15 November, 2017

राष्‍ट्रीय पत्रकारिता दिवस कार्यक्रमाचे आयोजन

        हिंगोली, दि.15: प्रेस कॉन्‍सील ऑफ इंडियाने 16 नोव्‍हेंबर हा दिवस राष्‍ट्रीय पत्रकारिता दिन जाहिर केला आहे. या निमित्ताने जिल्‍हा माहिती कार्यालय, हिंगोली येथे राष्‍ट्रीय पत्रकारिता दिवस साजरा करण्‍यात येणार आहे.
अप्पर जिल्‍हाधिकारी श्री. मिनियार यांच्‍या अध्‍यक्षेखाली गुरुवार दि. 16 नोव्‍हेंबर, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रेस कॉन्‍सील ऑफ इंडियाने ‘माध्‍यमासमोरील आव्हाने’ हा विषय यावर्षी दिला आहे.
तरी सर्व संपादक माध्यम प्रतिनिधी यांनी  या कार्यक्रमाला उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.

*****

No comments: