14 April, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
            हिंगोली, दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक पी. आर. शिंदे यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

No comments: