11 April, 2017

राज्य राखीव पोलीस बलाची लेखी परीक्षा 18 एप्रिल रोजी
हिंगोली, दि. 11 : राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 12 हिंगोली यांचे आस्थापनेवरील रिक्‍त असलेली सशस्त्र पोलीस शिपायांची (20) पदे भरण्याकरीता उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. मैदानी चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची 1 : 15 प्रमाणे गुणवत्तेनुसार (436) उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दि. 18 एप्रिल, 2017 मंगळवार रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता वेअर हाऊस, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर, एमआयडीसी, औंढा रोड, लिंबाळा,  हिंगोली  येथे आयोजित केलेली आहे.

*****

No comments: