15 April, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न
            हिंगोली, दि. 15 : सामाजिक  न्याय    विशेष  सहाय्य  विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती  वर्षा  निमीत्त दिनां दि. 08 ते 14 एप्रिल, 2017 या कालावधीत  शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला होता.
            यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 14 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून त्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागृत व्हावी या उद्देशाने कु. राणी संतोष जोगदंड, इयत्ता 9 वी मधील ही मुलगी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक विजेतेपद मिळाल्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तीचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्रावर आधारित संपुर्ण विद्यार्थ्यांकडून मौन वाचन करून ज्ञान दिवसाचे उद्दिष्ठ सफल होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी (शा.नि.शा.) श्रीमती जी. डी. गुठ्ठे यांनी केले. यावेळी अध्यक्ष म्हणून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती डॉ. सी. के. कुलाल तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी प्राचार्य विक्रम जावळे व प्रा. सुखदेव बलखंडे, आर्थिकदृष्टया मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल श्रीमती एस. आर. राठोड, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल गजानन बिहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोर महापुरुषांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य विक्रम जावळे यांनी अर्थशास्त्र व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर प्रा. सुखदेव बलखंडे यांनी समाजशास्त्र या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयातील सर्व शासकीय वसतिगृहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवहार आढळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजीत भराडे यांनी केले. यावेळी वसतिगृहातील विद्यार्थी, एस. जी. चव्हाण, एस. आर. वडकुते, ए. डी. बिजले, आर. एन. गायकवाड व सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

*****

No comments: