29 April, 2017

 जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक
 जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
हिंगोली दि. 29 :- जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.  
यावेळी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठकीत एकूण अकरा प्रकरणे निर्णयासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी पाच प्रकरणे पात्र, एक अपात्र  व पाच प्रकरणे फेरचौकशीसाठी ठेवण्याबाबत समितीच्या उपस्थित सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.         
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी श्री. कांबळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी , जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे, वसमत पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत दळवी, शेतकरी प्रतिनिधी अशासकीय सदस्य गणेशराव नाईकवाल             (कारेगावकर), सर्व संबंधित तहसीलदार , सर्व संबंधित तालुका कृषी अधिकारी, सर्व संबंधित पोलीस निरीक्षक तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची यावेळी बैठकीस उपस्थिती होती.  
*****  


पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 29 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दि. 30 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौरा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार दि. 30 एप्रिल, 2017 रोजी दुपारी 1.30 वाजता दर्शना बंगला, जालना येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता वसमत येथे आगमन व गोदावरी अर्बन बँक, शाखा वसमत, जि. हिंगोली च्या उद्घघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.00 वाजता वसमत येथून नांदेडकडे प्रयाण.  

***** 
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
हिंगोली दि. 29 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 30 एप्रिल, 2017 व दि. 01 मे, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार दि. 30 एप्रिल, 2017 रोजी दुपारी 4.30 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जालना-जिंतूर  मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
 सोमवार दि. 01 मे, 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण (स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, हिंगोली). सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक. सोयीनुसार हिंगोली येथे बॅडमिंटन हॉलचे भूमीपूजन. सायंकाळी 4.30 वाजता हिंगोली येथून वाहनाने सिरसमकडे प्रयाण. सायंकाळी 4.55 वाजता सिरसम ता. हिंगोली येथे आगमन. सायंकाळी 5.00 वाजता सिरसम ता. हिंगोली येथे जाहिर सभा. सायंकाळी 7.00 वाजता वाहनाने वारंगा फाटा ता. कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.00 वाजता वारंगा येथे आगमन. रात्री 8.10 वाजता तीर्थ महावन बुध्दविहार सातवाहन भूमी, वारंगा फाटा, ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे भारतभ्रमण भिक्खू संघाच्या वतीने बुध्दमूर्तीची प्रतिष्ठापणा (संपर्क : भदंत शासनक्रांती महास्थवीर, मो. 8454096480). रात्री 9.30 वाजता वारंगा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथून शासकीय वाहनाने जिंतूर (जि. परभणी) - जालना-औरंगाबाद-अहमदनगर मार्गे पुणेकडे प्रयाण करतील.
*****


28 April, 2017

उद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमास सुरवात
हिंगोली, दि. 28 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद व भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एक वर्ष कालावधीच्या दुर शिक्षण माध्यमातुन उद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन पदविका” “Diploma in Entrepreneurship & Business Management या अभ्यासक्रमाची संपुर्ण महाराष्ट्रात सुरुवात करण्यात येत आहे.
या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रकल्प मार्गदर्शन केंद्र ( PGC ) म्हणुन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र  औरंगाबादने ई.डी.आय.आय. अहमदाबाद या राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकता विकास संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. सदर पदविका अभ्यासक्रमाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे लाभार्थीमधील उद्योजकता कौशल्य व ज्ञानात वाढ करणे , नवीन उद्योग व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन, लाभार्थीच्या सोयीनुसार सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन मुक्त शिक्षणाद्वारे अभ्यास करण्याची सोय, तज्ञ सल्लागार यांचेकडुन मार्गदर्शन तसेच स्वत:चा बिझनेस प्लॅन तयार करणे हे असुन यशस्वीरित्या अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या लाभार्थीना उद्योजकता विकास संस्था (ई.डी.आय.आय.) अहमदाबाद यांचेमार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सदर पदविका अभ्यासक्रमाचे माध्यम हे इंग्रजी असुन या अभ्यासक्रमासाठी जानेवारी , एप्रिल , जुलै किंवा ऑक्टोबर या महिन्यापासुन सुरु होणाऱ्या बॅचेससाठी नोंदणी करता येत असुन सध्या एप्रिल-2017 च्या बॅचसाठी  संपुर्ण महाराष्ट्रात एमसीईडी कार्यालयात नोंदणी सुरु आहे. सदरील अभ्यासक्रमात लाभार्थीना एमसीईडीमार्फत सल्लामसलत व मार्गदर्शनही केले जाणार आहे.
सदर पदविका ही विशेषत: व्यवस्थापनशास्त्र, वाणिज्य विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील तसेच इतर कुढल्याही शाखेच्या पुर्ण वेळ पदविकाप्राप्त / पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थी / उद्योजकांसाठी उपयुक्त अभ्यासक्रमादरम्यान विविध विषयाचे वाचन साहित्यही दिले जाणार आहे. ज्यामध्ये उद्योजकतेसंबंधी आवश्यक माहिती उद्योगविषयक सहकार्य करणाऱ्या संबंधित संस्था व यंत्रणांची माहिती उद्योग संधी व उद्योग संधी शोधाबाबतची माहिती, बाजारपेठ पाहणीबाबत माहिती उद्योग / व्यवसायाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत माहिती, उद्योग व्यवस्थापन ,उद्योगसाठी आवश्यक परवाने / नोंदणी व ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी माहिती, तसेच उद्योगासंबंधी कायदेशीर बाबी अद्ययावत व्यवसाय इत्यादीबाबत वाचन साहीत्य दिले जाणार आहे. सदरील पदविका अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक www.edii.org वर उपलब्ध आहे. 
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज,दोन पासपोर्ट फोटो व शैक्षणिक प्रमाणपत्रसह महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयात एमसीईडी कार्यालय द्वारा- जिल्हा उद्योग केंद्र एस-12 जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे अरुण एम.कोंडेकर (भ्रमणध्वनी 8698770678/7722059442) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजीराव मुंढे व एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी  प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 28 : राज्याचे परिवहन व  खारभूमी विकास मंत्री मा. श्री. दिवाकर रावते हे दिनांक 29 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
शनिवार, दि. 29 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून शासकीय मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता हिंगोली येथे आगमन व कै. नारायणराव रावते शैक्षणिक संकुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : ए वन /2/2, एम.आय.डी.सी. लिंबाळा, हिंगोली). सकाळी 11.30 वाजता हिंगोली येथून शासकीय मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. (मार्गे : परभणी-गंगाखेड-परळी-लातूर-सोलापूर).

***** 
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
            हिंगोली, दि. 28 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी पुष्पहार अर्पण विनम्र करून अभिवादन केले.
            यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी निवडणूक गोविंद रणवीरकर, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

27 April, 2017

तासगांव जिल्हा सांगली येथे भारतीय वायुसेना सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
हिंगोली दि. 27 :  जिल्ह्यातील वायुसेना भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना दि. 06 ते 12 मे, 2017 रोजी भारतीय वायुसेना (सुरक्षा / गरुड) व मेडिकल असिस्टंट या पदासाठी तासगांव जि. सांगली येथे भरती घेण्यात येणार आहे.
सदरील भरतीस जास्तीत-जास्त उमेदवारांनी हजर रहावे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
जिल्हा लघुउद्योग सन 2015 चे पुरस्कार जाहिर
हिंगोली दि. 27 :  उद्योग संचालनालय यांच्या वतीने लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दरवर्षी जिल्ह्यातील दोन उत्कृष्ट लघुउद्योग घटकांना जिल्हास्तरावर प्रथम व व्दितीय असे दोन पुरस्कार दिले जातात. प्रथम पुरस्कारासाठी रु. 15 हजार व व्दितीय पुरस्कारासाठी रु. 10 हजार याशिवाय दोन्ही पुरस्कारासाठी गौरव चिन्ह, शाल व श्रीफल देण्यात येते.
सन 2015 करिता जिल्ह्यातील श्री. पराग विनोदकुमार झंवर मे. ओंकार पुर्णा फॅब्रीक्स प्लॉट क्र. 19-ए मु. पो. खांडेगाव ता. वसमत यांना 15 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार तर  सौ. चंद्रकला गंगाधर व्होनराज मे. घृष्णेश्वर बायोकोल, गट क्र. 224, मु. पो. माळवटा ता. वसमत जि. हिंगोली यांना रुपये 10 हजार रुपयांचा व्दितीय पुरस्कार जाहिर झाल्याचे जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

26 April, 2017

प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर करू नये
हिंगोली दि. 26 :  भारतीय ध्वज संहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसारच राष्ट्रध्वजाचा वापर करणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी 01 मे महाराष्ट्र दिनासह इतर राष्ट्रीय व सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे.
प्रतीवर्षी 01 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, मराठवाड्यात 17 सप्टेंबर व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर होत असतो. सदरचे कार्यक्रमाप्रसंगी खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर पडून पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मधील तरतुदींचे काटेकोपरणे पालन करावे. तसेच कोणीही कागदी व प्लास्टीकचा राष्ट्रध्वज वापरणार नाही, याची दक्षता घेण्याची सुचना प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.
ध्वजसंहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन झाली असून तालुका स्तरावरील समित्या स्थापन करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदार यांना दिलेले आहेत, असे प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी ध्वजसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

***** 
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत केली कामाची पाहणी
        हिंगोली, दि. 26 :  लघुसिंचन ( जलसंधारण ) विभागाकडून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत होत असलेल्या कामाची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पाहणी केली.
सदरील काम पाहणीच्या वेळी लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. साहु, सहाय्यक अभियंता श्रेणी - 1 पी. एस. खिराडे, उपविभागीय अधिकारी ए. आर. अशरफी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे. पी. वाबळे व संबंधित गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते.
             जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामाच्या पाहणी अंतर्गत जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी मौजे पेडगांव ता. हिंगोली येथील सिमेंट नाला बांध क्र. 1 व 2 ची पाहणी केली. दोन्ही कामे भौतिक दृष्ट्यापुर्ण झाले असून नाला खोलीकरण पक्के खडकापर्यंत पुर्ण झालेले असून पिचींग काम शिल्लक आहे. कामाची लांबी 16 मीटर असून साठवण क्षमता 5 टीसीएम आहे. कामे गुणवत्तापुर्वक झालेले असून किरकोळ कामे पावसाळ्यापूर्वी करावे अशा प्रकारच्या सुचना दिल्या. सिमेंट नाला बांध क्र. 2 हा गावाजवळील पाण्याच्या विहीरीजवळ असल्यामुळे त्यांचा फायदा होईल व खरीप हंगामासाठी सुरक्षित सिंचन उपलब्ध होऊन पाणी पातळीत वाढ होईल, असे जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधुन चर्चा केली.
            तसेच मौजे मसोड ता. कळमनुरी येथील सिमेंट नाला बांध क्र. 1 व 2 ची पाहणी केली. सदरील काम प्रगतीपथावर असून सिमेंट कॉक्रींटचे काम चालु होते. प्रत्यक्ष कामावर मोठ्या आकाराची खडी आढळून आली असता लहान आकाराची खडी वापरण्याबाबत सुचना दिल्या. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी कामे गुणवत्तापुर्वक चालु असल्याबाबत सांगितले. नाला खोलीकरणाचे काम चांगले झाले असून 10 टी. सी. एम. पाणी साठा निर्माण होणार आहे. तसेच 10 हेक्टर सिंचन खरीपामध्ये सुरक्षित सिंचन होणार आहे. तसेच 2016-17 मधील सिमेंट बंधारे 2 जून, 2017 पर्यंत पुर्ण करण्याचे सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. तसेच मौजे शिवणी ता. कळमनुरी येथील जलसंधारण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या व्दारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची देखील पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या बंधाऱ्यामुळे 15 टी. सी. एम. पाणीसाठा होणार आहे.        

                                                                                                *****




 
हिवताप आजाराचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 26 :  जिल्हा हिवताप कार्यालय, हिंगोली तर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. जयदिप देशमुख, दलितमित्र व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार, नेत्ररोग तज्ञ डॉ. किशन लखमावार, बालरोग तज्ञ डॉ. दिपक मोरे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बंदखडके यांच्या उपस्थितीमध्ये सामुहिक हिवताप या आजाराचे उच्चाटन करणेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच डॉ. विजय निलावार यांनी हिवताप आजाराविषयी आरोग्य यंत्रणेला दोष देणे योग्य बाब नसल्याबाबत मत व्यक्त केले व जनतेने आपल्या सभोवताचा परिसर स्वच्छ ठेऊन सांडपाणी साचणार नाही व डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
            डॉ. आकाश कुलकर्णी यांनी एक दिवस कार्यक्रम राबवुन हिवताप आजाराचे उच्चाटन होणार नसून जनतेने पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेऊन डासोत्पत्ती होऊ नये म्हणून प्रयत्न्‍ करावे. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, सभोवतालच्या परिसरामध्ये डबकी साचु देऊ नयेत. तसेच हिवताप हा आजार मुख्यत्वे गरोदर महिला व लहान बालकांना होत असल्यामुळे डासांपासून संरक्षण करणेसंबंधी घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
            तसेच सर्व मान्यवरांचे, कर्मचारी वृंदांचे व उपस्थितांचे डॉ. गजानन चव्हाण यांनी आभार मानले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथून भव्य दुचाकी रॅलीचे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घघाटन करण्यात आले. त्यानंतर सदर रॅलीचे जिल्हा हिवताप कार्यालय येथे विसर्जन करण्यात आले. जिल्हा हिवताप कार्यालय येथे उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. गोलाईतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सी. जी. रणवीर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एम. गवळी, यु. टी. डाफणे, आर. बी. जोशी, आर. एस. दरगू, बी. आर. कुटे, एस. व्ही. नाईक, श्री. पुंडगे, श्री. महात्मे, प्रज्योत इंगोले, एस. पी. दहातोंडे, एस. पी. काळे, एम. एम. घुले, ए. एम. मुंढे, बी. के. मस्के, श्री. नलगे, श्री. पतंगे तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

                                                                                                ***** 

24 April, 2017

बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे मे महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 24 :  जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे मे - 2017 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 असे एकूण 1433 क्विंटल साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                                ***** 
जागतिक हिवताप दिनानिमित्त एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 :  हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादी मध्ये होते. हिवताप प्रसारक ॲनाफिलीस डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतु यकृतामध्ये जातात व तेथे त्याची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येतो.
हिवतापाचा प्रसार : थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, नंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्या होतात. हिवतापाचे निदान : हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाच्या रक्तनमुना घेऊन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते. हिवताप उपचार - सुधारित उपचार पध्दती : रक्तनमुना घेतल्यावर हिवताप लक्षणे युक्त रुग्णास उपचार संशयित हिवताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन त्यांना वयोगटानुसार क्लोरोक्वीन गोळ्यांची पुर्ण मात्रा द्यावी व सुक्ष्मदर्शकाव्दारे रक्तनमुने तपासणी अंती हिवतापाचे निश्चित निदान झाल्यावर संबंधित रुग्णास जंतुच्या प्रकारानुसार योग्य तो औषधोउपचार देण्यात यावा.
किटकजन्य रोगांना प्रतिबंध : हिवताप / डेंगु/ चिकनगुणीया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यात डास अंडी घालुन त्यापासून डास अळी व नंतर डास तयार होतात याला प्रतिबंध करण्यासाठी घरातील सर्व पाणीसाठे आठवड्यातून एक दिवस धुवुन पुसुन कोरडे करणे (कोरडा दिवस पाळणे) आवश्यक आहे. घाण पाण्यात क्युलेक्स डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते म्हणून आपल्या परिसरातील सर्व नाल्या वाहत्या होतील डबकी, खड्डे यांच्यात पाणी साचुन राहणार नाही यांची काळजी घेतली तर हिवताप/डेंगु/चिकुणगगुणीया/हत्तीरोग होण्यात प्रतिबंध होऊ शकतो, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जि. के. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

21 April, 2017

वृत्त क्र. 163                                                                                                                                        दिनांक : 21 एप्रिल, 2017    
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी अनुसूचित जाती / जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी  वगैरेसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. तरी जिल्हयातील इच्छुक पात्र उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. या योजनेनुसार समाज कल्याण आणि कलात्मक साहित्य क्षेत्रात कार्य तथा   कल्याणासाठी झटणारे नामवंत व्यक्ती / समाजसेवक असावेत, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तींचे काम कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावेत, स्वयंसेवी संस्था या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात, स्वयंसेवी संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा कार्य 05 वर्षाहून अधिक असावे. विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल. पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्तीस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, मागील पाच वर्षोचे लेखापरिक्षण अहवाल आवश्यक, संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यांविरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी,  सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, व्यक्ती / संस्थेनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल देणे आवश्यक आहे.
*****
वृत्त क्र. 164                                                                                           
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी मांतग समाजाकरिता कला, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणारे नामवंत, कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिला जाणार आहे. तरी जिल्हयातील इच्छुक पात्र मातंग समाजातील उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. मांतग समाजाकरिता कला, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणारे नामवंत, कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती व संस्था, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्ती व संस्थेचे कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या  पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र,  सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, मांतग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहुन पुरस्कारासाठी काम पाहुण पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, मागील पाच वर्षोचे लेखापरिक्षण अहवाल आवश्यक, संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
*****
वृत्त क्र. 165                                                                                           
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर व दुर्बल घटकाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील संस्था / व्यक्तींना पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर व दुर्बल घटकाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, समाज कल्याण क्षेत्रात व अनु.जाती व नवबौध्द समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन, जनजागृती, भूमीहिन शेतमजूर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तीस कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावेत, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल, हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र हया गोष्टींचा विचार केला जाणार नाही, लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा. संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी. 
*****
वृत्त क्र. 166                                                                                           
संत रविदास पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी चर्मकार समाजाचे कल्याणसाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना संत रविदास पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक संस्थांना / व्यक्ती उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. चर्मकार समाजाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तीस कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावेत, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल, लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, व्यक्तीं  गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.
*****
वृत्त क्र. 167                                                                                           
शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागामार्फत सन 2017-2018 साठी संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व या सारख्या व्यक्तीगत व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेल्या संस्थांना शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे असणार आहे. स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी 1860 अंतर्गत विशेष मौलिक मौलिक भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्यात येईल, संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व या सारख्या व्यक्तीगत व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेल्या संस्थेस हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल. वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणतीही संस्था एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार  नाही, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी. 
*****