जलसंजीवनी संस्थेपासून नागरिकांनी
सावध राहण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 27 : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण
समाज
विकास सेवाभावी संस्थेमार्फत ग्रामपंचायतीमध्ये  जलसंजीवणी 
मंच मार्फत  पाणी वितरण केंद्र चालवित
आहेत. सदर  संस्थेमार्फत  ग्रामपंचायत अंतर्गत  एखाद्या 
व्यक्तीची  केंद्रचालक  म्हणून करार पध्दतीवर नेमणूक केलेली आहे. व संबंधीतांकडून
प्रत्येकी 20 हजार रुपये घेण्यात येत आहेत. 
या संस्थेने  पाणी वितरण  केंद्र चालकाकडे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची  यादी सर्वेक्षण सन 2002-03  देऊन सदर दारिद्र्य रेषेखालील यादीप्रमाणे लाभार्थी संख्या निश्चित करुन
त्यानंतरच
पाणी वितरण करावे,
अशा सूचना  सदर संस्थेने  केंद्र चालकांना  दिल्याचे दिसून येते. 
दारिद्र्य रेषेखालील 
यादीतील लाभार्थींना पाणी वितरण करणेबाबत 
या कार्यालयाने  कोणत्याही सूचना दिलेल्या
नाहीत. तसेच  अशाप्रकारची  शासनाची 
कोणतीही योजना नाही. या संस्थेने सन 2002-03
ची बीपीएल ची यादी जी एनआयसी च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेली
आहे. सदरील संस्था दारिद्र्य रेषेखालील
कुटुंबाच्या यादीचा  दुरुपयोग करत असून  सामान्य 
जनतेची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सदर 
संस्थेच्या  जलसंजीवणी मंच या पाणी  वितरण संस्थेशी  या कार्यालयाचा  किंवा शासनाचा काहीही संबंध नाही. यावी सर्व जनतेने
नोंद घ्यावी, तसेच सर्व सरपंचांनी  सदर संस्थेस
कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे आवाहन प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणा , हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
***** 
 
No comments:
Post a Comment