19 July, 2018

एकात्मिक व्यवस्थापनातंर्गत शेंदरी बोंडअळी प्रादूर्भाव रोखण्यासाठी कार्यशाळा संपन्न


एकात्मिक व्यवस्थापनातंर्गत शेंदरी बोंडअळी प्रादूर्भाव रोखण्यासाठी कार्यशाळा संपन्न

हिंगोली,दि.19: बोंडअळी नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजन करुन मंडळ स्तरावर शेतकरी बैठकीमध्ये गावपातळीवर गट चर्चा घेवून बोंडअळी बद्दल प्रचार व प्रसार करण्यात आला. क्रॉपसॅप अंतर्गत विद्यापीठ स्तरावर क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांना बोंडअळी व इतर पिकाबाबत किड व रोग नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील मंडळनिहाय  प्रशिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच क्षेत्रीय कर्मचारी कृषि सहायक व कृषि पर्यवेक्षक यांच्यामार्फत निवडलेल्या गावात कापूस व सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करुन ॲपवर माहिती भरण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर माहितीच्या आधारावर पिकावर नुकसान पातळीच्यावर किडींचा प्रादुर्भाव झालयास शेतकऱ्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात 10 जिनिंग प्रेसिंग असून गतवर्षी शेंदरी बोंडअळीने प्रादुर्भाव झालेल्या कापसातील सरकी व रुई मोठ्या प्रमाणावर विखुरलेल्या स्वरुपात जिनींग प्रेासिंगच्या आवारात पडलेल्या असल्याने शेंदरी बोंडअळीच्या पतंगाने मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध होत असल्याने बोंडअळीच्या प्रादुर्भाव सभोवतालच्या शेतामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिनींग मिल मालकांना पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेट देऊन जिनींग भोवतालचे क्षेत्र स्वच्छ करुन पतंग दिसून आल्यास नष्ट करुन फेरोमेन ट्रॅप व स्टिकी ट्रॅप लावण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे उपविभागीय  कृषि अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

No comments: