27 May, 2021

विविध राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी (विद्यापीठासाठी)-2021 या पुरस्कारासाठी  नामनिर्देशनाचा प्रस्ताव दिनांक 21 जून 2021 रोजी सायंकाळी  5.00 वाजेपर्यंत अर्जदारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची, व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास surendra.yadav@nic.in किंवा girnish.kumar@nic.in या ई-मेल पत्त्यावर सादर करावे. तसेच विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही , असे सूचित केले आहे.

केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची  सविस्तर माहिती, नियमावली व विहित नमुना अर्ज  http://yas.nic.in/sports  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या इच्छुक उमेदवारांनी वरील पुरस्कारांसाठी  विहित कालावधीत व दिलेल्या संकेतस्थळावरुन अर्ज डाउनलोड करुन उपरोक्त दोन पैकी एका ई-मेल पत्यावर आपले पुरस्काराठीचे अर्ज सादर करावे, असे आवाहन नरेंद्र पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली  यांनी  केले आहे. 

*******

No comments: