31 May, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 32 रुग्ण ; तर 45 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  318 रुग्णांवर उपचार सुरु तर दोन रुग्णाचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यात 32 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती, सेनगांव परिसर 02 व्यक्ती व कळमनुरी परिसर 05 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 06 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती, कळमनुरी परिसर 07 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती व औंढा परिसर 04 व्यक्ती असे एकूण 32 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 45 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 127 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 20 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 147 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 680 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 01  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 318  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 361 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

**** 

 

परवाना धारक रिक्षा चालक, संघटनांनी सानुग्रह अनुदानासाठी परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 31 : राज्य शासनाने रिक्षा परवाना धारकांना 1500 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा परवाना धारकांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रणाली  विकसित केली आहे. त्यासाठी  रिक्षा चालकांनी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी  करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यासाठी वरील दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच ज्या ऑटोरिक्षा धारकांना आधार नोंदणी अद्यावत नसल्याने उपरोक्त पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे त्यांच्या सोईसाठी आधारकार्ड नोंदणी सुविधा केंद्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे लवकरच सुरु करण्यात येत आहे.

या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली मध्ये रिक्षा संघटना, चालक यांना आवश्यक मदत करण्यासाठी तसेच प्रणालीवर प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी मदत कक्ष (मो.क्र.9021484105) स्थापन करण्यात आला आहे.

सर्व परवाना धारक रिक्षा चालक, संघटनांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 01 ते 15 जून या कालावधीत आस्थापना व दुकाने सुरु ठेवण्यासाठी सुधारित आदेश जारी

 

 

हिंगोली (जिमाका) , दि. 31 :  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने          दि. 01 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दि. 15 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

या निर्बधांच्या कालावधीत यापूर्वी दिलेल्या सूचना कायम ठेवून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दि. 01 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते       दि. 15 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत फक्त खालील आस्थापना व दुकाने यांच्या सेवेच्या बाबतीत सुधारित आदेश जारी केले आहेत.

1. अत्यावश्यक सेवा बाबी : हिंगोली जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते (चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे), पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य (वैयक्तिक / संस्थेसाठी) विक्रेते, यांची दुकाने, आस्थापना दि. 01 जून, 2021  ते. दि. 15 जून, 2021 या कालावधीत शनिवार व रविवार वगळून दैनंदिन सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेत चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

फक्त दुध विक्री केंद्र, विक्रेते यांना या कालावधीत दैनंदिन सकाळी  7.00 ते 10.00 वाजता व सायंकाळी 6.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील.

जिल्ह्यातील APMC बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने (जसे की खते, बी, बियाणे,कृषी साहित्य, अवजारे, गॅरेज, टायर विक्री, दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा इत्यादी दुकाने, आस्थापना दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत चालू राहतील.

तसेच जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने यांना दि. 01 जून ते दि. 15 जून, 2021 या कालावधीत शनिवार व रविवार वगळून सकाळी 7.00 ते दुपारी 04.00 या वेळेत केवळ घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील. यासाठी संबंधित व्यापारी, दुकानदार यांनी घरपोच सेवा पुरवण्यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत पास उपलब्ध करुन घ्यावेत.

जिल्ह्यातील खानावळ, रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी दि. 01 जून ते दि. 15 जून, 2021 या कालावधीत सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत परवानगी राहील.

जिल्ह्यातील आस्थापना व दुकानांना पुरवठा केला जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. परंतु नागरिकांसाठी दुकाने केवळ वरील वेळापत्रकानुसार चालू राहतील. जर ठरवून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त नागरिकांसाठी दुकाने उघडण्यात आली तर अशा आस्थापना व दुकाने यांना कोरोना साथ असेपर्यंत बंदी घालण्यात येईल.

2. कार्यालयीन उपस्थिती :

अ) सर्व शासकीय कार्यालयातील (केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) उपस्थिती 25 टक्के राहील. परंतु फक्त कोव्हिड-19 च्या संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून राहील.

आ) ज्या शासकीय कार्यालयांना 25 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे. त्या कार्यालय प्रमुखांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

3. लग्न समारंभ :

या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पाडता येईल. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी लग्न सोहळा पार पाडता येणार नाही.  

4. खाजगी प्रवासी वाहतूक :

अ) खाजगी प्रवासी वाहतूक फक्त निकडीचे किंवा अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी वाहन चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्याच्या मर्यादेपर्यंत E-Pass द्वारे प्रवास करता येईल. अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारणासाठी किंवा न टाळण्यासारख्या कार्यक्रमासाठी जसे अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी E-Pass द्वारे परवानगी घेऊन प्रवास करता येईल. जर यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपये दंड लावण्यात येईल.   

आ) खाजगी प्रवासी बसेसना (Travels) वाहतूक करण्यास या कालावधीत पूर्णतः बंदी राहील.

5. सार्वजनिक प्रवासी वाहतूक :

अ) राज्य शासकीय MSRTC किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीची वाहने यांची कार्यालये केवळ शासन नियमाप्रमाणे कार्यरत राहतील. परंतु हिंगोली जिल्ह्यातील सर्व बस स्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटीजेन  तपासणी कॅम्प उभारणे बंधनकारक राहील. कॅम्प करिता संबंधित आगार प्रमुख यांनी आरोग्य विभागाशी समन्वय साधावा.

आ) हिंगोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस या कालावधीमध्ये चालू राहतील. तसेच  बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसच्या व्यवस्थापनासाठी बस स्थानक कार्यरत राहतील. परंतु बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बस स्थानकाशिवाय इतर कुठेही थांबणार नाहीत.

6. माल वाहतूक :

या कालावधीत माल वाहतूक करणाऱ्या वाहनात केवळ दोन व्यक्तींना (चालक, क्लिनर, हेल्पर) परवानगी असेल. माल वाहतूक करणारे अशी वाहने बाहेरच्या राज्यातून येत असतील तर त्या वाहनातील चालक व हेल्पर यांच्या कडे 48 तास अदोगर RTPCR तपासणी करण्यात आलेले Negative प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. हे प्रमाणपत्र सात दिवसासाठी वैध असेल.

7. बँका :

जिल्ह्यातील सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार कार्यालयीन कामकाजासाठी सुरु राहतील. तसेच या कालावधीत बँका दैनंदिन शासकीय कामकाजासाठी व व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरु ठेवता येतील.

शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या अनुषंगाने असणाऱ्या कामांसाठी बँका दि. 01 जून, 03 जून, 05 जून,    07 जून, 09 जून, 11 जून आणि 14 जून, 2021 या कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत चालू राहतील.

तसेच नागरिकांच्या कामासाठी बँका दि. 02 जून, 04 जून, 08 जून, 10 जून आणि 14 जून, 2021 या कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच बँकेतील BC/CSPs ला पूर्ण वेळ काम करण्याची परवानगी असेल.

8. उद्योग :

जिल्ह्यातील जे नोंदणीकृत उद्योग आहेत त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कर्मचारी, कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे कडून ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र शासनामार्फत दि. 18 एप्रिल,2021  व दि. 01 मे, 2021 रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार मूळ संवेदनशील असलेल्या राज्य व संबंधित ठिकाणावरुन येणाऱ्या नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेले निर्बंध हे सद्य परिस्थितीत भारतातील कोणत्याही राज्यातून हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना लागू राहतील.

इतर राज्यातून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर RTPCR चाचणी Negative असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. तसेच ज्यांच्याकडे RTPCR Negative प्रमाण पत्र नसेल अशांना संस्थात्मक विलगीकारणात ठेवण्यात येईल आणि त्यांची RTPCR तपासणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

9. दुय्यम निबंधक कार्यालये :

या कालावधीत जिह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2 हिंगोली व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये हे दस्तनोंदणी व इतर अनुषंगिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांसाठी दि. 01 जून ते 15 जून, 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत चालू राहतील.

हे आदेश हिंगोली जिल्ह्यात दिनांक 01 जून, 2021 रोजी सकाळी  7.00 ते दिनांक 15 जून, 2021 चे सकाळी 7.00 वाजेपर्यत लागू राहील. या आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल. तसेच मुभा देण्यात आलेले आस्थापना व दुकाने हे कोरोना नियमांचे पालन करत आहेत किंवा कसे याबाबत संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन तपासणी करावी.

या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असे आदेश दिले आहेत.

****

30 May, 2021

 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील. आमच्या फेसबुक पेजवर पहा: https://facebook.com/CMOMaharashtra/

28 May, 2021

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : भारतीय हवामान विभागाने दि. 28 मे, 2021 ते दि. 30 मे, 2021 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट व पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहेत.  

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1) आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी  तसेच नागरिकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2) जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3) झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4) वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5) वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6) विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.

7) वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करू नका:

1) पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.

2) विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3) दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4) धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

            त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी . 

 

****

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 39 रुग्ण ; तर 63 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 401 रुग्णांवर उपचार सुरु तर पाच रुग्णांचा मृत्यू

 


 हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात 39 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 10 व्यक्ती, औंढा परिसर 09 व्यक्ती, कळमनुरी परिसर 09 व्यक्ती, सेनगाव परिसर 05 व्यक्ती असे एकूण 39 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 63 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 137 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 23 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 160 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 598 रुग्ण झाले असून, त्यापैकी  14 हजार 842 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 401  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 355 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


हिंगोली, (जिमाका) दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रविण फुलारी, प्रशांत खेडेकर, महसूल विभागाचे तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार राजेश जोशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

  ****

27 May, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 48 रुग्ण ; तर 80 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 430 रुग्णांवर उपचार सुरु तर पाच रुग्णांचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : जिल्ह्यात 48 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती, औंढा परिसर 04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 28 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती, कळमनुरी परिसर 04 व्यक्ती, सेनगाव परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 03 व्यक्ती असे एकूण 48 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 80 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 150 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 23 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 173 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 559 रुग्ण झाले असून, त्यापैकी  14 हजार 779 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 430  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 350 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

विविध राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी (विद्यापीठासाठी)-2021 या पुरस्कारासाठी  नामनिर्देशनाचा प्रस्ताव दिनांक 21 जून 2021 रोजी सायंकाळी  5.00 वाजेपर्यंत अर्जदारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची, व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास surendra.yadav@nic.in किंवा girnish.kumar@nic.in या ई-मेल पत्त्यावर सादर करावे. तसेच विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही , असे सूचित केले आहे.

केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची  सविस्तर माहिती, नियमावली व विहित नमुना अर्ज  http://yas.nic.in/sports  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या इच्छुक उमेदवारांनी वरील पुरस्कारांसाठी  विहित कालावधीत व दिलेल्या संकेतस्थळावरुन अर्ज डाउनलोड करुन उपरोक्त दोन पैकी एका ई-मेल पत्यावर आपले पुरस्काराठीचे अर्ज सादर करावे, असे आवाहन नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली  यांनी  केले आहे. 

*******