06 May, 2021

जिल्हा बाल संरक्षण कक्षास बाल विवाह रोखला

 

जिल्हा बाल संरक्षण कक्षास बाल विवाह रोखला

 

हिंगोली, (जिमाका)दि.6: जिल्ह्यातील वसमत तालूक्यातील मौ. गुंज येथे नांदेड जिल्ह्यातील लहुजी नगर वजिराबाद जि. नांदेड येथील एका अल्पवयीन मुलीचा बाल विवाह 5 मे, 2021 रोजी लावून दिला जात असल्याची माहिती  जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नांदेड यांचेकडून मिळाली असता. त्या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे  यांच्या नियोजनानुसार सदरील बाल विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

सद्याच्या लॉकडाऊनच्या काळातही लग्न सराईला वेग आला असून वसमत तालुक्यातील गुंज या गावात बाल विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाल विवाह होत असल्याची चाहूल लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी जरीब खान पठाण , सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे, पो. हेड कॉन्स्टेबल वा. जी. वाघमारे यांनी सदरील गावातील ग्रामसेवक ए.पी. गिते, सरपंच सत्यभामा नरवाडे, पोलीस पाटील अंकुश सुर्यवंशी, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अंगणवाडीताई जया जनकवाडे यांच्या समक्ष मुलाच्या आई, वडील, मामा यांची भेट घेतली व बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच या गुन्ह्यास 1 लाख रुपये दंड व 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असे दोन्ही शिक्षा होऊ शकतात व बाल विवाहाच्या दुष्परिणामा विषयी समुपदेशन केले. संबंधीताचा ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष लेखी जबाब लिहून घेण्यात आला व सदरील बाल विवाह रोखण्यात आला, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

 

No comments: