25 October, 2016

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध  
            हिंगोली , दि. 25 :- जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, त्यांनी त्यांचे लिफाफा बंद दरपत्रक मा. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, हिंगोली या पत्यावर दि. 7 नोव्हेंबर, 2016 रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील . 
            रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली यांना राहतील .

*****
मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यातील 944 लाभार्थ्यांना 14 कोटी 97 लाख कर्ज वितरण 

हिंगोली, दि. 25 : राज्यातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य तसेच देशातंर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यातील 944 लाभार्थ्यांना 14 कोटी 97 लाख कर्जाचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
 येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईमोद्दील कुरेशी, सहाय्यक नियोजन अधिकारी जी. डी. चव्हाण आदी शासकीय सदस्य या बैठकीस उपस्थिती होती.    
यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, जिल्ह्यातील हिंगोली , औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यातील मानव विकास निर्देशांक कमी असून या योजनेचा  लाभ जास्तीत-जास्त तरुणांना देवून मानव विकास निर्देशांक वाढविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील सर्व बँकांना शिशु-30, किशोर -20 व तरुण-10 याप्रमाणे गटनिहाय  मुद्रा बँक योजनातंर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले असून सर्व बँकांनी वेळेत सदर उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच कृषी प्रक्रियेवर आधारित छोट्या - छोट्या उद्योगांना देखील कर्ज वितरण करावे. मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्यासाठी जनजागृती करत जास्तीत - जास्त तरुणांना या योजनेचा लाभ देण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिल्या.    
बँकनिहाय मुद्रा बँक योजनेतंर्गत लाभार्थ्यांना केलेले कर्ज वितरण
अलाहाबाद बँक -23 प्रकरणे, बँक ऑफ बडोदा -05 प्रकरणे, बँक ऑफ इंडिया -93 प्रकरणे, बँक ऑफ महाराष्ट्र - 70, कॅनडा बँक -15 प्रकरणे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया -05 प्रकरणे, देना बँक -निरंक, आयडीबीआय बँक - 10 प्रकरणे, ओरियटंल बँक ऑफ कॉमर्स-निरंक, पंजाब नॅशनल बँक-01 प्रकरणे, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद-352 प्रकरणे, स्टेट बँक ऑफ इंडिया-95 प्रकरणे, सिंडिकेट बँक -31 प्रकरणे, युको बँक - 09 प्रकरणे, युनियन बँक ऑफ इंडिया -70 प्रकरणे , ॲक्सिस बँक -09 प्रकरणे, एचडीएफसी बँक - निरंक , आयसीआयसी बँक -निरंक , महाराष्ट्र ग्रामीण बँक- 156, पीडीसीसी बँक - निरंक असे एकूण 944 लाभार्थ्यांना 14 कोटी 97 लाख 31 हजार रुपये मुद्रा लोन कर्ज वाटप करण्यात आले आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे.    
****  


 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न
हिंगोली, दि. 25 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रुग्ण कल्याण समिती जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांची बैठक जिल्हाधिकारी  श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी दत्तात्रय धनवे आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
मागील तीन महिन्यांतील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, कुंटूंब कल्याण तसेच मोतीबिंदु शस्त्रक्रियाबाबतची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांना माहिती दिली.
तसेच रुग्णालयात देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक व अद्ययावत सुविधा उपलब्धतेबाबत व वैद्यकीय सुविधा असल्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. सन 2016-2017 मध्ये रुग्ण कल्याण समितीस प्राप्त अनुदान व खर्च याबाबत मान्यतेस्तव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना सादर करण्यात आला. सन 2016-2017 मध्ये आर. के. एस.अतंर्गत प्राप्त अनुदान तसेच रुग्ण कल्याण समितीमधील पुढील खर्चाचे नियोजन व सदर नियाजनास मान्यतेस्तव सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूर येथे नियमित औषध निर्माता हे पद रिक्त असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे रुग्णालयात नियमित औषधनिर्माता हे पद भरेपर्यंत कंत्राटी तत्वावर रुग्ण कल्याण समिती  , आखाडा बाळापूर मधील निधीमधून सदर पद भरण्याचीही परवानगी यावेळी देण्यात आली.
*****


17 October, 2016

वैयक्तीक शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण व नवीन सामुहिक शेततळ्यासाठी
 अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 17 :- शेतकऱ्यांनी स्वखर्चाने उभारणी केलेल्या शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून 60.00 लाख व नवीन सामुहिक शेततळ्यासाठी 190.30 लाख रुपयांचे अनुदान शासनाने मंजुर केले आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी अनुदानासाठी कृषि विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यांची उभारणी केलेली आहे. पाणी साठवण क्षमता कायम राहण्यासाठी शेततळ्यांना प्लॅस्टिक अस्तरीकरण आवश्यक असते. इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
सध्या प्लॅस्टिक अस्तरीकरणास मंजुर झालेल्या अनुदानाच्या कार्यक्रमाचे शेततळ्यांच्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 75 हजार रुपये इतके अनुदान मंजुर केले जाते. प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी कोणत्याही योजनेचे बंधन नाही. अर्ज केल्यानंतर छाननी होऊन अनुदान देण्यात येणार आहे. विशेषत: फळबागा, भाजीपाला, औषधी वनस्पती, फुलांची लागवडसाठी उभारण्यात आलेल्या शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
नवीन सामुहिक शेततळे लाभार्थी निवडीकरिता पुढीलप्रमाणे निकष असणार आहे. :- सामुहिक शेततळे घटकाचा लाभ हा समुहासाठी आहे. समुहात दोन किंवा अधिक लाभार्थी असावेत. लाभार्थी संयुक्त कुंटूबातील नसावेत. लाभार्थी समुहाकडे असणाऱ्या फळबाग, भाजीपाला, फुले व औषधी वनस्पती इ. फलोत्पादन क्षेत्राशी निगडीत सामुहिक शेततळ्याचे आकारमान मंजूर करण्यात यावेत. एकूण फलोत्पादन क्षेत्राच्या किमान 50 टक्के फळबागांचे क्षेत्र असावेत.
फलोत्पादन क्षेत्र हेक्टर व सामुहिक शेततळ्यांचे मंजूर करावयाचे आकरमान घ. मी. पुढीलप्रमाणे :- 2.00 हेक्टर - 2 हजार, 5.00 हेक्टर - 5 हजार, 8.00 हेक्टर - 8 हजार, 10.00 हेक्टर - 10 हजार नवीन सामुहिक शेततळ्याचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व महिला प्रवर्गासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच फिरते हळद प्रक्रिया केंद्र साठी खर्चाच्या 40 टक्के अनुदान असून इच्छूक लाभार्थ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज सादर करण्यात यावा.

*****
मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ
हिंगोली, दि. 17 :- भारत निवडणक आयोगाने  दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याची मुदत शुक्रवार 21 ऑक्टोबर 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक व राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांनी केले आहे.  

***** 

16 October, 2016

जन्म व मृत्यू नोंदणी संदर्भातील बैठक संपन्न

हिंगोली, दि. 16 :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 च्या अंमलबजावणी बैठक जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड,जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती ढेरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी श्री. धनवे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी तसेच आदि विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी खाजगी व शासकीय आरोग्य संस्थामधील जन्म मृत्यू अंतर्गत घटनांची नगर परिषद, नगर पंचायत , ग्रामपंचायतला विहीत नमुन्यात वेळेवर सादर करण्याबाबतच्या अडचणी, खाजगी रुग्णलयांत जन्म मृत्यू अंतर्गत घटनेची माहिती संबंधित अधिकारी किंवा त्यांनी नेमलेला अन्य अधिकारी निबंधकास अशी माहिती विहीत नमुन्यात वेळेत देणे, जन्म मृत्यू अंतर्गत घरी घटना असेल तर कुंटूंब प्रमुख, नातेवाईक , आशा, अंगणवाडी सेविका , दाई आरोग्य सेविका यांनी देणे बंधनकारक आहे.  तसेच आरोग्य संस्थेत व घरी आलेले अर्भक मृत्यू , बाल मृत्यू व माता मृत्यूची नोंदणी निबंधकाकडे होणे बंधनकारक असावे. याबाबत आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांनी काटेकार देखरेख असावी याबाबत महिला पदाधिकारी , सरपंच , पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य , महिला बचत गट यांचे सहकार्य घ्यावे, असे जिल्हाधिकारी श्री . भंडारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांना आरोग्य  माहिती जीवनविषयक आकडेवारी आरोग्य विभाग, नागरी नोंदणी पध्दती निर्देशांक , मृत्यू नोंदणी अहवाल, जन्म नोंदणी अहवाल विषयीची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांनी दिली.

***** 
जिल्हाधिकारी कार्यालयात
महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी  

हिंगोली, दि. 16 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी श्री. लतीफ पठाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.  

****
 

15 October, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

हिंगोली, दि. 15 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.  

***** 
बीपीएल कार्ड धारकांना साखरेचे माहे नोव्हेंबर महिन्यासाठी
1433 क्विंटलचे नियतन मंजुर
        हिंगोली, दि. 15 :- जिल्ह्यासाठी बीपीएल कार्डधारकांना माहे नोव्हेंबर - 2016 या महिन्याकरीता  तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये) हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 373, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 180, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली  ( स्थित ) - 285, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ शासकीय गोदाम, कळमनुरी - 360, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 235 एकूण 1433, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        ***** 
शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य
हिंगोली, दि. 15 : आधार (Targeted delivery of Financial and Other Subsidies, Benefit[ Services) Act, 2016 च्या कलम 7 नुसार आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट करावयाच्या ज्या शिधापत्रिकाधारकांकडे आधार क्रमांक उपलब्ध नसेल अशा लाभार्थ्यांनी आधार केंद्रावरून त्वरीत आधार क्रमांक उपलब्ध करून घेण्यात यावा. तसेच ज्यांनी अद्याप पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नसेल अशा अत्योंदय अन्न योजना / प्राधान्य कुटूंब योजना / एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर, 2016 रोजी पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करून देणे या कायद्यांतर्गत अनिवार्य करण्यात आलेले आहे.
ज्या लाभार्थ्यांना सध्या अन्नधान्याचा लाभ मिळत आहे, परंतू त्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक उपलब्ध करून दिलेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांची नावे दि. 16 नोव्हेंबर, 2016 पासून यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येवून त्यांना अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.
तरी सर्व योजनेतील लाभार्थ्यांना याव्दारे आवाहन करण्यात येत असून आपला आधार क्रमांक अद्याप संबंधीत रास्तभाव दुकानदार / कार्यालय यांचेकडे उपलब्ध करून दिलेला नसेल त्यांनी दि. 15 नोव्हेंबर, 2016 रोजी पर्यंत आधार क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा. नसता सदर कायद्यानूसार आपली नावे यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येवून अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

***** 
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व व्याख्यान संपन्न
हिंगोली, दि. 15 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोलीच्या वतीने  भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन  म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने प्रा. विलास वैद्य, प्रसिध्द कवी यांच्या हस्ते करण्यात आले.
 या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक अशोक अर्धापुरकर हे होते. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी प्रा.विलास वैद्य यांचे वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यान झाले. तसेच त्यांनी यावेळी कविता सादर केली.
काल महया सजनाचा मन कागुद ग आला
जीव चोळामोळा पुन्हा देवळीत ठुला
पुसले नंदेला गं काय कागुद गं आला
तीनं वटारले गं डोळे त्यात साजन गं दिसला..
तसेच साहित्यिक अशोक अर्धापुरकर यांचे अध्यक्षीय भाषणात वाचनाबाबतचे फायदे सांगितले. यावेळी  बंडू देशमुख, राजू कल्याणकर या विदयार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्र.त्रि.पाटील यांनी केले. यावेळी कार्यालयाचे श्री. पुनसे, श्री. कापसे व विदयार्थी वाचक उपस्थित होते.         

*****

14 October, 2016

जिल्ह्यातील प्राचार्याची डिजीटल स्वाक्षरी व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 13 :- सन 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत विविध शैक्षणिक योजनाकरिता प्राचार्यांची डिजीटल स्वाक्षरी व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँकखात्याशी लिंक असणे आवश्यक केल्यामुळे संबंधित प्राचार्यांच्या डिजीटल स्वाक्षरी शिवाय आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक लिंक केल्याशिवाय शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, विद्यावेतन यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ विद्यार्थी व महाविद्यालय यांना मिळणार नाही. या बाबतच्या सूचना प्राचार्यांच्या आढावा बैठकीमध्ये वारंवार देऊनही संबंधित प्राचार्यांनी सदर बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे आज पर्यंत बहुतांश प्राचार्यांचे डिजीटल स्वाक्षऱ्या समाज कल्याण विभागास प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच किती विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक करण्यात आले या बाबतची माहिती महाविद्यालयाकडून मिळालेली नाही.
तरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्वत:ची डिजीटल स्वाक्षरी करून त्या बाबत समाज कल्याण विभागास कळवावे व आपल्या महाविद्यालयात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केल्याची खात्री करुन घ्यावी. नसल्यास त्या बाबत आपल्यास्तरावरूकार्यवाही करावी. परंतु सन 2016-2017 मध्ये प्राचार्यांची डिजीटल स्वाक्षरी आणि विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक न झाल्यामुळे समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजने पासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*****
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

            हिंगोली, दि. 13 :- राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क, व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात दि. 17 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही दिन होणार आहे. ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली यांचे कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. ए. कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  

13 October, 2016



गैरन्यायीक सदस्य पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 13 : राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य येथे गैरन्यायीक सदस्य यांची रिक्त पदे भरण्याकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाकरीता ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 तसेच सुधारीत महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000 च्या संबंधीत तरतुदी लागु आहेत. उमेदवारांची अर्हता पात्रतेचे निकष यासंबधीची माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच हिंगोली या कार्यालयात आवश्यक शुल्क रुपये 100/- (अक्षरी शंभर रुपये) भरून उपलब्ध होवू शकतील. संपुर्ण तपशिलासह भरलेले अर्ज मा. प्रबंधक प्रशासन राज्य ग्राहक वाद निवारण आयोग,महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयात दिनांक 05 नोंव्हेंबर, 2016 पुर्वी पोहचणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा ग्राह‍क तक्रार निवारण मंच हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****

08 October, 2016

जलयुक्त शिवार अभियानाबाबत

पत्रकारांसाठी पुरस्कार योजना

हिंगोली, दि. 8 :- उत्कृष्ट लिखाणाद्वारे जलसंधारणाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. यानुसार जलयुक्त शिवार अभियानात लिखाण केलेल्या पत्रकारांनी आपले प्रस्ताव 30 ऑक्टोबर 2016 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करावेत.
जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद कार्यक्षम वापर, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित करणे, इतर गावांना प्रोत्साहित करुन पाणी प्रश्न सोडविण्यास योगदान देणारे पत्रकार पुरस्कारांसाठी पात्र राहणार आहे. मुद्रीत पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असे गट आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तर, विभागस्तर जिल्हास्तरावर तर इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी पुरस्कार दिले जाणार आहेत. पत्रकारांसाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 35 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 25 हजार रुपये स्मृतीचिन्ह अशी आहे.
विभागस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 30 हजार रुपये, व्दितीय क्रमांक 20 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 15 हजार रुपये स्मृतीचिन्ह अशी आहे.
जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 12 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 10 हजार रुपये स्मृतीचिन्ह अशी आहे.  
तसेच इलेक्ट्रॉनिक्स मिडीयासाठी राज्यस्तरीय पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71 हजार रुपये तर तृतीय क्रमांक 51 हजार रुपये स्मृतीचिन्ह अशी आहे. पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील दैनिके, साप्ताहिके पाक्षिकातील लिखाणाचा विचार केला जाईल. यासाठी 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीतील लिखाणाचा विचार केला जाईल. इलेक्ट्रॉनिक मिडीयासाठी मराठी भाषेतील वृत्तकथेचा विचार करण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ग्राम विकास जलसंधारण विभागाचा मफुअ-2013/प्र.क्र.37/जल-8, दि. 28 सप्टेंबर 2016 हा शासन निर्णय पाहावा.

*****