12 July, 2018

प्रशासकीय इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरु


प्रशासकीय इमारतीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरु
हिंगोली,दि.12: येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मध्ये अन्न व औषध प्रशासन कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हिंगोली येथील जनहिताचे दृष्टीने व कार्यालयीन सौकार्याच्या दृष्‍टीने आठवड्यातून एक दिवस हिंगोली येथील अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या बुधवारी औषधी विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच दुसऱ्या व चौथ्या बुधवारी अन्न विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबाबत सर्व जनतेने व संबंधित व्यापारी यांनी नोंद घ्यावी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन म.राज्य, परभणी यांनी कळविले आहे.

0000

No comments: