाणपत्र, 7) ओळखपत्र प्रमाणपत्र, 8) सदर योजनेचा यापुर्वी लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र, 9) दोन पासपोर्ट साईज फोटो.

*****
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष श्री. थूल यांचा दौरा कार्यक्रम

हिंगोली, दि. 29 :- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. न्या. श्री. सी. एल. थूल हे दिनांक 2 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
दिनांक 2 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता डीव्हीकारने परभणी शासकीय विश्रामगृह येथून हिंगोलीकडे रवाना व बहिष्कारग्रस्त गावाला भेट व नातेवाईकांशी चर्चा व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन. दुपारी हिंगोली येथून डीव्ही कारने औरंगाबादकडे रवाना व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.

***** 

24 March, 2017

हिंगोली,दि.24:- हुंड्यासारखी  सामाजीक समस्या आजही ज्वलंत आहे हुंडा देणे घेणे परंपरेने अस्तित्वात असलेली अनिष्ठ प्रथा आहे. हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेस आळा बसण्याकरीता हुंडा प्रतिबंधक कायदा (अधिनियम ) 1961 ची तरतुद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात शासनाने हुंडा प्रतिबंधक कायदा (अधिनियम ) 1961 राजपत्र (भाग-4 अ) अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणुन राज्यस्तर-आयुक्त महिला बाल विकास पुणे, जिल्हास्तर - जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, तालुकास्तर - बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
हुंडा प्रतिबंधक कायदा (अधिनियम )1961 या कायद्याच्या विरोधात वर्तन करणाऱ्या व्यक्ती शिक्षेस पात्र असतील असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी  दिलीप कारभारी,यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

****  

23 March, 2017

जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणूकीसाठी 3 एप्रिल रोजी सभेचे आयोजन

        हिंगोली,दि.23:  महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 83 चे उपकलम 1- अ च्या तरतुदीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक 3 एप्रिल 2017 रोजी दूपारी 2.00 वाजता हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
            त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
            जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती पदाची निवडणुक ही जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुक नियम 1962, त्याखालील नियम यामधील तरतुदीनुसर घेण्यात यावी असे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळविले आहे.


**** 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
अर्ज करण्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ
        हिंगोली,दि.23 :  दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी / 12 वी / पदवी / पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच शासन निर्णय दिनांक 06 जानेवारी, 2017 या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली होती परंतु सदर अर्ज स्विकृतीसाठी दिनांक 31 मार्च, 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण हिंगोली यांनी कळविले आहे.

**** 
जिल्ह्यात अधिनियम 1951 चे (37) (1)(3) कलम लागू 

        हिंगोली,दि.23:- जिल्ह्यात सार्वजनिक शातंता आणि सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम (37) (1)(3) चे आदेश दिनांक 21 मार्च, 2017 रोजीच्या 6-00 वाजल्यापासून ते दिनांक 4 एप्रिल, 2017 रोजीच्या 24-00 वाजेर्यंत हा आदेश लागू करण्यात आला आहे.
                या आदेशान्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी , तलवार, बंदुका बाळगणार नाही. लाठ्या किंवा काठ्या , शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभुत ठरतील , सहज हाताळता येतील अशा वस्तुजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, विटबंनात्मक नकला किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणा नाही. सभ्यता , नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वजवणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्ती रस्तयावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. सदर आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधीकारी किंवा इतर कोणतेही शासकीय कर्मचारी, विवाह,अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व त्याचप्रमाणे इतर कार्यक्रम ज्यांना सक्षम अधिकारी यांनी विशेष परवानगी दिलेल्या अशा मिरवणुकीसस व कार्यक्रमास लागु होणार नाही. विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, हिंगोली किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील. हे आदेश जिल्ह्याच्या हद्दीपावेतो लागू करीत आहे.  
****  
  जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन  

            हिंगोली, दि. 23:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक 23 मार्च हा शहिद दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.    
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणीवरकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती छाया कुलाल आदि विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.  
****




22 March, 2017

जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन काळाची गरज
                                      जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली,दि.22: पाण्याचे दैनंदिन जीवनात वापर करतांना प्रत्येक नागरिकाने काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. मागील कालावधीतील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा विचार करता जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.
              जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.डी.सी. सभागृहात जलजागृती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ नांदेडचे अधिक्षक अभियंता श्री. तांदळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लोखंडे, कार्यकारी अभियंता एस. एम शेख जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता बी.आर. देशमुख, कार्यकारी अभियंता श्री. पडलवार यांची उपस्थिती होती.
            पुढे जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रासह घरगुती वापराकरीता सर्वात जास्त पाण्याचा वापर होतो.  त्याकरीता शासनाच्या जलव्यवस्थापनाबाबत नागरिकांबरोबरच युवा पिढींना प्रोत्साहित करुन पाण्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. पाणी टंचाईचा प्रश्न हा जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय संपणार नाही. पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन जलव्यवस्थापनाबाबत समाज जागृती व साक्षरता निर्माण होण्यासाठी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून गतीवर्षीपासून 16 ते 22 मार्च हा सप्ताह जल जागृती सप्ताह म्हणून सर्वत्र राबविण्यात येत आहे.  या जल जागृती सप्ताहमुळे काय फरक पडला याचा विचार करणे ही आवश्यक आहे.
            जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. आपल्याकडे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी नुसन, आपण पडणाऱ्या पावसाच्या केवळ 42 टक्के पाण्याचा वापर करतो.  
राज्य शासनाने नरेगातंर्गत जिल्ह्याला 10 हजार विहिरी मंजूर केल्या आहेत. भूसंपादन कायद्यामुळे जिल्ह्यात मोठे प्रकल्प सुरु करण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत. परंतू यासठी महसूल, जलसंपदा आणि कृषि विभागानी शेतकऱ्यांना सदर भूसंपादन कायद्याची सविस्तर माहिती द्यावी असे हि जिल्हाधिकारी भंडारी यावेळी म्हणाले.
            अधिक्षक अभियंता श्री. तांदळे म्हणाले की, 22 मार्च 1992 पासून जागतीक जल दिन साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने गतवर्षीपासून राज्यात 16 ते  22 मार्च हा सप्ताह जल जागृती सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. कालव्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आता पाणी टंचाईचा विचार करुन राज्य शासनाने सिंचनासाठी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी टंचाई लक्षात घेवून प्रत्येकाने जलव्यवस्थापन करुन पाणी वापरावे. तसेच पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे जलपुर्नभरण करावे.
            यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. लोखंडे, बी.आर. देशमुख, उप  कार्यकारी अभियंता प्रियंका झोरे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
            प्रारंभी जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधु, पैनगंगा आणि पुर्णा नदीतील जलकलशाचे मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. तसेच जलजागृती दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण ही करण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री. एस. एम शेख यांनी केले. तसेच श्री. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. डी. कुलकर्णी यांनी केले तर कार्यकारी अभियंता श्री. पडलवार यांनी आभर मानले.

****








स्टेट बँक हैदराबाद व कोषागार कार्यालये 31 मार्च रोजी
रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश
        हिंगोली, दि. 22 :- महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड-1 मधील नियम क्र. 409 अन्वये शासकीय रोखीचे व्यवहार पुर्ण करण्याच्या दृष्टीने दि. 31 मार्च 2016 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्या शाखा हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी व बँक ऑफ महाराष्ट्र औंढा नागनाथ आणि जिल्हा कोषागार कार्यालय हिंगोली तसेच बँकींग उपकोषागारे वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव दि. 31 मार्च 2017 रोजी उशीरा पर्यंत रात्री 22.00 वाजेपर्यंत शासनाचे रोखीचे व्यवहार पुर्ण करण्यासाठी चालू ठेवावीत, असे आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले आहेत.

***** 

21 March, 2017

जालना येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
        हिंगोली, दि. 21 : जिल्ह्यातील सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दि. 27 एप्रिल, 2017 ते 7 मे, 2017 या कालावधीत सोल्जर (जलरल ड्युटी), सोल्जर (टेक्निकल), सोल्जर क्लर्क/स्टोर किपर व सोल्जर ट्रेडमॅन या पदासाठी जालना येथे भरती घेण्यात येणार आहे. सदरील भरती प्रक्रियेस जास्तीत-जास्त उमेदवारांनी भरतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा
*****


20 March, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 20 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दिलीप कांबळे हे दिनांक 21 मार्च, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे - मंगळवार, दि. 21 मार्च, 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता परभणी येथून वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 12.00 वाजता सामाजिक न्याय व मदत पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. सायंकाळी 5.30 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.

*****
ग्राहकामध्ये त्यांच्या हक्काबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मेगा कॅम्प शिबीराचे आयोजन
        हिंगोली, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहकामध्ये त्यांच्या हक्का बाबत जागृती निर्माण करण्यासाठी मेगा कँम्प (भव्य शिबीराचे) आयोजन दि. 23 मार्च, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता केले आहे. सदर शिबीरामध्ये भारती ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई चे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सदर कँम्प मध्ये हजर राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राहक सरंक्षण परिषदेचे सदस्य, सर्व शासकीय विभागाचे प्रमुख व जनतेस उपस्थित राहण्याचे आवाहन मा.जिल्हाधिकारी हिंगोली यांचे वतीने करण्यात येत आहे.
या शिबीरामध्ये ग्राहकांचे हक्क या विषयावर व्याख्यान तसेच कोणतीही वस्तु/सेवा घेतांना घ्यावयाची काळजी, तक्रार कोठे व कशी करावी, ग्राहक न्यायालय, शैक्षणिक व अर्थीक नियोजन, विमा, बँक, प्रवासाची साधने वा मालमत्ता, दुरसंचार सेवा, विद्युत उपकरणे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या फसवणूकीमध्ये दाद कोठे मागावी. या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेमध्ये सदर कार्यशाळेमध्ये आपल्या जवळील बचतीचे लवकरात लवकर गुंतवणूकीचे व्यवस्थापन कसे करावे यावर योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. उदा. वित्तीय संकल्पना आणि धोरण, वित्तीय उत्पादने, म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधील फरक, चांगली योजना कशी निवडावी, अर्थीक अफवावर विश्वास ठेवू नये. आयुर्विमा किंवा वैद्यकिय विमा कसा घ्यावा. इत्यादी या कार्यक्रमा बरोबर ग्राहकोपयोगी एक लघुपट दाखवला जातो. ज्या मध्ये ग्राहकासाठी असणारी बहूमोल माहिती आहे. आधि ग्राहक मार्गदर्शन व्याख्यान दिले जाते. त्याच बरोबर एका बाजूला दुध परीक्षण केले जाते. या कार्यशाळेसाठी लागणारी दूध परीक्षण यंत्र आणि त्याचे परिक्षण करुन सदर अहवाल दूध आणणाऱ्या व्यक्तीस 40 सेकंदात दिला जातो, त्याची एक प्रत आम्ही आमच्यापाशी राखून ठेवतो. दूध परीक्षण यंत्र चालविण्यासाठी आमचे प्रशिक्षित तज्ज्ञ आमच्या बरोबर असतात. शिबीरात येणाऱ्या सर्व तक्रारीची छाननी करुन तक्रारदारास त्या त्या तज्ज्ञ सभासदांकडे पाठविली जाते. सभासद तक्रार संपूर्णपणे ऐकून घेतात व त्याची नोंद आम्ही तयार केलेल्या एका फॉर्मवर लिहून घेतात. तक्रारदाराने आणलेल्या तक्रारींचे दोन संच आम्ही आमच्याकडे ठेवून घेतो. त्या अनुषंगाने सदर तक्रार त्या त्या विभागात स्पीड पोष्टाने पाठविल्या जावून त्यांचा पाठपूरावा देखील केला जातो.
या शिबीरात शेतीसाठी शासनाने पूरविलेले सोलर आणि पंप न मिळणे, घराच्या बांधकामाचे योग्य पैसे भरुन सुध्दा बांधकाम व्यावसायिक ताबा देण्यास टाळाटाळ करतो, बँकेच्या कर्जाचे हप्ते भरुनसुध्दा पुन्हा पुन्हा बँकेचे पत्रक मिळणे, वैद्यकीय विम्याचे पैसे न मिळणे किंवा त्यामध्ये कपात करणे, नवीन घेतलेल्या दागिन्यांमध्ये नमूद केलेली शुध्दता नसणे, वीज वापराचे मिटर योग्यप्रकारे न चालणे, तक्रार करुनसुध्दा त्याची दखल न घेणे, मोबाईल, कॉम्पुटर, घरगुती तीज उपकरणे हमी दिलेल्या कालावधीत बिघडणे, परंतू त्याची दखल उपरकण बनविणारी कंपनी घेत नाही. छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत वस्तू विकणे या तक्रारीचा देखील निपटारा करण्यात येणार आहे.

*****

18 March, 2017

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
        हिंगोली, दि. 18 :  दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10 वी / 12 वी / पदवी / पदवीका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच शासन निर्णय दिनांक 06 जानेवारी, 2017 या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली होती परंतु सदर अर्ज स्विकृतीसाठी दिनांक 23 मार्च, 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
                या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11 वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी लागणारी देय रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये नियमानुसार वितरीत करण्यात येईल.
                सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष, अटी व शर्ती या अर्जासोबत जोडलेल्या आहेत. त्याचे विद्यार्थी व पालकांनी अवलोकन करावे. निकष, अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज भरावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in , https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो  संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या यादीसह तो विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्हयातुन काढलेले आहे त्या-त्या तालुक्यातील खालील गृहपाल यांचेकडे अर्ज दिनांक 23 मार्च  2017 पर्यंत दाखल करावेत.
अ.क्रं.
गृहपालाचे व वसतिगृहाचे नाव.
तालुका
भ्रमणध्वनी क्रमांक
1
श्री.आर. एस. भराडे-गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली.
हिंगोली
9096682610
2
श्रीमती एस. आर. राठोड- गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली.
हिंगोली
9822009802
3
श्री. यु. एच. जाधव-गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,वसमत.
वसमत.
8390864982
4
श्रीमती के. डी. सुकळकर, गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,वसमत.
वसमत.
7775960916
5
श्री. जी. व्हि. बिहाडे, गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,कळमनुरी.
कळमनुरी.
8275108095
6
श्रीमती के. डी. सुकळकर, गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,वसमत.
कळमनुरी.
7775960916
7
श्री. एस. आर. माळी-गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सेनगांव.
सेनगांव
7350650720
8
श्री. एम. आर. राजुलवार-भा.स.शि.विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली
औंढा ना.
9665730222
                                                                               
अपूर्ण भरलेले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील. 60 टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के असेल. जिल्हानिहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ द्यावयाचा ही संख्या निश्चित केलेली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवडयादी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्द केली जाईल. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. सदर अर्ज भरण्याची अखेरची मुदत दि. 23 मार्च, 2017 पर्यंत असेल. तरी हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेणेसाठी उपरोक्तप्रमाणे अर्ज सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****