06 October, 2016

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम

          हिंगोली, दि. 6 :-  राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, दिनांक 7 ऑक्टोंबर,2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
            मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे दिनांक 7 ऑक्टोबर, 2016 रोजी दुपारी 3-00 वाजता पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिम येथून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील.  दुपारी 3-20 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान, हेलिपॅड, हिंगोली येथे आगमन. 3-25 वाजता मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण.  दुपारी 3-30 वाजता शेतकरी व महिला बचत गट मेळावा (श्री. सुमित वानखेडे , विकाअ,) (आमदार श्री. तान्हाजी मुटकूळे-9665368999). सायंकाळी 4-50 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान, हिंगोली हेलिपॅडकडे प्रयाण. 4-55 वाजता पोलीस कवायत मैदान, हिंगोली हेलिपॅड येथे आगमन आणि 5-00 वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील.  

**** 

No comments: