30 April, 2021

मौजे येळी येथील बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 



हिंगोली, (जिमाका) दि. 30 :  मौजे येळी ता. जि. हिंगोली येथे एका अल्पवयीन मूलीचा बाल विवाह दि. 30 एप्रिल, 2021 रोजी लावून दिला जात असल्याची तक्रार / माहिती चाईल्ड लाईनला मिळाली असता त्यावरुन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार व चाईल्ड लाईन यांच्या हस्तक्षेपामूळे सदरील नियोजीत बाल विवाह रोखण्यास  जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात लगीनसराईला वेग आला आहे. यातच हिंगोली तालुक्यातील मौजे येळी या गावात बालविवाहाचे नियोजन असल्याची चाहूल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिवीक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे, बाह्य क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदिप कोल्हे, टिम मेंबर स्वप्नील दिपके यांनी सदरील गावातील ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रविशंकर पाटील, सरपंच सुनिता शिवकुमार कापसे, पोलीस पाटील सदाशिव लिंबाळकर, अंगणवाडी आई अनुसयाबाई वाकळे यांनी मुलीचे आई-वडील व मूलीची भेट घेवून बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे व या गुन्हास 01 लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजूरीची शिक्षा किंवा दोन्ही होवू शकतात व बालविवाहाच्या दुष्परीणामाविषयी समुपदेशन करण्यात आले. सर्वासमक्ष अई-वडीलांचा जबाब लिहून घेण्यात आला व सदरील बालविवाह रोखण्यात आला असल्याची माहिती जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.    

 

*****

 

 

 

No comments: