29 November, 2017

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा वेळेत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील – प्रकल्प संचालक



वृत्त क्र.559
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना
घरकुलाचा वेळेत लाभ देण्यासाठी प्रयत्नशील
   प्रकल्प संचालक

      हिंगोली, दि.29: सन 2016-17 मध्ये जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 3 हजार 715 उद्दिष्ट होते. त्यानुसार आवास सॉफ्टवर एकूण 3 हजार 487 लाभधारकांना ऑनलाईन मंजूरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यानुसार 3 हजार 245 लाभधारकांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आला असून, द्वितीय  हप्ता 1 हजार 823 लाभधारकांना वितरण केला आहे.  तर तिसरा हप्ता 313 लाभधारकांना पंचायत  समितीस्तरावरुन वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 523 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे .
      शबरी आदिवासी घरकुल योजना सन 2016-17 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यास एकूण 227 घरकुलांचे उद्दिष्ट  प्राप्त झालेले असून त्यानुसार 214 लाभधारकांना प्रथम हप्ता, 114 लाभधारकांना द्वितीय हप्ता तर 22 लाभधारकांना तिसरा हप्ता पंचायत समितीस्तरावरुन वितरीत केला असून सद्य:स्थितीत 23 घरकुलांचे  काम पूर्ण  झालेले आहे. उर्वरीत  घरकुलांचे काम प्रगती पथावर आहे .
      रमाई  आवास योजना सन 2016-17 अंतर्गत हिंगोली  जिल्ह्यास  एकूण 1 हजार 042 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त  झालेले असून त्यानुसार 946 लाभधारकांना प्रथम हप्ता, 471 लाभधारकांना  द्वितीय  हप्ता तर 67 लाभधारकांना  तिसरा हप्ता पंचायत समिती स्तरावरुन  वितरीत केला असून सद्य:स्थितीत 103 घरकुलांचे  काम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे कामे प्रगती पथावर आहेत.
      पारधी आवास घरकुल योजना सन 2016-17 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यास एकूण 13 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त  झालेले असून त्यानुसार 10 लाभधारकांना प्रथम हप्ता, 8 लाभधारकांना द्वितीय हप्ता तर 4 लाभधारकांना तिसरा हप्ता पंचायत समिती स्तरावरुन वितरीत केला असून सद्य:स्थितीत 4 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित  घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे .
      सन 2016-17 अंतर्गत सर्व योजनेतील मंजूर झालेले घरकुले पूर्ण करण्यासाठी या कार्यालयाकडून  वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात तसेच पंचायत समिती स्तरावर  घरकुल  लाभार्थी  तसेच घरकुल संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांचे बैठका आयोजित करण्यात येत असून सदरील  बैठकांमध्ये  तालुकानिहाय घरकुल लाभार्थ्यांना  पंचायत समितीस्तरावर बोलावून त्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांचे घरकुल विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन व आवाहन केले जाते . तसेच शासनाकडून  आलेल्या प्रत्येक  पत्रव्यवहारांची  माहिती सर्व  पंचायत समितींना  पाठवून ते तालुकाअंतर्गत ग्रामपंचायत निहाय अंमलबजावणी  करण्यासाठी  या कार्यालयाकडून वेळोवेळी  प्रयत्न केले जात आहेत व उर्वरित घरकुले विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी  या कार्यालयाकडून  वेळोवेळी पाठपुरावा  करण्यात येत आहे .
      शासन निर्णय क्र. ईआयो-2015/प्र.क्र.413/योजना-10 दि. 10 फेब्रुवारी 2016 नुसार  घरकुल  बांधकामाचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत  असल्यामुळे  ज्या लाभार्थ्यांनी जसे-जसे घरकुलांचे बांधकाम पुर्ण केले आहे केले त्यानुसार  थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होत  असल्यामुळे  लाभार्थ्यांना  पंचायत  समितीमध्ये  जावे लागत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे  घरकुल विहित मुदतीत पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्यो प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांनी माहिती दिली.
       
0000

No comments: