08 March, 2017



महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेत महिला कक्षाची स्थापना
हिंगोली, दि.8 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन येथील जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड व सर्व विभाग प्रमुख यांनी जिल्हा परिषदेमधील कार्यरत असलेल्या महिला अधिकारी, महिला कर्मचारी व इतर महिला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. तसेच जिल्हा परिषदेमधील लोकप्रतिनिधी, महिला अधिकारी, महिला कर्मचारी व महिला अभ्यागतासाठी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ‘महिला कक्ष’ स्थापन करण्यात येवुन सदर कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड व महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रीमती शोभाताई झुंझुर्डे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  (सा.) निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. हिवाळे, कार्यकारी अभियंता बांधकाम श्री. भगत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) श्रीमती दिपाली कोतवाल, जिल्हा कृषि विकास अधिकारी अंकुश डुबल व जिल्हा परिषदेमधील कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होते. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महिला बाल विभागातील कर्मचारी व पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
*****

No comments: