30 August, 2018

सुधारित बीज भांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन


सुधारित बीज भांडवल योजना आणि
 जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.30:  जिल्ह्यातील  सुशिक्षित बेरोजगारांसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता सुधारित बीज भांडवल कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील  अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी सुधारीत बीज भांडवल कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता कर्ज प्रकरणे मागविण्यात येत आहेत.
सुधारीत बीज भांडवल योजनेसाठी पात्रता- अर्जदार किमान 7 वी पास असावा, वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे, उमेदवार बेरोजगार असावा, उमेदवाराचे महाराष्ट्रात  15 वर्षे वास्तव्य असावे, तर जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी पात्रता- शिक्षणाची अट नाही, वय 18 वर्षे पूर्ण असावे,  योजनेअंतर्गत उद्योग व सेवा उद्योग (वाहन व हॉटेल सोडून) यासाठी कर्ज मिळू शकते, यंत्र सामुग्रीतील एकूण गुंतवणुक रु. 2 लाखाच्या आत असावे,  ही योजना  1981 च्या गणनेनुसार एक लाख पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात लागू आहे, योजनेखाली उद्योग व सेवा उद्योग तसेच अस्तित्वात असलेल्या लघु उद्योगाच्या वाढीसाठी अर्ज करता येतो.    
संबंधित सुशिक्षित बेरोजगारांनी दिनांक 30सप्टेंबर 2018 पर्यंत आपले अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,एस-12, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत दाखल करावेत असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. 
000000

28 August, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि
डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता
व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

        हिंगोली, दि.28: महाराष्ट्र शासनाच्या उच्च्‍ व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना  अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार  आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या  सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
            राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,ब,क,ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 50 हजार, 30 हजार, 20 हजार, 10 हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार रोख, शाल,श्रीफळ आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 15 हजार रोख रक्कम,शाल,श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
            सन 2018-19 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय,कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 28 सप्टेंबर 2018 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन सुभाष राठोड, प्र. ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केले आहे.
00000

21 August, 2018

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 61.96 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 61.96 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली,दि.21: जिल्ह्यात दिनांक 21 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 61.96  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 309.82 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 643.06 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर  72.03 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 21 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस): हिंगोली-66.86 (640.52),वसमत-51.29 (637.68), कळमनुरी-66.00 (708.34), औंढा नागनाथ-84.00 (686.00), सेनगांव-41.67 (542.74) आज अखेर पावसाची सरासरी 643.06 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन कार्यशाळेचे 24 ऑगस्ट रोजी आयोजन


महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन कार्यशाळेचे 24 ऑगस्ट रोजी आयोजन

हिंगोली, दि.21: महाराष्ट्र भूजल, विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 मधील प्रयोजने पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 25 जुलै, 2018 रोजी अभिप्रायासाठी अधिसूचना काढून महाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) नियम 18 चे मसुदा नियम महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, संस्था, व इतर घटकांना महाराष्ट्र भूजल ( विकास व व्यवस्थापन ) नियम 18 च्या मसुद्याबाबत सूचना व हरकती नोंदवण्यासाठी दि. 24 ऑगस्ट, 2018 रोजी दु. 4.00 वाजता जिल्हा परिषद हिंगोली येथील षटकोनी सभागृहात बैठकीचे (कार्यशाळेचे) आयोजन केले आहे.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना व अभिप्राय लेखी स्वरूपात विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****

सैनिकांच्या पाल्यांकरिता जबलपूर येथे युनिट कोटा सैन्य भरतीचे आयोजन


सैनिकांच्या पाल्यांकरिता जबलपूर येथे युनिट कोटा सैन्य भरतीचे आयोजन

हिंगोली,दि.21: जिल्ह्यातील सर्व आजी / माजी सैनिक व विधवांसाठी दि. 25 सप्टेंबर, 2018 ते 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत 1 एस. टी. सी. जबलपूर येथे आजी/माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांसाठी सैन्य भरतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्निकल व सोल्जर ट्रेडसमॅनची भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी भरतीचे ठिकाणी सकाळी 4.30 वाजण्यापूर्वी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्षाशी संपर्क साधावा, असे सैनिक कल्याण कक्षाने कळविले आहे.
*****

20 August, 2018

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 13.05 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 13.05 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली,दि.20: जिल्ह्यात दिनांक 20 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 13.05  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 65.26 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 581.09 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर  65.09 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 20 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस): हिंगोली-6.86 (573.66),वसमत-22.57 (586.39), कळमनुरी-14.50 (642.34), औंढा नागनाथ-13.50 (602.00), सेनगांव-7.83 (501.07) आज अखेर पावसाची सरासरी 581.09 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

जिल्हाधिकारी कार्यालयात सदभावना दिनानिमत्त प्रतिज्ञा


जिल्हाधिकारी कार्यालयात सदभावना दिनानिमत्त प्रतिज्ञा

            हिंगोली,दि.20:माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘सदभावना दिन’ साजरा करण्‍यात आला. सदभावना दिनानिमित्‍त अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिज्ञा दिली.
       यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी लतिफ पठाण, उपजिल्‍हाधिकारी (सा.प्र.) श्री. बोरगावकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*****

शासकीय कर्मचाऱ्यांची सर्वकष माहितीकोष 2018 अद्यावत करण्याचे आवाहन


शासकीय कर्मचाऱ्यांची सर्वकष माहितीकोष 2018 अद्यावत करण्याचे आवाहन

            हिंगोली,दि.20: राज्य्‍ा शासनाने शासनाच्या सेवेतील राज्य्‍ा शासकीय तसेच जिल्हा परिषदेत कार्यरत राज्य्‍ा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष अद्यावत करण्यात येत आहे. शासनाच्या नियोजन विभागाच्या दिनांक 04 जुन, 2018 च्या परिपत्रकान्वये कर्मचारी सर्वकष माहितीकोष 2018 अद्यावत करण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील राज्य्‍ा शासन, जिल्हा परिषद मधील सर्व राज्य्‍ा शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष अद्यावत करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.यामध्ये कार्यालयाची तसेच कर्मचाऱ्यांची माहिती https://mahasdb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संबंधीत सर्व कार्यालयांनी माहिती अद्यावत करावी.
सदरील माहिती दि. 1 जुलै, 2018 संदर्भ दिनांकास अनुसरून अद्यावत करावयाची आहे. सदर माहिती कोषामधील माहितीच्या सत्यतेबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखाची राहील. त्यामुळे माहितीकोषामध्ये ऑनलाईन माहिती सादर करते वेळेस काळजीपूर्वक माहिती सादर करणे आवश्य्‍ाक आहे. सदर संकेतस्थळावर माहिती अद्यावत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जिल्हा सांख्यिकी कार्यालयामधून USER ID आणि PASSWORD उपलब्ध करून देण्यात येतील. त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयातील दि. 1 जुलै, 2018 संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांची माहीती अद्यावत करावी सदरील माहिती अद्यावत झाल्यानंतर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती सादर केल्याबाबतचे प्रथम प्रमाणपत्र सप्टेंबर 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्रथम प्रमाणपत्र नोव्हेंबर,2018 अखेर प्राप्त्‍ा करून घ्यावे अन्यथा नोव्हेंबर 2018 (November 2018 Paid in December 2018) चे वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली जाणार नाहीत.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून आपण सादर केलेल्या माहितीची खात्री व त्रुटींचे निरसन केल्यानंतर दूसरे प्रमाणपत्र डिसेंबर 2018 ते फेब्रूवारी 2019 या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून माहिती बरोबर असल्याबाबतची खातरजमा झाल्यानंतर त्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र फेब्रूवारी, 2019 अखेर प्राप्त्‍ा करून घ्यावे अन्यथा संबंधीत कार्यालयाचे फेब्रूवारी 2019 (February 2019 paid in March 2019) चे वेतन देयके पारित न करण्याचे शासनाचे आदेश आहेत याची गांभिर्याने नोंद घ्यावी. त्याअनुषंगाने सदर माहितीकोषामध्ये माहिती अद्यावत करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
*****

18 August, 2018

महिला लोकशाही दिनाचे 20 ऑगस्ट रोजी आयोजन


महिला लोकशाही दिनाचे 20 ऑगस्ट रोजी आयोजन

        हिंगोली, दि.18: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडित महिलांना  सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी  यासाठी  एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे. ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालयात  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हिंगोली यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि.जी. शिंदे  यांनी केले आहे .
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 5.29 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 5.29 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली,दि.16: जिल्ह्यात दिनांक 18 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 5.29  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26.46 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 565.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर  63.38 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 18 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस):हिंगोली-2.14(563.09),वसमत-6.57(563.82), कळमनुरी-8.50(625.67), औंढानागनाथ-5.75(588.50), सेनगांव-3.50(488.07) आज अखेर पावसाची सरासरी 565.83 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
0000