30 November, 2017

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 173.31 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी



वृत्त क्र. 562                                               दिनांक : 30 नोव्हेंबर 2017
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 173.31 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
        हिंगोली,दि.30: सन 2018-2019 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण रु. 93.67 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना रु. 50.47 कोटी आणि अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी रु. 29.17 कोटी अशा एकुण 173.31 कोटीच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रारुप आराखड्यास पालकमंत्री दिलिप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डि.पी.डि.सी सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताईल नरवाडे, . तान्हाजी मुटकुळे, . संतोष टारफे, . जयप्रकाश मुंदडा, . रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेला या आराखड्यास शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतला जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2017-2018 मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत निधी अभावी पुर्नविनियोजन होऊ शकले नाही. त्यामुळे यापुढे समर्पित होणाऱ्या निधीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रु. 14.50 लक्ष रुपये तर अनुसूचित जमाती आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत रु. 29.40 लक्ष रुपये पुनर्विनियोजन प्रस्तावास मंजूरी दिली आहे.
                निधी प्रस्तावित करताना त्या-त्या भागाची आवश्यकता लक्षात घेण्यात यावी. त्याचप्रमाणे कामाची यादी तयार करताना खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे. निधी वेळेत खर्च होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.
            यावेळी पालकमंत्री यांनी आमदार व सर्व समिती सदस्यांनी  जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रस्ते, वीज पुरवठा, कृषि योजना, निर्माण भारत, जलयुक्त शिवार अभियान, नगरपालिकांचा विकास, घरकूल योजना, तीर्थक्षेत्रे व शाळा या विषयावर चर्चा करुन याबाबतचा आढावा घेतला.
            तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2017-2018 अंतर्गत नोव्हेंबर 2017 अखेर झालेल्या खर्चाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेखाली रु. 29.18 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत  रु. 16.28कोटी रुपये खर्च झाला आहे. अनुसूचित जमाती आदिवासी योजनेंतर्गत (ओटीएसपी) रु. 12.08 कोटी रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती दिली.
                प्रारंभी कन्हेरगाव येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 च्या उल्लेखनीय कार्याची दखल मन की बातया कार्यक्रमात घेतली गेली. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी  स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 34 पशुवैद्यकीय दवाखने आय.एस.औ. प्रमाणित झाले आहे. त्या अनुषंगाने प्रातिनिधीक स्वरुपात पशुवैद्यकीय दवाखान्यांना आय.एस.ओ. प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.यावेळी बैठकीस विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****

जिल्हा पर्यटन समिती बैठकीत औंढा नागनाथ आणि नर्सी नामदेव विकास आराखड्यास मान्यता संपन्न
              यावेळी जिल्हा पर्यटन समितीची बैठक पालकमंत्री  दिलिप कांबळे  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  यावेळी बैठकीस आ. तान्हाजी मुटकुळे, . संतोष टारफे, . जयप्रकाश मुंदडा, . रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, नगराध्यक्ष बाबाराव बांगर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती.
0000

No comments: