20 May, 2021

परवाना धारक रिक्षा चालक, संघटनांनी सानुग्रह अनुदानासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा -- अनंता जोशी

 


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 20 : राज्य शासनाने रिक्षा परवाना धारकांना 1500 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा परवाना धारकांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रणाली  विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी  रिक्षा चालकांची या प्रणाली मार्फत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली मध्ये रिक्षा संघटना, चालक यांना आवश्यक मदत करण्यासाठी तसेच प्रणालीवर प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी मदत कक्ष (मो.क्र.9021484105) स्थापन करण्यात आला आहे.

सर्व परवाना धारक रिक्षा चालक, संघटनांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****

 

 

No comments: