06 November, 2017

स्त्री शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 6 : सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या नावे पाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात व त्या पुरस्काराचे नांव स्त्री शक्ती पुरस्कार असुन रुपये 3 लाख व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे खालील क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना सदर पुरस्कार 8 मार्च या जागतिक महिला दिनी दिला जातो.
ज्या महिलांनी विधवा परित्यक्त्या निराधार अपंग महिलांचे पुनर्वसन करणे अनाथ अपंग बालकाचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीव पूर्वक प्रयत्न व कार्य केले आहे. शैक्षणिक प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन क्षेत्र तसेच शेती व्यवसाय काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचे श्रम विविध तांत्रिक यंत्राद्वारे जाणीवपूर्वक कमी करण्याचे काम केलेले आहे. अशा महिलांचा सदर पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी ज्या महिलांनी जाणीव पूर्वक प्रयत्न केलेले आहेत तसेच स्त्रियांशी निगडीत असलेल्या प्रश्नांना विविध माध्यमाद्वारे उदा. रेडिओ, दुरदर्शन कलेद्वारे विविध कार्यक्रम करून समाजात जागृती करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. तरी हिंगोली जिल्हयातील महिला कार्यकर्त्या व समाज सेविका यांनी आपले प्रस्ताव दि. 18 नोव्हेंबर, 2017 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 7  हिंगोली येथे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्जासाठी व अधिक माहितीसाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  व्हि. जी. शिदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: