13 April, 2017

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 20 व 22 अन्वये
कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
हिंगोली, दि. 13 : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये जिल्ह्यात दि. 14 ते 30 एप्रिल, 2017 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त मिरवणूकीच्या दरम्यान उदभवणारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
पोलीस स्टेशनचे नाव व नियुक्त करण्यात आलेले कार्यकारी दंडाधिकारी पुढीलप्रमाणे : 1) पोलीस स्टेशन वसमत शहर व ग्रामीण - मनोहर गव्हाड, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसमत, 2) पोलीस स्टेशन हट्टा - उमाकांत पारधी, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वसमत, 3) पोलीस स्टेशन, कुरूंदा – सचिन जैस्वाल, नायब तहसिलदार तथा महसूल - 1 वसमत, 4) पोलीस स्टेशन हिंगोली शहर व ग्रामीण - विवेक काळे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, हिंगोली, 5) पोलीस स्टेशन नर्सी नामदेव - विजय अवधाने, तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली, 6) पोलीस स्टेशन, बासंबा - माधव बोथीकर, नायब तहसिलदार तथा महसूल - 1 हिंगोली, 7) पोलीस स्टेशन कळमनुरी - श्रीमती गोरे, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, कळमनुरी, 8) पोलीस स्टेशन, बाळापूर - संदीप भांगरे, नायब तहसिलदार तथा महसूल - 1 कळमनुरी, 9) पोलीस स्टेशन औंढा नागनाथ - शाम मदनुरकर, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, औंढा नागनाथ, 10) पोलीस स्टेशन सेनगाव - वैशाली पाटील, तहसलिदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, सेनगांव, 11) पोलीस स्टेशन, गोरेगांव - श्री. पाठक, नायब तहसिलदार महसूल - 1 सेनगांव.
वरीलप्रमाणे नियुक्त केलेल्या दंडाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीपावेतो दि. 14 ते 30 एप्रिल, 2017 या कालावधीत कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नेमणुक करीत आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी यांनी नेमुण दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणुन नियंत्रण ठेवावे. व तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी नेमुण दिलेल्या पोलीस स्टेशन शिवाय त्यांच्या तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नियंत्रण ठेवावे.

*****  

No comments: