19 July, 2018

गुरुद्वारा सचखंड श्री हुजुर अपचलनगर साहिब निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर


गुरुद्वारा सचखंड श्री हुजुर अपचलनगर साहिब निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर

हिंगोली,दि.19: नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजुर अपचलनगर साहिब निवडणूक - 2018 करिता दि. 1 जूलै, 2018 या अर्हता दिनांकावर आधारित तीन सदस्यांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सदर मतदार यादी कार्यक्रमात दि. 20 जुलै 2018 ते 18 ऑगस्ट 2018 या कालावधीत फार्म नं.1 मध्ये नोंदणी करुन संकलीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील शिख समाजाच्या पात्र मतदारांची नोंदणी फॉर्म नं.1 मध्ये भरुन महाराष्ट्र विधानसभा मतदार संघाच्या दि. 1 जुलै 2018 रेाजीच्या यादी  प्रमाणे संबंधीत तहसील कार्यालयात संकलीत करुन घेण्यात येणार आहे. नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हुजूर अपचलनगर साहिब निवडणूक -2018 करिता तीन सदस्यांच्या निवडणूकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शिख समाजाच्या पात्र उमदवारांनी फॉर्म नं. 1 भरुन दि. 20 जुलै 2018 ते 18 ऑगस्ट 2018 या कालावधीत संबंधीत तहसील कार्यालयात दाखल करावेत. फॉर्म नं.1 भरण्यासाठी सध्याच्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
****

No comments: