16 July, 2018

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा 48 वा वर्धापन दिन साजरा

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा 48 वा वर्धापन दिन साजरा
हिंगोली,दि.16: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा 48 वा वर्धापन दिन आज कळमनुरी तालूक्यातील मौ. सोडेगांव येथे साजरा करण्यात आला. जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या कयाधू नदीच्या पून:रुजीवीकरणाच्या जलदिंडीचा समारोप हा सोडेगांव येथे झाल्याने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा 48 वा वर्धापन दिन याठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सोडेगांवच्या  सरपंच श्रीमती सुवर्णमाला गव्हाणे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. संजय नाकाडे  यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. तुम्मोड म्हणाले की, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने कमी मनुष्यबळ असतांना देखील समाधानकारक कामगिरी करीत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच वर्धापन दिनाच्या माध्यमातून कयाधू नदीच्या पुन:रुजीवीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत ही त्यानी यावेळी  व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सूरूवातील वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाचे प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. डी. चव्हाण यांनी वर्धापन दिनाचे प्रस्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा 1971 ते आज पर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले. शासनाच्या कृषि विभागातून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाची स्थापना 16 जुलै, 1971 रोजी  झाली. सुरुवातीला शेतकऱ्याच्या सिंचन विहिरीचे खोलीकरण करणे, भूजलाचे विस्तृत सर्वेक्षण आणि विकास करणे तसेच 1972 पासून पिण्याच्या पाण्याची टंचाई हाताळणे, विंधन विहिर कार्यक्रम, स्त्रोत बळकटीकरणासाठी पारंपारीक / अपारंपारीक उपाययोजना राबविण्यापर्यंत अनेक प्रकारची कामे या यंत्रणेने केली असल्याचे त्यांनी सांगितले.
उगम संस्थेचे जयाजी पाईकराव यांनी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ग्रामस्तरावर होत असल्याने कयाधू नदीच्या पुन:रुजीवीकरणाच्या चळवळीला गती मिळेल व कयाधू नदीच्या पुन:रुजीवीकरणाचे कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य होण्यासाठी मदत होईल, असे मत व्यक्त केले.
सेनगांव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाचे प्रा. डॉ.भगवान गुठ्ठे यांनी भूजल पुर्नभरणाच्या तांत्रिक बाजू या विषयावर मार्गदर्शन केले.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात नव्याने निवड झालेल्या जलनायक डॉ.सतिश पाचपूते, डॉ.किशन लखमवार, डॉ.अवधूत शिंदे, प्रा.सुरेश मुलचंद धुत व सुशांत जयाजी पाईकराव  यांचा सत्कार यावेळी डॉ. तुम्मोड यांच्या हस्ते करण्यात आला.           यावेळी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भागानगरे, यांत्रिक विभागाचे आर.ए. कुंभारीकर, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कळमनुरी येथील बी.एस.वाडीकर व तोडूलवार हे उपस्थित होते. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील के. बी.देशपांडे, पी. पी. घडेकर, कनिष्ठ भू-वैज्ञानिक धनराज कांकरीया, उपलेखापाल बी.बी. शेळके, यांत्रिकी अनिल सोळंके, किरण, पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील सिध्दार्थ रणविर, सचिन भगत, शिवशंकर भोयर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बी.एस.वाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन  धनराज कांकरीया यांनी केले.
****

No comments: