30 November, 2017

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 173.31 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी



वृत्त क्र. 562                                               दिनांक : 30 नोव्हेंबर 2017
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 173.31 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
        हिंगोली,दि.30: सन 2018-2019 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण रु. 93.67 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना रु. 50.47 कोटी आणि अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी रु. 29.17 कोटी अशा एकुण 173.31 कोटीच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रारुप आराखड्यास पालकमंत्री दिलिप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डि.पी.डि.सी सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताईल नरवाडे, . तान्हाजी मुटकुळे, . संतोष टारफे, . जयप्रकाश मुंदडा, . रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेला या आराखड्यास शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2017-2018 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत निधी अभावी पुर्नविनियोजन होऊ शकले नाही. त्यामुळे यापुढे समर्पित होणाऱ्या निधीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रु. 14.50 लक्ष रुपये तर अनुसूचित जमाती आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत रु. 29.40 लक्ष रुपये पुनर्विनियोजन प्रस्तावास मंजूरी दिली आहे.
                निधी प्रस्तावित करताना त्या-त्या भागाची आवश्यकता लक्षात घेण्यात यावी. त्याचप्रमाणे कामाची यादी तयार करताना खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे. निधी वेळेत खर्च होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
            यावेळी पालकमंत्री यांनी आमदार व सर्व समिती सदस्यांनी  जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रस्ते, वीज पुरवठा, कृषि योजना, निर्माण भारत, जलयुक्त शिवार अभियान, नगरपालिकांचा विकास, घरकूल योजना, तीर्थक्षेत्रे व शाळा या विषयावर चर्चा करुन याबाबतचा आढावा घेतला.
            तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2017-2018 अंतर्गत नोव्हेंबर 2017 अखेर झालेल्या खर्चाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेखाली रु. 29.18 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत  रु. 16.28कोटी रुपये खर्च झाला आहे. अनुसूचित जमाती आदिवासी योजनेंतर्गत (ओटीएसपी) रु. 12.08 कोटी रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती दिली.
                प्रारंभी कन्हेरगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 च्या उल्लेखनीय कार्याची दखल मन की बातया कार्यक्रमात घेतली गेली. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी  स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 34 पशुवैद्यकीय दवाखने आय.एस.औ. प्रमाणित झाले आहे. त्या अनुषंगाने प्रातिनिधीक स्वरुपात पशुवैद्यकीय दवाखान्यांना आय.एस.ओ. प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.यावेळी बैठकीस विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****

जिल्हा पर्यटन समिती बैठकीत औंढा नागनाथ आणि नर्सी नामदेव विकास आराखड्यास मान्यता संपन्न
              यावेळी जिल्हा पर्यटन समितीची बैठक पालकमंत्री  दिलिप कांबळे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  यावेळी बैठकीस आ. तान्हाजी मुटकुळे, . संतोष टारफे, . जयप्रकाश मुंदडा, . रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
0000

बेटी बचाओ –बेटी पढाओ अभियानांतर्गतच्या अमिषास बळी पडू नये



वृत्त क्र. 561                                              
बेटी बचाओ –बेटी पढाओ अभियानांतर्गतच्या  अमिषास बळी पडू नये
हिंगोली,दि.30: हिंगोली शहरासह  ग्रामीण भागात  झेरॉक्स दुकानावर बेटी बचाओ बेटी पढाओ  या योजनेचा अर्ज एका विशिष्ट  नमुन्यात अर्ज भरल्यास  मुलीच्या पित्याला 3 लाख रुपये  अनुदान त्यांच्या  बँक खात्यावर जमा होणार आहे .  सदर अर्जासोबत  संमती पत्र,  रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टीफिकेटचे कागदही  जोडल्या जात आहेत. सदर अर्जावर हिंदी भाषेत  मुलीचे नाव , अर्ज दाखल  करण्याचे नाव ,  गावाचे नाव , पत्ता , जन्म तारिख, शैक्षणिक योग्यता , आधार नंबर , ई-मेल पत्ता, प्रवर्ग , बँक खात्याचा  नंबर , गावाचे  नाव इत्यादी  माहिती घेतली जात आहे . परंतू  सदर योजनेखाली अशा प्रकारची  कुठलेही अर्ज  हिंगोली जिल्ह्याकरिता  जिल्हा परिषद , हिंगोली या कार्यालयाकडून मागविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अशाप्रकारच्या  आफवांवर जनतेने  विश्वास ठेवू नये व अशाप्रकारचे कुठलेही अर्ज खरेदी  करुन भरण्यात येऊ नयेत.
यानंतर  कुठल्याही व्यक्तीने  अथवा  पुरवठा धारकाने  अशा प्रकारचे अर्ज  विकण्याचा  प्रयत्न  केला किंवा अर्ज भरुन  देण्यासाठी  विनंती केल्यास  त्या व्यक्तीचे  अथवा पुरवठा  धारकाचे नाव  महिला व बालकल्याण विभाग , जिल्हा परिषद  , हिंगोली   या कार्यालयास  अवगत  करण्यात यावेत .  त्याचप्रमाणे  बेटी बचाओ –बेटी पढाओ या योजनेखाली  कुठलीही माहितीची  आवश्यकता असल्यास  महिला व बालकल्याण  विभाग , जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयाशी  किंवा नजीकच्या  बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी  संपर्क साधावा . सदर  कार्यालयाशी संपर्क  केल्याशिवाय  कुठल्याही  निवेदन अथवा  अमिषास बळी पडू नये,असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी,   महिला व बालकल्याण विभाग , जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारास मुदतवाढ



वृत्त क्र. 560                                               दिनांक : 30 नोव्हेंबर 2017
शिवछत्रपती  राज्य क्रीडा पुरस्कारास मुदतवाढ
हिंगोली,दि.30: महाराष्ट्र शासनाच्या  क्रीडा विभागामार्फत  प्रतिवर्षी  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची  योजना  कार्यान्वित असून यामध्ये  राज्यातील  सर्वोत्कृष्ट खेळाडू , साहसी  उपक्रम , दिव्यांग खेळाडूंसह , संघटक /कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक , महिला मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ती यांचेसाठी  जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच  ज्येष्ठ  क्रीडा महर्षीकरीता  शिवछत्रपती  राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
 सन 2014-15 , 2015-16 आणि 2016-17 या वर्षासाठी  मान्यता प्राप्त  खेळांच्या अधिकृत  राज्य संघटनेमार्फत  त्या त्या आंतरराष्ट्रीय  स्तरावरील  कनिष्ठ व वरिष्ठ  गटातील  पदक विजेते पुरुष  व महिला खेळाडू  साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह  संघटक/कार्यकर्ते, क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक  कार्यकर्ती यांचे विहित  नमुन्यातील  अर्ज संबंधित  राज्य संघटनेच्या  कार्यकारणीच्या ठरावासह  दि. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा  तपशील देऊन विहित नमुन्यात  अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaidivsports.com वेबसाईटवर  उपलब्ध  करुन दिलेल्या  लिंकवर अर्ज सादर  करावा असे सूचित करण्यात आले होते .  सदर ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत  वाढ देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज दिनांक 9 डिसेंबर 2017 पर्यंत भरता येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा  रद्द करुन अर्जदाराने सादर केलेल्या  सर्व ॲडटमेंट अपलोड करण्यास परवानगी देण्यात  आलेली  आहे .
तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत  अर्जदाराने  जिल्हा क्रीडा  अधिकारी  कार्यालय , हिंगोली  या कार्यालयात  दि. 9 डिसेंबर 2017 पूर्व स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रासह सादर करावी  याबाबत  अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा  विभागाच्या संकेत स्थळावर  शासन निर्णय क्रमांक राक्रीधो-2012/प्र.क्र.158/12/क्रीयुसे-02/दि.16 ऑक्टोबर 2017 चे अवलोकन करावे. सदर शासन निर्णय  महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in वर उपलब्ध असून त्याचा संगणक  सांकेतांक क्रमांक  201710161812538321 असा आहे .
तसेच सन 2014-15 या पुरस्कार वर्षासाठी ज्यांनी अर्ज सादर केलेले होते  अशांनी पुन्हा नवीन शासन निर्णयाच्या नियमावलीनुसार नव्याने  अर्ज सादर करावयाचे  आहे यांची कृपया नोंद घ्यावी , असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी केले आहे.
0000

29 November, 2017

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा वेळेत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील – प्रकल्प संचालक



वृत्त क्र.559
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना
घरकुलाचा वेळेत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील
   प्रकल्प संचालक

      हिंगोली, दि.29: सन 2016-17 मध्ये जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 3 हजार 715 उद्दिष्ट होते. त्यानुसार आवास सॉफ्टवर एकूण 3 हजार 487 लाभधारकांना ऑनलाईन मंजूरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यानुसार 3 हजार 245 लाभधारकांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आला असून, द्वितीय  हप्ता 1 हजार 823 लाभधारकांना वितरण केला आहे.  तर तिसरा हप्ता 313 लाभधारकांना पंचायत  समितीस्तरावरुन वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 523 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे .
      शबरी आदिवासी घरकुल योजना सन 2016-17 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यास एकूण 227 घरकुलांचे उद्दिष्ट  प्राप्त झालेले असून त्यानुसार 214 लाभधारकांना प्रथम हप्ता, 114 लाभधारकांना द्वितीय हप्ता तर 22 लाभधारकांना तिसरा हप्ता पंचायत समितीस्तरावरुन वितरीत केला असून सद्य:स्थितीत 23 घरकुलांचे  काम पूर्ण  झालेले आहे. उर्वरीत  घरकुलांचे काम प्रगती पथावर आहे .
      रमाई  आवास योजना सन 2016-17 अंतर्गत हिंगोली  जिल्ह्यास  एकूण 1 हजार 042 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त  झालेले असून त्यानुसार 946 लाभधारकांना प्रथम हप्ता, 471 लाभधारकांना  द्वितीय  हप्ता तर 67 लाभधारकांना  तिसरा हप्ता पंचायत समिती स्तरावरुन  वितरीत केला असून सद्य:स्थितीत 103 घरकुलांचे  काम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे कामे प्रगती पथावर आहेत.
      पारधी आवास घरकुल योजना सन 2016-17 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यास एकूण 13 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त  झालेले असून त्यानुसार 10 लाभधारकांना प्रथम हप्ता, 8 लाभधारकांना द्वितीय हप्ता तर 4 लाभधारकांना तिसरा हप्ता पंचायत समिती स्तरावरुन वितरीत केला असून सद्य:स्थितीत 4 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित  घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे .
      सन 2016-17 अंतर्गत सर्व योजनेतील मंजूर झालेले घरकुले पूर्ण करण्यासाठी या कार्यालयाकडून  वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात तसेच पंचायत समिती स्तरावर  घरकुल  लाभार्थी  तसेच घरकुल संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे बैठका आयोजित करण्यात येत असून सदरील  बैठकांमध्ये  तालुकानिहाय घरकुल लाभार्थ्यांना  पंचायत समितीस्तरावर बोलावून त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांचे घरकुल विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन व आवाहन केले जाते . तसेच शासनाकडून  आलेल्या प्रत्येक  पत्रव्यवहारांची  माहिती सर्व  पंचायत समितींना  पाठवून ते तालुकाअंतर्गत ग्रामपंचायत निहाय अंमलबजावणी  करण्यासाठी  या कार्यालयाकडून वेळोवेळी  प्रयत्न केले जात आहेत व उर्वरित घरकुले विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी  या कार्यालयाकडून  वेळोवेळी पाठपुरावा  करण्यात येत आहे .
      शासन निर्णय क्र. ईआयो-2015/प्र.क्र.413/योजना-10 दि. 10 फेब्रुवारी 2016 नुसार  घरकुल  बांधकामाचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत  असल्यामुळे  ज्या लाभार्थ्यांनी जसे-जसे घरकुलांचे बांधकाम पुर्ण केले आहे केले त्यानुसार  थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होत  असल्यामुळे  लाभार्थ्यांना  पंचायत  समितीमध्ये  जावे लागत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे  घरकुल विहित मुदतीत पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्यो प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांनी माहिती दिली.
       
0000