13 April, 2017

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्त
 लोककलावंतांचा सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम
हिंगोली, दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती वर्षा निमीत्त दि. 08 ते 14 एप्रिल, 2017 या कालावधीत शासन निर्णयान्वये सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्या नुसार आज दिनांक 13 एप्रिल, 2017 रोजी सामाजिक न्याय भवनामध्ये सहाय्यक आयूक्त समाज कल्याण हिंगोली यांचे वतीने जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील चळवळीतील लोक कलावंत शाहीर सुदाम खंदारे संचातील कलाकार सुभाष खंदारे , बबन खंदारे, किसन केळे, आदी नामवंत लोककलावंतांकडून  विविध सामाजिक विषयावर प्रबोधनपर कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमात शाहीर सुदाम खंदारे यांनी जातीयता निर्मूलन, स्त्रीभृण हत्या, या समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले तसेच बाबासाहेबांचे विचारांवर त्यांचे जीवन पटावर आधारीत भीमगीतांचा कार्यक्रमांचे सादरीकरन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. श्रीमती छाया कुलाल यांनी केले. या कार्यक्रमास विशेष अधिकारी शा.नि.शा. श्रीमती गीता गुठ्ठे , ए.एन. वागतकर, टि.डी. भराड , एस.एस. इंगोले, एन.आर. नकाते, ए.डी. बिजले,. एस.जी. चव्हाण, आर.एन. गायकवाड तसेच बाहयस्त्रोतांचे कर्मचाऱ्यांसह वसतीगृहातील सर्व कर्मचारी तसेच नागरीकांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती. तसेच विशेष अधिकारी शा.नि.शा. समाज कल्याण सेवा गट-ब श्रीमती गीता गुठ्ठे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*****

No comments: