05 July, 2018

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहीम


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहीम

हिंगोली,दि.5: सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद कार्यालयामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात एम. बी. बी. एस., बी.डी.एस. व बी.ए.एम.एस. इत्यादी वैद्यकीय अभ्यासक्रमास, अभियांत्रिकी व व्यावसायिक तसेच 10 वी आणि 12 वी नंतरचा पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणी संदर्भात दिनांक 15ऑगस्ट, 2018 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या समिती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.
त्याअनुषंगाने या विभागातील विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, या समिती कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने NEET (Govt. Of Maharashtra, State CET Cell)  यांनी प्रसिध्द केलेल्या विविध अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये ज्या अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात या कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे प्रकरण यापूर्वीच सादर केलेले आहे, त्यांनी समिती कार्यालयाशी संपर्क साधून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी/चूक किंवा अपूर्णता राहू नये. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या दावा पडताळणी प्रकरणी काही शंका असल्यास सदर शंकांचे निरसन व योग्य मार्गदर्शन करणेसाठी या कार्यालयामार्फत यापूर्वीच या समिती कार्यालयात विशेष सहाय्य कक्ष स्थापन करण्यात आला असून जनसंपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक-0240-2362901 देण्यात आल्याचे, सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
****


No comments: