31 July, 2018

डेंग्यू जागृती मोहीम पंधरवड्याचे आयेाजन


डेंग्यू जागृती मोहीम पंधरवड्याचे आयेाजन

हिंगोली,दि.31: जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने 01 ते 15 ऑगस्ट 2018 या कालावधीत शालेय डेंग्यू जागृती मोहीम पंधरवडा म्हणून राबविण्यात येणार आहे. डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून यावर कोणताही ठोस असा उपाय नाही. त्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे डासोत्पती स्थानांवर प्रतिबंध घालणे. सदर मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. तसेच इयत्ता 5 वी ते 12 वी मधील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी उत्साही असतात त्यामुळे शालेय मुलांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रणासंदर्भात डेंग्यू आजाराविषयी जागृती करण्याच्या सूचना केंद्र सरकार मार्फत दिल्या गेलेल्या आहेत.
या मोहिमेमध्ये शिक्षकांसाठी डेंग्यू या आजाराविषयी कार्यशाळा, प्रात्यक्षिक, प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, घरोघरी डासअळी शोध मोहीम, डासअळी आढळलेल्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी यांची भेट, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत शाळेतील शाळाप्रमुख, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, मुख्याध्यापक यांना डेंग्यू प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय योजनेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. या मोहिमेच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना डासमुक्ती बाबतची सामुहिक प्रतिज्ञा दिली जाणार आहे. एक दिवस एक कार्यक्रम अशा प्रकारे शालेय डेंग्यू जागृती मोहिम राबविली जाणार आहे. सदर मोहिम ही 1 ते 15 ऑगस्ट 2018 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालयामधील संपूर्ण विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येणार असल्याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी कळविले आहे.
00000

माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी सन 2017-18 शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना


माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी सन 2017-18 शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना
      हिंगोली,दि.31: महाराष्ट्र  शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत सन 2017 मध्ये इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण प्राप्त करुन पुढील शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांसाठी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे, तरी ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांनी इयत्ता 10,12 मध्ये 60 टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यांनी दिनांक 15 ऑक्टोबर2018 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे खालील कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.
      इयत्ता 10 वी /12 वी आणि पदवी परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, सध्या शिकत असलेल्या इयत्तेचे बोनाफाईड सर्टीफिकेट, केंद्र / राज्य शासनाची, इतर शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा शाळा, महाविद्यालयाचा, संस्थेच्या प्राचार्यंचा दाखला, ज्या पाल्यांनी सीईटी / जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष सन 2018-19 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणासोबत गॅप सर्टीफिकेट (स्वयंघोषणापत्र) घेऊन शिष्यवृत्तीची मंजूरी द्यावी, माजी सैनिक ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची किंवा राशन कार्डची छायांकित प्रत, मुलीचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असल्यास मुलगी अविवाहीत असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, आर्थिक मदतीच्या पिवळ्या कार्डची छायांकित प्रत (दोन्ही बाजू) राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आधार कार्ड  कागदपत्रे सादर करावीत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाची मागणी


माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर
विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाची मागणी
      हिंगोली,दि.31: जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक विधवांना शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी 18 सप्टेंबर, 2018 पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
      सदर पुरस्कार अर्जासोबत साधा अर्ज, डी.डी. 40 फॉर्म, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, 10 वी / 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची व बोर्डाच्या सर्टीफिकेटची छायांकित प्रत, ओळखपत्राची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे सादर करावी.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****

माजी सैनिक/पत्नी/पाल्य विशेष गौरव पुरस्कार योजना करीता अर्ज करण्याचे आवाहन


माजी सैनिक/पत्नी/पाल्य विशेष गौरव पुरस्कार योजना करीता अर्ज करण्याचे आवाहन

      हिंगोली,दि.31: विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक/पत्नी/पाल्यांचा सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार योजना अंतर्गत पुरस्कार प्रदान केले जातात. याकरीता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळात, साहित्य, संगीत, गाय, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे इत्यादी माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच सन 2017-18 शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी आणि 12 वी  बोर्डात 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कारप्रदान करण्यात येणार आहेत.
      या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी पाल्यांनी या कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी 16 सप्टेंबर, 2018 पूर्वी या कार्यालयात संपर्क साधावा. अर्जासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 व 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र सादर करावीत. या संधीचा जास्तीत-जास्‍त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****

प्रसार माध्यम प्रतिनिधीसाठी ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ विषयावरील कार्यशाळेचे आज आयोजन


प्रसार माध्यम प्रतिनिधीसाठी ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’
विषयावरील कार्यशाळेचे आज आयोजन

हिंगोली,दि.31: मागील काही कालावधीत काही समाजकंटक समाज माध्यमातून ‘मुले चोरणारी टोळी आपल्या भागत आहे’ अशी खोटी अफवा पसरवत आहेत. या अफवामुळे निर्दोष वाटसरू, प्रवाशी, आणि अन्य नागरिक, ग्रामस्थ आदींना मारहाण करणे, तसेच त्यांचा छळ करणे असे प्रकार वाढत आहेत. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजबाबत दक्षता घेण्यासाठी जनजागृती व प्रसार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर प्रसार माध्यमांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचे आयोजन हे बुधवार 1 ऑगस्ट, 2018 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, हिंगोली येथील नागनाथ सभागृहात दुपारी 12.00 वाजता  करण्यात आले आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून समाज माध्यमांवरुन येणारी फेक न्यूज कशी ओळखायची, त्याविषयी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व संपादक, जिल्हा प्रतिनीधी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, छायाचित्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
****