04 July, 2018

पारधी समाजातील युवकांना ॲपे ॲटो (मालवाहू) योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन


पारधी समाजातील युवकांना ॲपे ॲटो (मालवाहू) योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.04: पारधी विकास योजना सन 2016-17 अंतर्गत जिल्ह्यातील पारधी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना ॲपे ॲटो (मालवाहू) देणे या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज दिनांक 28 फेब्रुवारी 2018 रोजी मागविण्यात आले होते. परंतू विहित कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात प्राप्त न झाल्यामुळे  व प्राप्त अर्जाची पडताळणी केली असता बऱ्याच अर्जांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. सबब यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज न करता त्रुटीच्या कागदपत्राची  पूर्तता करावी. तसेच नवीन इच्छूक लाभार्थ्यांनाही अर्ज सादर करण्यास दिनांक 25जुलै, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडे योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपूर्ण अर्ज सादर करावा.
                सदर अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, थ्री व्हिलर वाहन परवाना, 7/12 व होल्डींग प्रमाणपत्र, मतदान कार्ड, आधारकार्ड, सदर योजनेचा यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, देान पासपोर्ट साईज फोटो, असल्यास दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादीतील क्रमांकासह, रेशनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र या कागदपत्रांसह आवेदन अर्ज विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments: