30 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 277 रुग्ण ; तर 245 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

  1323 रुग्णांवर उपचार सुरु तर पाच रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात 277 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 13 व्यक्ती, वसमत परिसर 14 व्यक्ती, कळमनुरी परिसर 15 व्यक्ती,  सेनगाव परिसर 12 व्यक्ती व औंढा परिसर 16 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 23 व्यक्ती, वसमत परिसर 21, कळमनुरी परिसर 114 व्यक्ती, सेनगाव परिसर 34 व्यक्ती, औंढा परिसर 15 व्यक्ती असे एकूण 277 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 245 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 440 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 35 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 475 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 12 हजार 747  रुग्ण झाले असून, त्यापैकी  11 हजार 192 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1323 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 232 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

मौजे येळी येथील बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 



हिंगोली, (जिमाका) दि. 30 :  मौजे येळी ता. जि. हिंगोली येथे एका अल्पवयीन मूलीचा बाल विवाह दि. 30 एप्रिल, 2021 रोजी लावून दिला जात असल्याची तक्रार / माहिती चाईल्ड लाईनला मिळाली असता त्यावरुन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार व चाईल्ड लाईन यांच्या हस्तक्षेपामूळे सदरील नियोजीत बाल विवाह रोखण्यास  जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात लगीनसराईला वेग आला आहे. यातच हिंगोली तालुक्यातील मौजे येळी या गावात बालविवाहाचे नियोजन असल्याची चाहूल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिवीक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे, बाह्य क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदिप कोल्हे, टिम मेंबर स्वप्नील दिपके यांनी सदरील गावातील ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रविशंकर पाटील, सरपंच सुनिता शिवकुमार कापसे, पोलीस पाटील सदाशिव लिंबाळकर, अंगणवाडी आई अनुसयाबाई वाकळे यांनी मुलीचे आई-वडील व मूलीची भेट घेवून बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे व या गुन्हास 01 लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजूरीची शिक्षा किंवा दोन्ही होवू शकतात व बालविवाहाच्या दुष्परीणामाविषयी समुपदेशन करण्यात आले. सर्वासमक्ष अई-वडीलांचा जबाब लिहून घेण्यात आला व सदरील बालविवाह रोखण्यात आला असल्याची माहिती जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.    

 

*****

 

 

 

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा

 


नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : भारतीय हवामान विभागाने दि. 30 एप्रिल 2021 ते दि. 02 मे, 2021 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट व पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहेत.  

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1) आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी  तसेच नागरिकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2) जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3) झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4) वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5) वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6) विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.

7) वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका:

1) पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.

2) विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3) दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4) धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

            त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी . 

 

****

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन

   



        हिंगोली,(जिमाका)दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र गळगे आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी-कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

29 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 197 रुग्ण ; तर 221 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

*·  1296 रुग्णांवर उपचार सुरु तर सहा रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात 197 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 17 व्यक्ती, कळमनुरी परिसर 20 व्यक्ती,  सेनगाव परिसर 03 व्यक्ती व औंढा परिसर 16 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 136 व्यक्ती, वसमत परिसर 05 असे एकूण 197 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 221 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 440 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 39 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 479 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 12 हजार 470  रुग्ण झाले असून, त्यापैकी  10 हजार 947 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1296 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 227 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

 

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

 

हिंगोली (जिमाका),दि.29: राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन आज ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्य मंत्री शंभुराज देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, इंडस्ट्री असोसिएट्सचे प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे. राज्याचे औद्यौगिक धारेण निश्चित करणे. औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे. सदर निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील, राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील निवडलेल्या 568 कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी  उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांचेवर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करुन राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे.

****

 

महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

 

महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

        हिंगोली,(जिमाका)दि.29: कोरानाचा प्रादूर्भाव खंडीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन‍ विभागाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिनांक 13 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये दिनांक 1 मे, 2021 च्या सकाळी 7.00 वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले असुन खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.

 जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8.00 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरीता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करु नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे.

तसेच वरील नमूद ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे, इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. कवायती, संचलन आयोजन करण्यात येऊ नये. विधीमंडळ, मा. उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयामध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.

ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यानी ध्वजारोहण करावे.         आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोव्हिड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे, सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी.

****

28 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 140 रुग्ण ; तर 236 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

*·  1326 रुग्णांवर उपचार सुरु तर अकरा रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात 140 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 07, वसमत परिसर 09 व्यक्ती, कळमनुरी परिसर 18 व्यक्ती,  सेनगाव परिसर 12 व्यक्ती व औंढा परिसर 16 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 44 व्यक्ती, कळमनुरी परिसर 34 असे एकूण 140 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 236 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज अकरा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 460 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 41 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 501 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 12 हजार 273  रुग्ण झाले असून, त्यापैकी  10 हजार 726 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1326 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 221 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

                                     


माजी राज्यमंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन

 

हिंगोली, (जिमाका) दि.28: माजी राज्यमंत्री एकनाथ महादेव गायकवाड यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले. मुंबई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.  सातारा येथे 1 जानेवारी, 1940 रोजी त्यांचा जन्म झाला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.

एकनाथ गायकवाड हे धारावी मतदारसंघातून 1985, 1990 आणि 1999 आमदार म्हणुन निवडुन आले होते. त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे त्यांनी राज्यमंत्री पद भूषविले होते. एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते.

******  

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 236 रुग्ण ; तर 200 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

*·  1433 रुग्णांवर उपचार सुरु तर सात रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात 236 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 21, वसमत परिसर 11 व्यक्ती, कळमनुरी परिसर 08 व्यक्ती,  सेनगाव परिसर 07 व्यक्ती व औंढा परिसर 20 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 26 व्यक्ती, कळमनुरी परिसर 73, वसमत परिसर 35 व्यक्ती, सेनगाव परिसर 14 व्यक्ती  व औंढा परिसर 21 व्यक्ती असे एकूण 236 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 200 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 438 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 41 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 479 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 12 हजार 133  रुग्ण झाले असून, त्यापैकी  10 हजार 490 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1433 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 210 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

27 April, 2021

कळमनुरी तालुक्यातील सहा गावात कंटेनमेंट झोन घो‍षित

 


 

            हिंगोली, (जिमाका) दि. 27 : कळमनुरी तालुक्यातील मौ. जांब, पोत्रा, नांदापुर, सालापूर, चिखली जुनी, वारंगा फाटा या सहा गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी वरील सर्व गावातील संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा  ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

 ****

 

सेनगांव तालुक्यातील जामठी (बु) कंटेनमेंट झोन घो‍षित

 


 

            हिंगोली, (जिमाका) दि. 27 : सेनगांव तालुक्यातील मौ. जामठी (बु) गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी गावातील संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा  ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

 ****

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा

 


नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारतीय हवामान विभागाने दि. 26 एप्रिल ते दि. 29 मार्च, 2021 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट व पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहेत.  

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1) आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी  तसेच नागरिकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2) जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3) झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4) वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5) वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6) विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.

7) वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका:

1) पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.

2) विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3) दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4) धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

            त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी . 

******  

 

 

26 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 239 रुग्ण ; तर 212 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

*·  1404 रुग्णांवर उपचार सुरु तर सात रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात 239 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 19, वसमत परिसर 03 व्यक्ती, कळमनुरी परिसर 19 व्यक्ती,  सेनगाव परिसर 07 व्यक्ती व औंढा परिसर 22 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 81 व्यक्ती, कळमनुरी परिसर 69  व औंढा परिसर 19 व्यक्ती असे एकूण 239 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 212 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 440 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 41 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 481 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 11 हजार 897  रुग्ण झाले असून, त्यापैकी  10 हजार 290 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1404 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 203 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गत योजनांबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गत

योजनांबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

        हिंगोली (जिमाका),दि.26 : जिल्हा कौशल्या  विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र, हिंगोली अंतर्गत दिनांक 28 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गतच्या योजनांबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर मिटींग युआरएल https://meet.google.com/fuh-yurp-pqi या लिंकवर आयोजित करण्यात आले आहे.

            या ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गतच्या योजनांबाबत हिरालाल गतखने, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित हिंगोली मार्गदर्शन करणार आहेत. वेबीनार  बाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

            या मार्गदर्शन सत्रात हिरालाल गतखने, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित हिंगोली आणि प्र.सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत. याकरीता जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे मोफत, विनाशुल्क लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या सत्राचा लाभ घेण्याकरीता https://meet.google.com/fuh-yurp-pqi या लिंकवर क्लिक करावे, आपल्याकडे  google meet app  इन्स्टॉल करुन घ्यावे, आपण गुगल मीट ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क्‍ टू जॉइनवर क्लिक करावे, सदर पत्रामध्ये सहभागी हाण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉइन करावे, दिलेल्या लिंक मधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक म्युट/ बंद करावे, सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक अनम्युट/ सुरु करुन विचारावे व लगेच माईक म्युट/ बंद करण्याची दक्षता घ्यावी, प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत,असे अवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांच्याकडुन करण्यात आले आहे.

****

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

        हिंगोली (जिमाका), दि.26 : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस-3 दुसरा माळा, हिंगोली यांच्या विद्यमाने दि. 28 ते 30 एप्रिल, 2021 या कालावधीमध्ये ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

            या मेळाव्यास धुत ट्रान्समिशन प्रा.लि.औरंगाबाद, समस्था मायक्रोफायनान्स, सोलापूर या उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून त्यांना पुढीलप्रमाणे पदे भरावयाची आहेत. यामध्ये ईपीपी ट्रेनी, कस्टमर रिलेशनशिप ऑफीसर रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर एम्प्लॉयमेंट/रोजगार या पर्यायावर क्लिक करुन जॉब सीकर/नोकरी साधक हा पर्याय निवडावा. युजर आयडी व पासवर्ड द्वारे लॉग इन करुन प्रोफाईल मधील पंडीत  दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाद्वारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे.

            इयत्ता 10 वी पास किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता, अभियांत्रिकी पदवी व आयटीआय पास उमेदवारांनी सदर मेळाव्यास ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

****

25 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 90 रुग्ण ; तर 178 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 

*·  1384 रुग्णांवर उपचार सुरु तर दहा रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 90 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 07, वसमत परिसर 02 व्यक्ती, कळमनुरी परिसर 03 व्यक्ती,  सेनगाव परिसर 07 व्यक्ती व औंढा परिसर 10 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 58 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती व  कळमनुरी परिसर 02 असे एकूण  90 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 178 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 450 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 44 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 494 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 11 हजार 658  रुग्ण झाले असून, त्यापैकी  10 हजार 78 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1384 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 196 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

24 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 323 रुग्ण ; तर 282 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  1482 रुग्णांवर उपचार सुरु तर चार रुग्णांचा मृत्यू

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 323 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 28, वसमत परिसर 03 व्यक्ती, कळमनुरी परिसर 16 व्यक्ती,  सेनगाव परिसर 09 व्यक्ती व औंढा परिसर 17 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 61 व्यक्ती, वसमत परिसर 39 व्यक्ती, औंढा परिसर 13 व्यक्ती,  कळमनुरी परिसर 105 व्यक्ती व सेनगाव परिसर 32 व्यक्ती असे एकूण  323 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 282 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 410 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 46 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 456 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 11 हजार 568  रुग्ण झाले असून, त्यापैकी  9 हजार  900 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1482 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 186 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुधारीत आदेश निर्गमीत

 


·         जिल्हाप्रशासनामार्फत रविवार पासून जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू

 

    हिंगोली,(जिमाका) दि.24: राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2021 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोव्हीड-19) नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागाचे मुख्य सचिवांच्या दि. 13 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील कोविड-19 च्याअनुषंगाने दि.30 एप्रिल, 2021 रोजीपर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध सूचना नुसार सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने दि. 14 एप्रिल, 2021 रोजी रात्री 8.00 पासून ते दि. 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. परंतु शासनाने त्यात सुधारणा करून दिलेल्या सूचना प्रमाणे बदल करून आदेश निर्गमित करण्यात आले होते, परंतु  सदर आदेशातही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हिंगोली यांना प्राप्त अधिकारानुसार खालील सेवेच्या बाबतीत सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.

यामध्ये हिंगोली जिल्ह्यात किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), कृषी औजारे व शेतमाल, पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक/संस्थेसाठी) विक्रेते, ही दुकाने / आस्थापना  दि. 25 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 01.00 वाजेपासून ते 01 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत या कालावधीत पूर्ण बंद राहतील. सदर कालावधीत फक्त दुध विक्री केंद्र/विक्रेते यांना या कालावधीत सकाळी 07.00 ते सकाळी 10.00 वाजता व सायंकाळी 06.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. इतर सर्व वस्तू, साहित्य, पदार्थ यांच्या घरपोच सेवा देण्यास बंदी असेल.

सर्व शासकीय कार्यालयातील (केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) उपस्थिती 15% राहील. परंतु फक्त कोव्हिड-19 च्या संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून. ज्या शासकीय कार्यालयांना 15% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे. त्या कार्यालय प्रमुखांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. शासन आदेश दि. 13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्र.5 नुसार या कार्यालयाचे आदेश दि.13 एप्रिल, 2021 मध्ये नमूद कार्यालयातील उपस्थिती एकूण कर्मचाऱ्याच्या 15% किंवा 5 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील. शासन आदेश दि.13 एप्रिल, 2021 मधील मुद्दा क्र.2 नुसार या कार्यालयाचे आदेश दि.13 एप्रिल, 2021 मध्ये नमूद अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालयीन कामासाठी उपस्थिती कमीत कमी 15% असावी. परंतु कोणत्याही परीस्थितीत 50% च्या वर नसावी. तसेच अत्यावश्यक सेवे संबंधित प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी ठेवावी परंतु 100% पर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता येईल.

           लग्न समारंभ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पडता येईल. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी लग्न सोहळा पार पाडता येणार नाही.

            खाजगी प्रवासी वाहतूक फक्त निकडीचे किंवा अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी वाहन चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50% च्या मर्यादेपर्यंत प्रवास करता येईल. जिल्हा अंतर्गत किंवा शहरात प्रवास करता येणार नाही परंतु अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारणासाठी किंवा न टाळण्यासारख्या कार्यक्रमासाठी जसे अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी परवानगी घेवून प्रवास करता येईल. जर यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास रु.10,000/- दंड लावण्यात येईल. खाजगी प्रवासी बसेसना (Travels) वाहतूक करण्यास या कालावधीत पूर्णत: बंदी राहील.

             राज्य शासकीय किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची वाहने 50% च्या प्रवासी क्षमतेच्या मर्यादेत वाहतूक करण्यास परवानगी राहील. हिंगोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस या कालावधीमध्ये बंद राहतील. तसेच  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसच्या व्यवस्थापनासाठी बस स्थानक कार्यरत राहतील. परंतु  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बस स्थानका शिवाय इतर कुठेही थांबणार नाहीत.

            जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार केवळ त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी सुरु राहतील. तसेच सदर कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरु ठेवता येतील. परंतु सर्व सामान्य नागरिकांचे व्यवहार करण्यास बंदी असेल. जिल्ह्यातील जे नोंदणीकृत उद्योग आहेत त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कर्मचारी / कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे कडून ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील. दुय्यम निबंधक कार्यालयांबाबत या कालावधीत जिह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हिंगोली व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये हे दस्तनोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहार करण्याकरिता सर्व नागरिकांसाठी बंद राहतील. केवळ कार्यालयीन कामकाज करण्याकरिता चालू राहतील.

           सदर आदेश हे हिंगोली जिल्ह्यात दिनांक 22 एप्रिल, 2021 रोजी पासून रात्री 08.00 ते दिनांक 01 मे, 2021 चे सकाळी 7.00 वाजेपर्यत लागू राहणार आहेत. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची असणार आहे.

                     या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी करावी.

****

23 April, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 228 रुग्ण ; तर 208 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज


*·  1445 रुग्णांवर उपचार सुरु तर सात रुग्णांचा मृत्यू*

 

हिंगोली, (जिमाका) दि. 23 : जिल्ह्यात 228 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार ,रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 25, वसमत परिसर 09 व्यक्ती, कळमनुरी परिसर 20 व्यक्ती, सेनगाव परिसर 12 व्यक्ती व औंढा परिसर 23 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 49 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती,औंढा परिसर  04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 78 व सेनगाव परिसर 06 व्यक्ती असे एकूण  228 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 208 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 420 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 48 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 468 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 11 हजार 245 रुग्ण झाले असून, त्यापैकी  9 हजार 618 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1445 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 182 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा ,शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 199 रुग्ण ; तर 183 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज


*·  1339 रुग्णांवर उपचार सुरु तर पाच रुग्णांचा मृत्यू*


हिंगोली, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात 199 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार ,रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 17, वसमत परिसर 05 व्यक्ती, कळमनुरी परिसर 35 व्यक्ती, सेनगाव परिसर 19 व्यक्ती व औंढा परिसर 19 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 49 व्यक्ती, वसमत परिसर 24 व्यक्ती,औंढा परिसर  08 व्यक्ती व कळमनुरी परिसर 23 व्यक्ती असे एकूण  199 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 183 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 340 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 28 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 368 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 10 हजार 678 रुग्ण झाले असून, त्यापैकी  9 हजार 170 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 1339 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 169 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा ,शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****