03 March, 2017

जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

हिंगोली,दि.३: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात बुधवार,  दि. 8 मार्च, 2017 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका विधी समिती व जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने पीसी ॲन्ड पीएनडीटी ॲक्ट या विषयावर कायदेविषयक शिबीर / कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी‍ अनिल भंडारी यांच्या अध्यक्षेत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी‍ अनिल भंडारी अध्यक्षस्थानी उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा न्यायाधीश - 1 एम. पी. दिवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबासाहेब रोडगे, प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुजाता पाटील या महिला विषयक पोलीसांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर हे महिलांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सेनगाव तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील या मनोधेर्य योजना या विषयावर तर महादेव हादवे हे पीसी ॲन्ड पीएनडीटी ॲक्ट या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 
                                                                        *****


No comments: