21 May, 2021

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवावे जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 21 : ज्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र अद्यापपर्यंत सादर केले नाही त्यांनी तातडीने to.hingoli@zillamahakosh.in या ई-मेल पत्यावर पाठवावेत. तसेच ज्या बँकेकडे हयात प्रमाणपत्र जमा झाले असतील त्यांनीही कोषागार कार्यालयाकडे विनाविलंब पाठवावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: