03 March, 2017

जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोलीच्या नवीन इमारतीचे भूमीपुजन
हिंगोली,दि.३: जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या भुमीपूजन व पायाभरणी सोहळा उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते होणार आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सदर प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भुमीपूजन व पायाभरणी सोहळा रविवार, दि. 5 मार्च, 2017 रोजी सकाळी 10:00 वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी नवी दिल्ली येथील भारतीय विधी परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश आ. देशमुख यांच्या उपस्थितीत आणि  परभणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मु. श्री. जवळकर यांच्या अध्यक्षेत संपन्न होणार आहे. यावेळी हिंगोली जिल्हा न्यायाधीश-1 म. पा. दिवटे आणि हिंगोली वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. शेख लालमियॉ शे. बाबामियॉ यांची प्रमुख  उपस्थिती राहणार आहे.  
या प्रस्तावीत हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयावी नविन इमारत ही हिंगोली येथील सर्व्हे क्र. 101 मधील पाच एकर दोन गुंठे एवढ्या प्रशस्त जागेत उभारण्यात येणार आहे. हि इमारत आधुनिक व सर्वसोयींनी युक्त राहणार असून प्रस्तावित इमारती मध्ये मुख्य इमारत तळ मजला आणि तीन मजले असणार आहे. याच बरोबर अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, संरक्षक भिंत, अग्नीशमन यंत्रणा, फर्नीचर, पाणी पुनर्भरण, बगीचा, वाहनतळ, साक्षीदारासाठी व्हीडीओ कॉन्फरंसींगची सोय इत्यादी सुविधा या इमारती मध्ये राहणार आहेत. ही नविन इमारत  30 महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे.

*****
 

No comments: